एक लग्न झाले, केवळ 12 दिवस टिकले. बारा दिवसानंतर त्या दोघांनी घटस्फोट (Divorce) घेतला. दोघंही हॉलिवूडचे स्टार. 2020 मध्ये झालेल्या या लग्नाची चर्चा सुरु झाली तोच घटस्फोटही झाला, चर्चा झाली आणि थांबली….आता पुन्हा या लग्नाची आणि घटस्फोटाची (Divorce) चर्चा सुरु झाली. कारण घटस्फोटानंतरही पतीनं पत्नीच्या नावावर करोडोंची रक्कम जमा केली आहे. त्यामुळेच हॉलिवूड स्टार पामेला अँडरसन आणि हॉलिवूड निर्माता जॉन पीटर्स यांची नावं पुन्हा एकदा सोशल मिडीयावर चर्चेत आली आहेत.

हॉलिवूड स्टार पामेला अँडरसन आणि हॉलिवूड निर्माता जॉन पीटर्सने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पामेलाच्या या माजी पतीने त्याच्या मृत्यूपत्रात तिचे नाव समाविष्ट केले आहे. पामेला आणि जॉन पीटर्सचे लग्न झाले आणि ते अवघे 12 दिवस टिकले. 2020 मध्ये या दोघांचे लग्न झाले. सोशल मिडीयावर त्याची खूप चर्चा झाली आणि अवघ्या 12 दिवसांनी काडीमोडही झाला. आता या घटस्फोटानंतर (Divorce) जॉन पीटर्सनं पामेलाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. घटस्फोट (Divorce) झाला तरी आपण कायम पामेलाच्या प्रेमात होतो, अशी प्रांजळ कबुली जॉन पीटर्स यांनी दिली आहे. पामेलावर मी नेहमीच प्रेम करेन असं सांगत या 74 वर्षीय निर्मात्याने आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. जॉन यांनी त्याच्या मृत्यूपत्रात $10 दशलक्ष, म्हणजे भारतीय चलनात सुमारे 81.51 कोटी रुपये पामेलाच्या नावावर करुन ठेवले आहेत. आता जॉनच्या याच मृत्यूपत्रावर आणि पामेलाच्या नावावर त्यानं ठेवलेल्या पैशावर चर्चा होत आहे. कारण पामेलाच्या नावावर करोडो रुपये ठेवतांना तिला गरज असो वा नसो, पण माझे प्रेम तिच्यासोबत कायम राहणार आहे, त्यामुळेच ही रक्कम मी पामेलाच्या नावावर ठेवत असल्याचेही जॉन यांनी म्हटले आहे. आता ही 81 कोटीची रक्कम नावावर झाल्यानं पामेलाची काय प्रतिक्रीया आहे, याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.
माहितीनुसार जॉन आणि पामेला यांनी सोबत चित्रपट केले आहेत. 20 जानेवारी 2020 रोजी दोघांचे लग्न झाल्याची बातमी आली. मात्र, विवाहानंतर 1 फेब्रुवारी 2020 रोजी, पामेलाने जाहीर केले की तिने असे कुठलेही लग्न केलेले नाही. काही दिवसांनी पामेला आणि जॉन यांनी आपण कायदेशीरबाबी पूर्ण करुन कुठलेही लग्न केले नसल्याचे स्पष्ट केले. कायदेशीर लग्न नसल्यानं घटस्फोटाचा (Divorce) प्रश्नच नव्हता. पामेलानं तर यापुढे जात आपण जॉनबरोबर फक्त पाच दिवस एकत्र घालवले आहेत, असं सांगितलं. त्यानंतर एक मेसेज पाठवून हे लग्न मोडल्याचं जॉनला सांगितलं होतं. पामेला ही हॉलिवूडमध्ये सतत प्रकाशझोतात राहणा-या अभिनेत्रींपैकी एक आहे. टीव्ही शो ‘बिग बॉस 4’ मध्ये देखील दिसली होती. यादरम्यान पामेलाला तीन दिवसांसाठी मोठी रक्कम मिळाली. पामेलाची आधी झालेली लग्न ही गाजली आहेत. पामेलाने यापूर्वी टॉमी ली आणि किड रॉकसोबत लग्न केले होते. यानंतर तिने रिकी सॉलोमनसोबत दोनदा लग्न केले. त्याच वेळी, जॉन पीटर्ससोबत तिचे पाचवे लग्न झाले. जॉन पीटर्स ‘बॅटमॅन’चा निर्माता आहे. बेवॉच या मालिकेतील बिंधास्त भूमिकेमुळे ती चर्चेत आली. पामेलाचे रॉ जस्टिस, बार्ब वायर, ब्लॉन्ड आणि ब्लॉन्डर, द इन्स्टिट्यूट, सिटी हंटर हे चित्रपट गाजले. पामेला प्राण्यांच्या हक्कांसाठीही काम करते. तिने तीन आत्मचरित्र आणि चार कादंबऱ्याही प्रकाशित केल्या आहेत. पामेलानं अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथे 1.8 दशलक्ष डॉलर्समध्ये समुद्रकिना-यावर अलिशान घर खरेदी केले. पण काही वर्षातच या घराची विक्री करुन ती कॅनडाला रवाना झाली. आता ही पामेला एकटी व्हँकुव्हर बेटावर तिच्या आजी-आजोबांच्या फार्महाऊसमध्ये राहते. नाही म्हणायला तिच्यासोबत तिचे लाडके कुत्रे आहेत. समुद्राचा किनारा आणि पुस्तकांच्या सहवासात ती राहत आहे. आता तिच्या नावावर असेलेल्या कोट्यवधी रुपयांचे ती कसा वापर करणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
=========
हे देखील वाचा : मायकेल जॅक्सनवर लवकरच बायोपिक
=========
इकडे जॉन पीटर्सनही 77 वर्षाचे झाले आहेत. हेअरड्रेसर म्हणून काम करत असलेल्या जॉन पीटर्स यांनी आपल्या कष्टांनी आणि कल्पकतेनं अनेक चित्रपटांची निर्मिती केली. अगदी शुन्यापासून काम सुरु केले. आता जॉन पीटर्स हे हॉलिवूडमधील मानाचे नाव आहे. हॉलिवूडला अनेक दर्जेदार चित्रपट देणारे जॉन पीटर्स यांचे नाव अनेक सुंद-यांबरोबर जोडले गेले. मात्र या सर्वात पामेला ही वेगळी होती, हे सांगून जॉन यांनी जाहीरपणे आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.
सई बने