अनेकदा कलाकार त्यांच्या मुलाखतींमध्ये, विविध प्लॅटफॉर्म्सवर त्यांना त्यांच्या आयुष्यात प्रायव्हसी मिळत नसल्याची तक्रार करताना दिसतात. त्यांच्या अवतीभोवती असणारे पापराझी आणि फॅन्स यांच्यामुळे त्यांना त्यांचे वैयक्तिक जीवनच राहिले नसल्याचे ते अनेकदा बोलतात. सोशल मीडिया, मोबाइल, कॅमेरा आदी अनेक गोष्टींमुळे त्यांच्यावर सतत एक तिसरा डोळा लक्ष ठेऊन असतो. (Gashmeer Slams Actors)
फॅन्स हे नेहमीच आपल्या आवडत्या कलाकाराला बघण्यासाठी, भेटण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. मात्र यामुळे कलाकार वैतागतात. ‘कलाकार देखील एक माणूस आहे’, ‘सगळ्यांनाच वैयक्तिक आयुष्य असते’, ‘आमच्या प्रायव्हसीचा मान ठेवा’ आदी अनेक वक्तव्य करताना दिसतात. असे असले तरी फॅन्स आणि मीडिया त्यांचा पिच्छा सोडत नाही. अनेकदा काहींना त्याचे म्हणणे पटते तर काहींना नाही. मात्र कलाकारांचे हे असे वक्तव्य आणि त्यांचे खासगी जीवन याबद्दल अभिनेता गश्मीर महाजनीने त्याचे परखड मत मांडत ‘कलाकार आयुष्य खासगी ठेवण्याचे नाटक करतात.’ असे म्हटले आहे.
मराठी इंडस्ट्रीमधील हँडसम अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गश्मीरने हिंदीमध्ये देखील मोठे नाव कमावले आहे. आपल्या लुक्ससोबतच तो फिटनेसमुळे देखील चर्चेत असतो. लवकरच गश्मीर रोहित शेट्टीच्या सुपरहिट अशा ‘खतरो के खिलाडी’ शोमध्ये दिसणार आहे. त्याने नुकतेच एका मुलाखतीमध्ये कलाकारांच्या काही गोष्टी जगासमोर आणत त्यांना खडेबोल सुनावले आहेत.
गश्मीरने मुलाखतीमध्ये बोलताना सांगितले की, “प्रेक्षकांच्या नजरेसमोर असणे हे अजिबातच आव्हान नाहीये. जेव्हा तुम्ही कलाकार व्हायचे ठरवतात, होतात तेव्हा तुम्हाला सतत लोकांसमोर दिसावेच लागेल. त्यांच्या नजरेत रहावेच लागेल. असे केले नाही तर लोकं तुम्हाला विसरून जातील. तुम्हाला ओळख टिकवून ठेवण्यासाठी असे करणे भाग आहे. हे असे करणे जर तुम्हाला चॅलेंज वाटत असेल, तर कलाकार नका होऊ. तुम्हाला नेहमीच मनात वाटत असते की, लोकांनी तुमहाला ओळखावे, तुमच्याजवळ यावे, सेल्फी काढावेत. पण जेव्हा असे घडते तेव्हा तुम्ही त्याची खिल्ली उडवतात. ‘हे खूप आव्हानात्मक आहे, माझे खासगी आयुष्य लोकांसमोर येत असते.’ अस म्हणतात. जर तुम्ही असाच विचार खरंच करत असाल तर मग तुम्ही या क्षेत्रात का आलात? कलाकार होण्यापूर्वी तुम्हाला माहित असते की हे असेच घडणार आहे. काही लोकं तर यासाठीच याक्षेत्रात येतात. कलाकारांना देखील तेच हवे असते.”
गश्मीर पुढे म्हणाला, “प्रत्येक कलाकारांना लोकांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावे हेच पाहिजे असते. या गोष्टींना जे खोटे आहे असे बोलतात तेच खोटं बोलत असतात. सोशल मीडियावर लोकं तर सर्रास आपले खोटा चेहरा दाखवतात. खोटं बोलतात. कलाकारांच्या काही गोष्टी फक्त बोलण्यासाठीच असतात. माझ्यासह प्रत्येक अभिनेत्याला लोकांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावे त्यांच्या मागे मागे यावे असेच वाटत असते. ज्या दिवशी लोकं कलाकारांना पाहणे बंद करतील, तुमच्याकडे लक्ष देणार नाही त्यादिवशी तुम्ही संपाल. तुमचे करियर संपेल.”
======
हे देखील वाचा : मॉन्सूनमध्ये साडीत आकर्षक दिसण्यासाठी टिप्स
======
पुढे गश्मीर म्हणाला, “कलाकार कधीच त्यांचे वैयक्तिक आयु्ष्य, गोष्टी लोकांना दाखवत नाही. त्यांचे हे आयुष्य कोणीही पाहू शकणारही नाही. कलाकारांच्या घरात काय आहे, त्यांच्या बेडरूममध्ये काय आहे, हे सर्व खासगीच तर आहे. ते जोपर्यंत याचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकत नाही तोपर्यंत तोपर्यंत ते कोणीच पाहू शकणार नाही. कलाकार स्वतःच सर्व दाखवता आणि मग आमचे वैयक्तिक आयुष्य खासगी राहू द्या. म्हणतात.”
दरम्यान गश्मीरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्याने मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून, हिंदीमध्ये अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे.