Home » Pankaj Dheer : जेष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे दुःखद निधन, जाणून घ्या त्यांचा अभिनय प्रवास

Pankaj Dheer : जेष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे दुःखद निधन, जाणून घ्या त्यांचा अभिनय प्रवास

by Jyotsna Kulkarni
0 comment
Pankaj Dheer
Share

मनोरंजनविश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. बी. आर. चोप्रा यांच्या जगप्रसिद्ध अशा ‘महाभारत’ मालिकेत कर्णाची अजरामर भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांनी आज, बुधवार १५ ऑक्टोबर रोजी ६८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे मित्र अभिनेता अमित बहल यांनी दिली. पंकज हे मागील बऱ्याच काळापासून कॅन्सरशी लढा देत होते. मात्र आज त्यांची झुंज अपयशी ठरली आणि त्यांचे निधन झाले. (marathi)

पंकज हे मनोरंजनविश्वातील अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक अजरामर भूमिका साकारल्या. चित्रपट आणि मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. पंकज धीर यांना काही वर्षांपूर्वी कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. त्यांनी त्या आजारावर यशस्वीपणे मात केली होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्यांना पुन्हा कॅन्सरचे निदान झाले. त्यानंतर त्यांची तब्येत सतत खालावत गेली. या आजाराच्या उपचारादरम्यान एका मोठ्या शस्त्रक्रियेतून देखील त्यांना जावे लागले होते. अनेक प्रयत्न करूनही त्यांना या आजारातून पूर्ण बरे होता आले नाही, आणि अशातच आज १५ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Pankaj Dheer Death)

प्राप्त होणाऱ्या माहितीनुसार अभिनेता पंकज धीर यांच्यावर आज १५ ऑक्टोबर रोजी मुंबईतील विलेपार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे. या वेळेस त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र, तसेच इंडस्ट्रीतील कलाकार त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी उपस्थित असतील. दरम्यान पंकज धीर यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीवर दुःखाची लाट पसरली आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीवर त्यांच्या चाहत्यांचा आणि मित्र परिवाराचा अजूनही विश्वास बसत नाहीये. (Todays Marathi Headline)

Pankaj Dheer

तत्पूर्वी पंकज धीर यांनी या इंडस्ट्रीमध्ये विपुल काम केले. त्यांच्या खासकरून खलनायकी भूमिका कमालीच्या गाजल्या. असे असले तरी त्यांची बी. आर. चोप्रा यांच्या महाभारत या मालिकेमध्ये त्यांनी साकारलेला ‘कर्ण’ भाव खाऊन गेला. आजवर आपण अनेक कलाकारांनी ही भूमिका साकरल्याचे पाहिले आहे, मात्र पंकज धीर यांनी ज्या ताकदीने कर्णाची भूमिका साकारली तिला आजही तोड नाही. म्हणूनच तर पंकज यांच्या असंख्य भूमिका असूनही प्रेक्षकांनी कायम त्यांना ‘कर्ण’ म्हणूनच ओळख दिली होती. (Top Trending News)

पंकज धीर हे महाभारतात कर्णाची भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध झाले. या शोसाठी त्यांना खूप कमी पैसे मिळाले होते. एका वृत्तानुसार पंकज धीर यांना प्रति एपिसोड फक्त ३,००० रुपये देण्यात आले होते. त्यांनी महाभारताच्या ९४ भागांमध्ये काम केले. तसेच त्यांचे पात्र प्रेक्षकांना खूप आवडले, यानंतर त्यांचे नशीब उजळले. आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट केले. पंकज धीर यांनी त्यांच्या कारकिर्दीत असंख्य चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले आहे. त्यांनी चंद्रकांता आणि द ग्रेट मराठा यासारख्या अनेक पौराणिक शोमध्येही काम केले आहे. त्यांनी सोल्जर, बादशाह आणि सडक सारख्या चित्रपटांमध्येही काम केले. (Marathi News)

महाभारतातील त्यांची भूमिका आणि त्यांचा अभिनय कमालीचा गाजला. या शोसाठी त्यांच्यासोबतच इतरही सर्वच कलाकारांनी खूपच मेहनत घेतली होती. सर्वच सीन एकदम खरे वाटावे यासाठी सर्व कलाकार प्रयत्न करायचे. एकदा महाभारतात युद्धाचा एक सीन चालू होता. या सीनदरम्यान पंकज यांच्या एका डोळ्याजवळ बाण लागून गंभीर दुखापत झाली. त्यांनतर शूटिंग थांबवण्यात आले आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. तेव्हा त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया देखील पार पडली. त्यांचा डोळा थोडक्यात वाचला होता. (Latest Marathi News)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंकज धीर मृत्यूनंतर कुटुंबियांसाठी तब्बल ४२ कोटी रुपयांची संपत्ती मागे ठेऊन गेले आहेत. ज्यामध्ये त्यांची मुंबई आणि पंजाबमधील मालमत्ता, त्यांचं बँक बॅलन्स, गुंतवणूक आणि व्यवसायातील उत्पन्न यांचा समावेश होता. त्यांनी सिनेमे, टीव्ही शो तसेच ब्रँड एंडोर्समेंटमधून पैसे कमवले. त्यांचं वार्षिक उत्पन्न १.४४ कोटींपेक्षा जास्त होतं.. असं देखील सांगण्यात येत आहे. २००६ मध्ये पंकज धीर यांनी त्यांच्या भावासोबत मुंबईतील जोगेश्वरी भागात विजय स्टुडिओज हा रेकॉर्डिंग आणि प्रोडक्शन स्टुडिओ सुरू केला. पंकज धीर यांनी अनेक नव्या कलाकारांना देखील संधी दिल्या. आणि प्रोडक्शन स्टुडिओच्या माध्यमातून देखील त्यांनी चांगली कमाई केली. (Top Marathi Headline)

