Home » अभिनेता अक्षय कुमार कॅनडाचे नागरिकत्व सोडणार

अभिनेता अक्षय कुमार कॅनडाचे नागरिकत्व सोडणार

by Team Gajawaja
0 comment
Akshay Kumar
Share

माझा भारतच माझ्यासाठी सर्व काही आहे….असं म्हणत अभिनेता अक्षय कुमारनं (Akshay Kumar) कॅनडाचे नागरिकत्व आपण सोडणार असल्याची बातमी सोशल मिडियाच्या मार्फत चाहत्यांना दिली आहे. अक्षयनं हा खुलासा केला तेव्हाच त्याचा चित्रपट सेल्फी हा बॉक्स ऑफीसवर पार मार खात आहे. आणि त्यातच त्याच्या मुलाची बातमीही चर्चेत आली आहे. अक्षयचा मुलगा, आरव हा लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यु करीत असून मुलाला बॉलिवूडमध्ये लॉन्च करताना अक्षय आवश्यक ती सर्व काळजी घेत आहे. याशिवाय अक्षय निवडणुकीच्या मैदानात उतरणार अशीही चर्चा आहे. येत्या लोकसभा निवडणुकी आधी अक्षयच्या (Akshay Kumar) नावासमोर भारतीय हा स्टॅम्प लागणे गरजेचे आहे. त्यामुळेच कॅनडाचे नागरिकत्व सोडण्यासाठी हा खिलाडी कुमार तयार झाल्याची चर्चा रंगली आहे.  या सर्व कारणांपलीकडे अक्षयची बाजू मात्र वेगळी आहे. सततच्या फ्लॉप चित्रपटांमुळे आपण कॅनडाला स्थलांतरीत होण्याचा निर्णय घेतला होता.  पण त्याचवेळी चित्रपट यशस्वी झाले, आणि कॅनडाला जाण्याचा निर्णय रद्द केला, अशी सफाई अक्षयनं दिली आहे. या सर्वात पुन्हा एकदा अक्षय आणि त्याच्या कॅनडाच्या नागरिकत्वाची चर्चा रंगली आहे.  

अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘सेल्फी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. अक्षयच्या गेल्या काही चित्रपटांना फ्लॉप असा शिक्का बसला आहे. सेल्फी हा चित्रपटही त्याच परंपरेत जमा होण्यासारखा असल्याची प्रतिक्रीया येत आहे. यातच अक्षयनं मात्र सेल्फीचे जोरदार प्रमोशन सुरु केले आहे.  या सर्वात त्यानं त्याचे भारतीय कार्ड पुढे केले आहे.  गेल्या अनेक वर्षापासून अक्षयकुमार (Akshay Kumar) कॅनडाचा नागरिक असल्यामुळे ट्रोल होत आहे.  भारतीयांना मतदान करा, असे आवाहन करणारा अक्षय स्वतः भारतीय आहे का…हा प्रश्न अनेकवेळा उपस्थित केला गेला.  शिवाय गेल्या काही वर्षात अक्षय राजकारणात येणार अशीही चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी,  उत्तरप्रदेशचे  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर त्याची जवळीक चर्चेत राहिली.  त्याचवेळी त्याच्या नागरिकत्वामुळे त्याला टिकेचे धनीही व्हायला लागले आहे.  

