इराकच्या न्यायालयानं दिलेल्या एका निकालानं जगाच्या भुवया उंचावल्या आहेत. मानवता संघटनांनी यावर आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे. तर मुस्लिम बहुल देशांनीही या निकालाचा पुर्नविचार व्हावा अशी भूमिका व्यक्त केली आहे. हा निर्णय एका महिलेबाबत आहे, या महिलेला फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. ही महिला म्हणजे, अस्मा मोहम्मद. अस्मा ही इसिसचा माजी प्रमुख अबू बकर अल बगदादीची पत्नी आहे. अस्माच्या विरोधात अनेक महिलांनी न्यायालयात दाद मागितली आहे. बगदादच्या तुरुंगात असलेल्या अस्मावर महिलांना वेश्याव्यवसायात ढकलल्याचा आरोप आहे. (Asma Mohammad)
अबू बकर अल बगदादीच्या काळात याझिदी महिलांचे अपहरण करुन त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. या अपहरणात आपल्या पतीला अस्मानंही मदत केल्याचा आरोप न्यायालयात सिद्ध झाला आणि तिला फाशीची शिक्षा मिळाली आहे. अस्माच्या फाशीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह लावले असले, तरी अस्मानं आपल्या पतीला ज्या कामात सहकार्य केले, ते काम अतिशय निंदनीय असल्याचे न्यायालयानं स्पष्ट केले आहे. अस्मामुळे अनेक मुलींचे आयुष्य उदधवस्त झाली आहेत. अल बगदादी यानं जशी दहशत प्रस्तापित केली होती, तशीच त्याच्या पत्नीचीही दहशत होती. म्हणूनच तिला फाशी देत असल्याचे न्यायालयानं स्पष्ट केले आहे. इराकच्या सुप्रीम ज्युडिशियल कौन्सिलने अस्माला दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत शिक्षा दिल्याचेही सांगितले आहे.
दहशतवाद्याची माहिती करुन घेणे गरजेचे आहे. अबू बकर अल बगदादी हा दहशतवादी संघटना ISIS चा प्रमुख होता. २७ ऑक्टोबर २०१९ रोजी अमेरिकेने विशेष ऑपरेशनद्वारे सीरियात प्रवेश केला आणि त्याला ठार केले. बगदादीचा जन्म इराकमधील समराई शहरात एका सुन्नी कुटुंबात झाला. बगदादीचे खरे नाव इब्राहिम अव्वाद इब्राहिम अल-बद्री होते. त्यांनी बगदाद विद्याअस्मा मोहम्मदला इराकच्या न्यायालयानं दिलेल्या फाशीची चर्चा सुरु आहे. अस्मा मोहम्मद कोण हे जाणून घेण्याआगोदर अल बगदादी यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि नंतर पीएचडीही केली. त्यानंतर त्यांनी काही वर्षे इमाम म्हणून काम केले. (Asma Mohammad)
२००३ मध्ये अमेरिकेनं इराकचा हुकुमशहा सद्दाम हुसेनचा पाडाव केला आणि बगदादीने अमेरिकेचा बदला घेण्याचा निर्धार केला. त्यानं एक दहशतवादी संघटना चालू केली. त्यातून तो अमेरिकेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करु लागला. त्याला २००४ मध्ये अमेरिकन सैन्यानं अटकही केली. पण त्याची दहा महिन्यानं सुटका झाली. त्यानंतर बगदादीनं अल कायदा या दहशतवादी संघटनेत प्रवेश केला. लवकरच तो या संघटनेच्या प्रमुख पदापर्यंत पोहचला. २०१३ मध्ये बगदादीने इराक आणि सीरियामध्ये जागा मिळवली. मग त्यानं आयएसची स्थापना केली. २०१४ मध्ये इराकचा बहुतांश भाग त्याच्या ताब्यात होता.
२०१९ मध्ये त्याच्या ठिकाणावर अमेरिकेनं हल्ला केला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. बगदादी जेव्हा अमेरिकन सैन्यावर हल्ला करण्याची योजना आखत होता, तेव्हाच त्याच्या पत्नीला अस्माला २०१८ मध्येअधिका-यांनी पकडले होते. तिच्यावर याझिदी महिलांना आपल्या घरात जबरदस्तीनं लपवून त्यांना ISIS च्या ताब्यात दिल्याचा आरोप होता. ISIS ने या महिलांना वेश्याव्यवसाय करण्यासाठी भाग पाडले. तेव्हापासूनच अस्मा मोहम्मदवर खटला चालू आहे. यझिदी महिलांनीच न्यायालयात हा खटला दाखल केला. त्यानंतर त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची कथा जगभर समजली. ISIS ने हजारो याझिदी महिलांना पकडून त्यांची हत्या केली. (Asma Mohammad)
====================
हे देखील वाचा : इराणच्या चाव्या डॉक्टरच्या हातात
====================
अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केले. शिवाय त्यांना हिंसक गुन्हे करण्यास भाग पाडले. यातील पीडित महिलांनी अस्मा विरुद्ध दिवाणी दावा दाखल केला. या आरोपांमध्ये दहशतवादी संघटनेशी संगनमत करून अपहरण करणे, बेकायदेशीरपणे ताब्यात घेणे आणि अल्पसंख्याक समाजातील महिलांविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांमध्ये मदत करणे यासारखे गुन्हे अस्मावर लावण्यात आले. अर्थातच या सर्व आरोपांना अस्मानं फेटाळून लावले. आपल्यावर अल बगदादीनं यासाठी जबरदस्ती केल्याचे तिनं सांगितले आहे.
अस्माला झालेली शिक्षा महत्त्वाची आहे कारण, अबू बकर अल बगदादीच्या नेतृत्वाखालील दहशतवादी संघटनेने अद्यापही लेव्हंट प्रदेशाचा मोठा भाग व्यापलेला आहे. अशावेळी इराकमधील न्यायालयाने अस्माला फाशीची शिक्षा सुनावली आहे. अस्मा ISIS मध्ये उम्म हुदैफा या नावानेही ओळखली जाते. तिच्या या शिक्षेचा अनेकांनी विरोध केला तरी ज्या याझिदी महिलांना अस्मामुळे नरक यातना सोसाव्या लागल्या आहेत, त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. अस्मा सध्या इराकच्या तुरुंगात आहे. (Asma Mohammad)
सई बने