Pankaj Dheer

‘महाभारत’मध्ये पंकज धीर यांनी साकारलेले कर्ण हे पात्र अफाट लोकप्रिय झाले. किंबहुना पंकज यांनी ‘कर्ण’ ही जणू ओळखच बनली. मात्र फार कमी लोकांना हे माहित आहे की कर्णच्या भूमिकेसाठी पंकज धीर पहिली पसंती नव्हते. पंकज धीर यांना सुरुवातीला श्रीकृष्णची भूमिका ऑफर झाली होती. पण त्या भूमिकेसाठी निर्मात्यांनी एक अट ठेवली, जी पंकज धीर यांनी मान्य केली नाही आणि त्यावरून मोठा वाद देखील झाला होता. (Top Trending Headline)

महाभारताचे लेखक असलेल्या डॉ. राही मासूम रजा आणि पंडित नरेंद्र शर्मा यांनी पंकज यांना सुरुवातीला अर्जुनच्या भूमिकेसाठी निवडले होते. या निवडीमुळे पंकज धीर खूप आनंदित होते त्यांनी कॉन्ट्रॅक्टदेखील साइन केला होता. पण पुढे काही महिन्यांनी चोप्रा यांचा विचार बदलला आणि त्यांनी पंकज यांना ऑफिसमध्ये बोलावले. त्यांनी सांगितलं की, आता त्यांना कृष्णाची भूमिका करायची आहे, पण या भूमिकेसाठी त्यांना आपली मिशी कापावी लागेल. पंकज यांनी मिशी कापणार नसल्याचे लगेच स्पष्ट सांगितले. मिशी काढल्यावर चेहरा चांगला दिसणार नाही, असे त्यांना वाटत होते. (Top Marathi News)

पंकज धीर आपल्या निर्णयावर ठाम होते. चोप्रा मात्र त्यांना समजावत होते की एखाद्या कलाकाराला भूमिकेसाठी कधी-कधी आपला लुक बदलावा लागतो. पण पंकज काहीही ऐकायला तयार नव्हते. हे पाहून बी. आर. चोप्रा खूप रागावले आणि त्यांनी पंकज यांना ऑफिसमधून हाकलून दिलं आणि म्हणाले,”बाहेर जा, पुन्हा कधी येऊ नकोस.” पुढे चोप्रा यांनी पंकज यांना कर्णची भूमिका ऑफर केली. (Latest Marathi Headline)

Pankaj Dheer

फक्त मिशीसाठी अर्जुनाच्या भूमिकेला नकार देणं हा मूर्खपणा असल्याची कबुली नंतर पंकज यांनीसुद्धा दिली. या गोष्टीबद्दल सांगताना पंकज म्हणाले होते की, “त्यावेळी तो माझा मूर्खपणा होता. बी. आर. चोप्रा मला म्हणाले, इथून निघ आणि पुन्हा येऊ नकोस. त्यांनी मला त्यांच्या ऑफिसबाहेर काढलं होतं. माझा करार फाडण्यात आला आणि त्यानंतर सहा महिने मी फक्त डबिंग करत फिरत होतो. नंतर चोप्रा यांनी स्वत:हून मला फोन केला आणि याचाल नशीब म्हणतात. मी कर्णची भूमिका साकारू शकेन का, असं त्यांनी मला विचारलंय. त्यावरही मी त्यांना पुन्हा विचारलं की, सर मला मिशी काढावी लागणार नाही ना? त्यांनी नकार देताच मी कर्णची भूमिका स्वीकारली. ती भूमिका माझ्या नशिबात होती”, असं पंकज यांनी सांगितले. (Top Trending News)

========

Vasubaras : वसुबारसच्या दिवशी काय करावे, काय करू नये!

Screen Time: जास्त स्क्रीन टाइमचा धोका डोळ्यांसोबत मेंदू, पाठ, झोप आणि मनःस्थितीवरही गंभीर परिणाम!

========

दरम्यान पंकज धीर यांच्या निधनानंतर त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे. पंकज यांचा मुलगा निकेतन धीर आणि त्यांची सून कृतिका याच क्षेत्रात सक्रिय आहेत. निकेतन धीर हा लोकप्रिय अभिनेता असून, त्याने अनेक चित्रपटांमध्ये कमालीच्या गाजलेल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याची चेन्नई एक्सप्रेस सिनेमातील ‘थांगबली’ भूमिका प्रचंड गाजली होती. पंकज धीर यांच्या पत्नीचे नाव अनिता धीर असून, त्या एक कॉस्च्युम डिझायनर आहे. तसेच, पंकज यांच्या भावाचे नाव सतलज धीर आहे, तो एक चित्रपट निर्माता आहे. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.