Home » अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या लग्नाबद्दल अभिनेता सुनील शेट्टीने व्यक्त केले त्याचे मत, म्हणाला…

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या लग्नाबद्दल अभिनेता सुनील शेट्टीने व्यक्त केले त्याचे मत, म्हणाला…

by Team Gajawaja
0 comment
Suniel Shetty
Share

बॉलिवूडसाठी २०२२ हे वर्ष खऱ्या अर्थाने संस्मरणीय ठरताना दिसत आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी यावर्षी लग्नबंधनात अडकले आहे. तर काही लवकरच अडणार आहेत. या लवकरच लग्न करणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के.एल राहुल यांच्या नावाचा देखील समावेश करण्यात आला आहे. हे दोघं यावर्षी अखेरीस लग्न करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु असून, असे झाले तर पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर अशी नवीन जोडी पाहायला मिळेल. या दोघांच्या लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा मीडियामध्ये तुफान होत असून त्यामुळे त्यांचे फॅन्स देखील उत्सुक झाले आहेत. या लग्नावर अजून अथिया किंवा राहुल यांच्याकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आले नसले तरी यावर अथियाचे वडील असलेल्या अभिनेते सुनील शेट्टी(Suniel Shetty) यांनी त्यांचे मत स्पष्ट केले आहे. 

नुकत्याच झालेल्या एका मुलाखती दरम्यान सुनील शेट्टी(Suniel Shetty)यांनी पत्रकारांनी अथिया आणि राहुल यांच्या लग्नाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, अथिया आणि राहुल दोघेही समजदार असून त्यांचे निर्णय ते घेऊ शकतात. त्यांच्यासोबत माझा आशीर्वाद कायमच राहील. अथिया आणि राहुल यांच्या लग्नाबद्दल सध्या मीडियामध्ये सुरु असणाऱ्या अनेक बातम्यांवर किंबहुना अफवांवर भाष्य करताना सुनील(Suniel Shetty) म्हणाला, “ती माझी मुलगी आहे, ती कधी ना कधी नक्कीच लग्न करणार. माझी इच्छा आहे की, माझ्या मुलीचे देखील लग्न होवो, आणि जितक्या लवकर होईल तितक्या लवकर होवो. ही त्यांची आवड असेल. के एल राहुलबद्दल सांगायचे झाले तर मला तो आवडतो. आता त्या दोघांना ठरवायचे आहे की त्यांना काय करायचे. कारण आता काळ बदलला आहे. मुलगा आणि मुलगी दोघेही जबाबदार आहेत. त्यामुळे माझी इच्छा असेल की त्यांनी ठरवावे त्यांना काय करायचे आहे ते. माझा आशीर्वाद नेहमीच त्यांच्या सोबत असेल.”

अभिनेत्री अथिया शेट्टीने सलमान खान प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या ‘हिरो’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात तिच्यासोबत सूरज पांचोली मुख्य भूमिकेत होता. हा सिनेमा सरासरी ठरला. पुढे तिने अर्जुन कपूर आणि अनिल कपूर यांच्यासोबत ‘मुबारकां’ सिनेमात काम केले.(Suniel Shetty) अथिया तिच्या चित्रपटांपेक्षा अधिक तिच्या वैयक्तिक आणि खासकरून तिच्या लव्हलाइफमुळेच जास्त गाजली. सुरुवातीला आपले नाते नाकारणाऱ्या अथिया आणि राहुलने नंतर सर्रास सोशल मीडियावर एकमेकांसोबत फोटो टाकण्यास सुरुवात केली. अथिया राहुलसोबत अनेकदा त्याच्या सामन्यांना देखील हजेरी लावताना दिसते(Suniel Shetty).


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.