Aadhaar Misuse- आधार कार्ड सध्या आपल्या महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक झाले आहे. देशातील बहुतांश लोक आधार कार्डच्या माध्यमातून काही शासकीय योजनांचा लाभ घेताना दिसून येतात. तसेच अन्य महत्वाच्या कामांसाठी सुद्धा आधार कार्ड असणे अनिवार्य करण्यात आले आहे. अशातच जर तुमच्या आधार कार्डच्या चुकीच्या मार्गाने वापर केल्यास तुम्ही धोक्यात येऊ शकता. तर आधार कार्डचा गैरमार्गासाठी वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे आधार कार्डचा चुकीच्या कामासाठी तर वापर केला जात नाही आहे ना हे कसे पहायचे आणि त्यासंबंधित काही महत्वाच्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.
तुमचे आधार कार्ड तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने सुद्धा वॅलिडेट करु शकता. त्यासाठी उपभोक्त्याला आपले ई-आधार कार्ड, आधार पत्र किंवा आधार पीवीसी कार्डावरील क्युआर कोड स्कॅन करुन आपल्या चुका ऑफलाईन पद्धतीने दुरुस्त करता येणार आहेत. तर ऑनलाईन वेरिफिकेशनसाठी तुम्हाला https://myaadhaar या संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे.
हे देखील वाचा- वाहतूक विभागाकडून ई-चलान पाठवलेय? घरबसल्या अशा पद्धतीने भरा दंड

जाणून घ्या तुमचे आधार कार्ड सुरक्षित आहे की नाही
आधार कार्ड संबंधित अधिक माहितीसाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. त्यानंतर आधार सर्विसखाली तुम्हाला ऑथेंटिकेशन हिस्ट्री ऑप्शन मिळेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक द्यावा लागणार आहे. तसेच तुम्हाला जो सुरक्षा कोड दिसतोय तो तेथे टाकावा लागणार आहे. आता ओटीपीच्या ऑप्शनवर क्लिक करा.
त्यानंतर आता तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल. आता तो ओटीपी तेथे दिल्यानंतर सबमिटच्या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर ऑथेंटिकेशन टाइप, डेट रेंज आणि ओटीपीसह मागितलेली अन्य माहिती सुद्धा द्यावी लागणार आहे. आता तुम्हाला वेरिफाय ओटीपीवर क्किक करावे लागणार आहे. आता तुमच्या समोर एक लिस्ट येईल. येथे तुम्ही ६ महिन्यापर्यंतचा डेटा ठेवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही आधार कार्डची माहिती अगदी सहज मिळवू शकता.(Aadhaar Misuse)
कुठे कराल तक्रार
जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या आधार कार्डचा चुकीच्या पद्धतीने वापर केला गेलाय तर तुम्ही लगेच तक्रार करु शकता. त्यासाठी टोल फ्री क्रमांक १९४७ वर कॉल करु शकता किंवा help@uidai.gov.in येथे ईमेल पाठवू शकता. तर अशा पद्दतीने तुम्ही तुमच्या आधार कार्ड संबंधित माहिती मिळवू शकतात. पण तुमच्या आधार कार्डचा गैरवापर केलाय का हे सुद्धा तपासून पाहू शकता.