कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी आवळा नवमी म्हणून साजरी केली जाते. याला अक्षय नवमी, आमला नवमी असे देखील म्हणतात. हा सण देव उठनी एकादशीच्या दोन दिवस आधी येतो. असे मानले जाते की, सत्ययुगाची सुरुवात याच दिवशी झाली होती. मान्यतेनुसार, कार्तिक शुक्ल नवमीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत भगवान विष्णू आवळ्याच्या झाडावर वास करतात. या दिवशी आवळा वृक्ष, भगवान भोलेनाथ आणि श्री हरी विष्णू-लक्ष्मी यांची आवळ्याच्या झाडाखाली बसून पूजा केली जाते. (Amla Navmi)
यंदा कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीची सुरुवात गुरुवार, ३० ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०६ वाजता होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवार, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०३ वाजता या तिथीची समाप्ती होईल. यावर्षी अक्षया नवमी शुक्रवार, ३१ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे. आवळा नवमीच्या दिवशी स्त्रिया आवळ्याच्या झाडाखाली बसून संतान प्राप्ती आणि संतान रक्षेसाठी पूजा करतात. आवळा नवमीला आवळ्याच्या झाडाखाली बसून भोजन करण्याची देखील परंपरा आहे. देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्तीसाठी देखील ही पूजा केली जाते. या दिवशी जर काही छोटे उपाय केले तर घरात सुख समृद्धी नांदते आणि कुटुंबातील लोकांना निरोगी उदंड आयुष्य लाभते. आवळा नवमीच्या दिवशी कोणते उपाय करावे जाणून घेऊया. (Marathi News)
* अक्षय नवमीच्या दिवशी आवळा वृक्षाची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी आवळ्याच्या झाडाला दूध अर्पण करावे आणि पूर्वेकडे तोंड करून ॐ धात्र्ये नमः या मंत्राचा जप करावा. असे केल्याने भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो आणि कुटुंबात सुख-समृद्धी नांदते. (Todays Marathi Headline)
* याशिवाय या दिवशी आवळ्याच्या झाडाच्या पानांवर हळद लावून स्वस्तिकाचे शुभ चिन्ह बनवून त्या पानांवर वंदनवार बनवून घराच्या मुख्य गेटवर टांगू शकता. यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येईल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि घरातील कलहही दूर होईल.
* अक्षय्य नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची कापूर आणि तुपाच्या दिव्याने आरती करून १०८ वेळा प्रदक्षिणा घालावी. यासोबतच आवळा वृक्षाखाली ब्राह्मण, गरीब, गरजू लोकांना अन्नदान करावे. स्वत: देखील आवळाच्या वृक्षाखाली बसून जेवावे. असे केल्याने देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगतीही होते. (Todays Marathi Headline)

* अक्षय्य नवमीच्या दिवशी आवळा रोपाचे दान करणे खूप शुभ मानले जाते. यासोबतच घराच्या उत्तर दिशेला आवळ्याचे झाड लावावे. उत्तर दिशेला झाड लावणे शक्य नसेल तर ते पूर्व दिशेला लावावे. असे केल्याने वास्तू दोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते, ज्यामुळे घरातील सर्व सदस्यांच्या समस्या दूर होतात. (Top Marathi News)
* या दिवशी आवळा बिया हिरव्या कपड्यात बांधून ठेवल्यास आर्थिक फायदा होतो. हे बंडल तुम्ही पैशाच्या जागी किंवा तिजोरीतही ठेवू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार व्यावसायिकांनी बियांचा हा गुच्छा आपल्या गळ्यात ठेवावा. यामुळे व्यवसायात फायदा होईल. (Top Trending Headline)
* अक्षय नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करून हनुमानास शेंदूर, वस्त्र आणि सुपारी अर्पण करा. यानंतर, प्रार्थना करा आणि सुंदरकांडचे पठण करा. असे केल्याने तुमचे सर्व त्रास दूर होतात आणि तुम्हाला सर्व समस्यांपासून आराम मिळतो.
* आवळ्याच्या बिया हिरव्या कपड्यात बांधून ठेवल्यास आर्थिक लाभ होतो. ही गाठोडी तुम्ही तिजोरीत किंवा पैशाच्या जागीही ठेवू शकता. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्ही आवळा बियांची बांधलेली पुरचूंडी तुमच्या पैश्याच्या पिशवीत ठेवू शकता. असे केल्याने व्यवसायात कधीही नुकसान होणार नाही. (Latest Marathi Headline)
========
Amla Navami : जाणून घ्या आवळा नवमीचे महत्त्व आणि माहिती
========
* आवळा नवमीला आवळा झाडाच्या मुळाशी नाणे पुरणे शुभ मानले जाते. असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारते आणि देवी लक्ष्मी घरात वास करते.
* आवळा नवमीला भगवान विष्णूने कुष्मांडक राक्षसाचा वध केला.याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने कंसाचा वध करण्यापूर्वी तीन वनांची परिक्रमा केली होती.आजही लोक अक्षय नवमीला मथुरा-वृंदावन प्रदक्षिणा करतात.संतती प्राप्तीसाठी या नवमीच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे.या व्रतामध्ये भगवान श्रीहरींचे स्मरण करून रात्र जागरण करावे. (Social News)
(टीपः ही माहिती केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