सध्या अक्षयचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटले आहेत.  काहींना ओटीटीवरही यश मिळवता आले नाही. यामध्ये ‘राम सेतू’, ‘कठपुतली’, ‘रक्षा बंधन’, ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘बच्चन पांडे’ आणि ‘अतरंगी रे’ यांचा समावेश आहे. आता त्याचा ‘सेल्फी’ चित्रपट 24 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.  यात अक्षय सोबत इमरान हाश्मी आणि नुसरत भरुचाही महत्त्वाची भूमिका आहे. या सेल्फीच्या प्रमोशनसाठी अक्षय प्रयत्न करीत आहे.  त्यावेळी त्यानं त्याच्यावर होणा-या टिकेला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. अक्षय कुमारनं आपण कॅनडाचे नागरिकत्व सोडण्याची प्रक्रीया सुरु केल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. याचवेळी त्यानं कॅनडाचे नागरिकत्व का स्विकारले, याचा खुलासाही केला आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar) म्हणतो की, भारतच त्याच्यासाठी सर्वस्व आहे आणि त्याने आधीच पासपोर्ट बदलण्यासाठी अर्ज केला आहे. त्याचवेळी, त्याच्या कॅनेडियन नागरिकत्वाचे कारण न समजता लोक काही बोलतात तेव्हा वाईट वाटते, असेही त्याने सांगितले आहे.  आपल्याला जे यश दिलं आहे, ते याच भूमीनं दिल आहे.  भारताचा मला प्रचंड अभिमान आहे. 1990 च्या दशकात 15 हून अधिक चित्रपट फ्लॉप झाल्यावर आपण आपल्या भविष्याबाबत चिंतीत झालो होतो, अशावेळी चित्रपट चालले नाहीत तर अन्य काहीतरी काम करावे लागेल हा हिशोब होता.  म्हणूनच  एका मित्राच्या सल्ल्यानुसार कॅनडाच्या पासपोर्टसाठी अर्ज केला. याचवेळी दोन चित्रपट प्रदर्शित व्हायचे होते.  सुदैवानं हे दोन्ही सुपरहिट झाले.  आणि  मला आणखी काही चित्रपट मिळाले. यासर्वात आपल्याकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे, हे विसरल्याचे सांगत अक्षयनं हा  पासपोर्ट बदलण्यासाठी अर्ज केल्याचेही सांगितले आहे. अर्थात या गोष्टीवरुनही अक्षय (Akshay Kumar) पुन्हा ट्रोल झाला आहे.  कारण 2019 मध्येच अक्षयनं पासपोर्ट बदलण्यासाठी अर्ज केल्याचे स्पष्ट केले होते. अजूनही तो कॅनडाचा नागरिक आहे का म्हणून त्याला विचारणा होत आहे.  आत्ताही त्याचे लागोपाठ चित्रपट फ्लॉप होत आहेत. सेल्फीही चित्रपट याच दिशेने सुरु आहे.  तेव्हा आत्ता पुन्हा अक्षयला त्याच्या भारतीयत्वाची आठवण झाली का असा प्रश्नही त्याला विचारण्यात येत आहे.  

======

हे देखील वाचा : सोनू निगम सोबत सेल्फी काढण्यासाठी धक्काबुक्की, शिवसेना आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल

======

शिवाय अक्षयचा (Akshay Kumar) मुलगा आरवही लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यार असल्याची माहिती आहे. आरव सध्या सिंगापूरमध्ये शिकत आहे.  त्यालाही त्याच्या वडीलांप्रमाणे मार्शल आर्टची आवड आहे. आरव वयाच्या चौथ्या वर्षापासून मार्शल आर्ट शिकत आहे. त्याने ओकिनावा, कुडो आणि गोजू र्यू कराटेमध्ये ब्लॅक ब्लॅट्स जिंकले आहेत आणि ज्युडो राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.  हाच आरव आता बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत आहे.  आपल्या मुलावर टिका होऊ नये म्हणून अक्षय आधीच काळजी घेत असून, यामुळेच त्यानं कॅनडाचा पासपोर्ट बदलण्याची प्रक्रीया केल्याचीही चर्चा आहे.  स्वतः अक्षयचेही काही चित्रपट प्रदर्शनाच्या रांगेत आहेत. अक्षय कुमार टायगर श्रॉफसोबत मोठ्या ‘मियां छोटे मियाँ’मध्ये दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे ‘ओह माय गॉड 2’,  ‘फिर हेरा फेरी 2’ सारखे चित्रपट आहेत.  सेल्फीवर टिका झाल्यावर आता या चित्रपटांना तरी यश मिळाले पाहिजे म्हणून अक्षयचा प्रयत्न आहे. शिवाय पुढच्या वर्षी होणा-या लोकसभा निवडणुकांमध्येही अक्षय मैदानात उतरणार अशी चर्चा आहे.  अर्थात अक्षयनं नेमक्या कोणत्या कारणासाठी कॅनडाचा पासपोर्ट बदलला हे लवकरच स्पष्ट होणार आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.