युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार जारी केले होते. आता आधार अथॉरिटीने दहा वर्षांपूर्वी आधार क्रमांक मिळावलेल्या धारकांसाठी काही अपडेट नियम जारी केले आहेत. या नियमाअंतर्गत आजपासून १० वर्षाआधी आधार कार्ड बनवलेल्या व्यक्तींना पुन्हा एकदा आपल्या कागदपत्रांची माहिती देऊन आधार कार्ड अपडेट करावे लागणार आहे. हे काम तुम्ही घरबसल्या सुद्धा ऑनलाईन पद्धतीने करु शकता. अथवा ऑफलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही करु शकता. (Aadhar Card Update)
खरंतर वर्ष २०२२ च्या अखेरच्या महिन्यात आधार बनवणाऱ्या यूआयडीएआयने आधार कार्ड अपडेट करण्यासंदर्भात अलर्ट जाहीर केला आहे. अथॉरिटीने असे म्हटले की, जर तुम्ही आधार कार्ड बनवून १० वर्ष झाली असतील तर आणि तुम्ही एखाद्या शासकीय योजनेचा लाभ घेत असल्यास तुम्हाला हे करणे अनिवार्य असणार आहे. मात्र असे न केल्यास तुम्हाला शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही आहे. आधार कार्ड मध्ये POA आणि POI अपडेट ठेवणे गरजेचे आहे. जर तुमचा POI आणि POA अपडेच नसेल तर तुम्हाला ते लवकर करावे लागणार आहे.
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पुढील कागदपत्र द्यावी लागणार
तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी अशा कागदपत्रांची गरज भासणार आहे ज्यामध्ये नाव आणि फोटो असेल. अशातच तुम्ही तुमचे पॅन कार्ड, वोटर आयडी, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग परवाना, बँक पासबुक, मॅरिज सर्टिफिकेट, शेतकरी पासबुक किंवा अन्य कागदपत्र द्यावे लागणार आहे.
अपडेट करण्यासाठी किती रुपये द्यावे लागणार?
आधार कार्ड अपडेटेशन ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहे. तर ऑनलाईनसाठी तुम्हाला myaadharupdated पोर्टलला भेट द्यावी लागणार आहे. तेथे तुम्हाला काही कागदपत्र ही द्यावी लागतील. त्यासाठी तुम्हाला केवळ २५ रुपये जमा करावे लागणार आहेत. (Aadhar Card Update)
हे देखील वाचा- कर्जधारकांना झटका! ग्राहकांना न सांगताच बँक वाढवणार कर्जाचा व्याज दर
कसे कराल अपडेट?
-आता तुम्हाला पोर्टलवर जाऊन Update your adress on;ine वर क्लिक करा
-आता एक नवे पेज सुरु होईल
-तेथे आपला १२ अंकी डिजिटल आधार क्रमांक द्या
-आता ओटीपीवर क्लिक करा
-येथे तुम्हाला रजिस्ट्रर मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल तो द्या
-असे केल्यानंतर ती कागदपत्र द्या जी तुम्ही वेरिफिकेशनसाठी POA च्या आधारावर दिले आहे
-वेरिफिकेशन केलेल्या पत्त्याची कॉपी द्या आमि सबमिट बटणावर क्लिक करा
-अशा प्रकारे तुमच्या आधार अपडेटची रिक्वेस्ट स्विकार होईलय
-असे केल्यानंतर तुम्ही myAadhar अॅपच्याम मदतीने तुम्ही कागदपत्र अपडेट करु शकता