प्रथमेश परबने नेहमीच त्याच्या भन्नाट अभिनयाने दर्जेदार चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. २०१९ मध्ये त्याच्या टकाटक या चित्रपटाने तर बॉक्स-ऑफिस गाजवलं. या चित्रपटाचा येत्या रविवारी झी टॉकीज वाहिनीवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. त्या निमित्ताने प्रथमेश सोबत साधलेला हा खास संवाद
या सिनेमाने बॉक्स ऑफिस वर चांगली कमाई केली आणि अनेक पुरस्कारही मिळवले, हे आनंदी क्षण तुम्ही कसे सेलीब्रेट केले?
टकाटक माझ्या साठी खूपच खास सिनेमा आहे. लोकांना हा सिनेमा आवडेल अशी अपॆक्षा होतीच पण एवढा जास्त आवडेल असं वाटलं नाही. प्रेक्षकांनी टकाटक वर भरभरून प्रेम केल, म्हणूनच बॉक्स ऑफिस वर टकाटक खूप जास्त कमाई करू शकला. मला अजूनही आठवत, आम्ही टकाटक प्रदर्शित होण्याच्या आधल्या दिवशी भरपूर प्रोमोशन केल. रात्री घरी येऊन झोपलो आणि सकाळी उठलो तर मला २५ मिस कॉल होते. सगळ्यांनी मला सांगितलं सगळे शो हॉउसफ़ुल्ल आहेत. सकाळी ९ चा शो हॉउसफ़ुल्ल होईल अशी अपेक्षा नव्हती. सिनेमाच्या सक्सेस पार्टीला आम्ही खूप एन्जॉय केल. पण मला वाटतं आम्ही सर्वांनी थिएटर मध्ये, हॉउसफ़ुल्लचे बोर्ड बघून प्रेक्षकांसोबत सिनेमाचं सक्सेस जास्त सेलीब्रेट केल.
तुझ्या मते प्रेमाची व्याख्या काय आहे? तुझ्या सिनेमातील भूमिकेसारखाच तु वैयक्तिक आयुष्यात आहेस का?
एखाद्या व्यक्तीवर प्रेम करण्यासाठी तुमच्याकडे जर कारण नसेल तर ते प्रेम जास्त घट्ट असतं. टकाटक मधील गणेश बाबुराव ठोके च सुद्धा हेच म्हणणं आहे . कोणतीही अपेक्षा न ठेवता तो मिनीच्या मागे खंबीर पणे उभा राहतो. एखाद्या व्यक्तीकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता त्याच्यावर प्रेम करणं आणि त्याच्या सोबत राहणं, हीच माझी सुद्धा प्रेमाबद्दलची व्याख्या आहे.
या कठीण काळात गणेश बाबुराव ठोके प्रेक्षकांना कोणता सल्ला देऊ इच्छितो..?
गणेश बाबुराव ठोकेच्या वतीने मी माझ्या सगळ्या सिंगल मित्रांना सांगीन कि तुम्ही अजिबात काळजी करू नका, जिकडे कुठे तुमची मिनी असेल ती सुद्धा लॉकडाउन मध्ये अडकली असेल. त्यामुळे ती तुमच्या हातातून सुटणार नाही. तुम्ही जेव्हा घराबाहॆर पडाल तेव्हा तुमच्या मिनीला डबल, ट्रिपल प्रेम दाखवा, ज्या मुळे ती अजून इंप्रेस होईल.
झी टॉकीज २६ जुलै रोजी टकाटक सिनेमाचा “वर्ल्ड टेलीव्हिजन प्रीमियर” करणार आहे, या बद्दल तू प्रेक्षकांना काय सांगशील आणि तु तुझा दिवस कसा घालवणार आहेस .?
येत्या २६ जुलै ला टकाटक सिनेमा झी टॉकीज आपल्या सर्वांच्या भेटीस घेऊन येत आहे. तुम्ही सर्वांनी आपल्या कुटुंब सोबत हा सिनेमा पाहावा अशी विनंती मी तुम्हा सर्वांना करतो. मी सुद्धा माझ्या कुटुंबा सोबत दुपारी जेवणाचा आस्वाद घेत सिनेमा बघणार आहे तर संध्याकाळी चहा, भजी आणि टकाटक असा “टकाटक” प्लॅन आम्ही सर्वांनी केला आहे. लॉकडाउन मध्ये वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना सुद्धा रविवार असल्यामुळे टकाटक सिनेमाचा आस्वाद घेता येणार आहे.
सगळं जग थांबलेलं आहे. या लॉकडाउन मधील तुझी एखादी टकाटक आठवण आहे का?
या लॉकडाउन मधील माझी टकाटक आठवण म्हणजे मी नुकताच नवीन घरात शिफ्ट झालो आहे. लॉकडाउनच्या आधी पासून याची प्रक्रिया सुरु होती. पण लॉकडाउन असल्याने ती पूर्ण होऊ शकली नाही. पण लॉकडाउन थोडं शिथिल झाल्यावर आम्ही नवीन घरात शिफ्ट झालो. आणि दुसरी टकाटक मोमेन्ट म्हणजे २६ जुलै ला होणारा टकाटक चा “वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर”. माझ्या नवीन घरात मी माझ्या कुटुंबा सोबत टकाटक बघणार आहे.
– भूषण पत्की