Home » राजा चार्ल्स यांना मुंबईच्या डबेवाल्यांची भेट

राजा चार्ल्स यांना मुंबईच्या डबेवाल्यांची भेट

by Team Gajawaja
0 comment
King Charles
Share

ब्रिटनचे महाराजा चार्ल्स तिसरे यांचा राज्यभिषेक मोठ्या उत्साहात सुरु होत आहे. यासाठी सर्व विधी सुरु झाले आहेत. या राज्यभिषेक सोहळ्यासाठीच्या सुरक्षा मोहिमेला ‘गोल्डन ऑर्ब’ असे नाव देण्यात आले आहे. तब्बल 29,000 पोलिस अधिकारी ब्रिटनचा राजा चार्ल्स (King Charles) तिसरा आणि राणी कॅमिला यांच्या राज्यभिषेक सोहळ्याच्या बंदोबस्तासाठी हजर आहेत. विशेष म्हणजे, मुंबईच्या डब्बावाल्यांनाही राजा चार्ल्सला (King Charles) यांच्या राज्यभिषेक सोहळ्याचे आमंत्रण आहे. मुंबईच्या डब्बावाल्यांनी राजा चार्ल्सला विशेष भेट पाठवून दिली आहे.  

ब्रिटनचा राजा चार्ल्स (King Charles) तिसरा आणि राणी कॅमिला यांचा राज्याभिषेक सोहळा सुरु झाला आहे. यासाठी कडेकोट सुरक्षा असून आठवडाभर 29,000 हून अधिक पोलीस अधिकारी तैनात आहेत. या मोहिमेला ‘गोल्डन ऑर्ब’ असे नाव देण्यात आले असून लंडनमधील हे आतापर्यंतचे सर्वात मोठे सुरक्षा ऑपरेशन आहे. राजाच्या राजवाड्याबाहेर दोन दिवसांपूर्वी काडतुसे आढळून आल्यानं खळबळ उडाली होती. त्यामुळे हा राज्यभिषेक सोहळा अत्यंत बंदोबस्तात होत आहे. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो लंडनवासी आणि पर्यटकांनी राजवाड्याभोवती गर्दी केली आहे. हा सोहळा जगभर थेट पाहताही येणार आहे. भारतासाठी विशेष म्हणजे, राजा चार्ल्स (King Charles) यांचे मित्र म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, त्या मुंबईच्या डबेवाल्यांना या सोहळ्याचे आमंत्रण मिळाले असून  ब्रिटनचा राजा चार्ल्स तिसरा यांना राज्यभिषेक सोहळ्यासाठी भेट म्हणून डब्बावाल्यांनी पुणेरी पगडी आणि शाल घेतली आहे. राज्यभिषेकाच्या आदल्या दिवशी, पश्चिम भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त ॲलन गेमेल यांनी मुंबईत त्यांच्या सन्मानार्थ एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ही भेट ब्रिटीश उच्चायुक्तांकडे सुपूर्द करण्यात आली.  

दरम्यान संपूर्ण ब्रिटन राज्यभिषेक सोहळ्यासाठी सज्ज आहे. लंडनमधील वेस्टमिन्स्टर ॲबे येथे 6 मे रोजी हा राज्याभिषेक सोहळा होईल.  बकिंगहॅम पॅलेसने यासंदर्भात माहितीपत्रक जाहीर केले आहे. राज्यभिषेक शनिवार आणि रविवारी होईल. 7 मे रोजी लंडनच्या पश्चिमेला विंडसर कॅसल येथे भव्य स्वागत समारंभ होणार आहे. त्यानंतर राज्याभिषेकाशी संबंधित शेवटचा कार्यक्रम 8 मे रोजी होणार आहे. किंग चार्ल्स या राज्यभिषेकासाठी खास पोशाख परिधान करणार आहेत. राजघराण्याचे काही पोशाख असे आहेत की, त्यांची रचना शतकानुशतके जुनी आहे. ब्रिटनच्या 3 सम्राटांनी हा पोशाख परिधान केला आहे. त्यांचा हा पोशाख लष्करी सेनापतीसारखा असून हा राजघराण्याचा परंपरागत पोशाख आहे. या राज्यभिषेक सोहळ्याला ‘ऑपरेशन गोल्डन ऑर्ब’ असे नाव देण्यात आले असून त्यातील प्रत्येक गोष्ट ही ब्रिटीश राजघराण्याच्या परंपरेनुसार करण्यात येणार आहे.  

दरम्यान किंग चार्ल्स तिसरे यांचा राज्याभिषेक झाल्यावर ते काही महिन्यांनी भारताला भेट देणार असल्याची माहिती आहे. भारतीय वंशाचे उद्योगपती आणि खासदार करण बिलिमोरिया यांनी ही माहिती दिली आहे. ब्रिटनचे राजा चार्ल्स (King Charles) तिसरे यांना भारताच्या भेटीवर जायचे आहे आणि ती भेट लवकरच नियोजित होऊ शकते, अशी माहिती त्यांनी दिली. राजा चार्ल्स आणि राणी कॅमिला यांच्या राज्याभिषेक समारंभाच्या आधी झालेल्या खासदारांच्या बैठकीत बिलिमोरिया बोलत होते.  

======

हे देखील वाचा : क्रेमलिन म्हणजे काय?

======

 शनिवार आणि रविवारी होणारा हा राजा चार्ल्स (King Charles) यांचा राज्याभिषेक सोहळा भारतीयांसाठी अधिक उत्सुकतेचा ठरणार आहे. त्यामागे भारताचा कोहिनूर हिरा आहे. भारताचा हा बहुमुल्य हिरा, ब्रिटीशांनी आपल्या देशात नेला. पुढे तो हिरा राणीच्या मुकुटात लावण्यात आला. कोहीनूर आपला असून तो परत द्यावा असा दावा भारतातर्फे अनेकवेळा करण्यात आला आहे. मात्र हा हिरा आपल्याला भेट देण्यात आल्याचे कारण देत ब्रिटनने ही मागणी फेटाळली आहे. या कोहिनूरवर पाकिस्तान, अफगाणिस्ताननंही आपला दावा सांगितला आहे. ब्रिटीश राजघराण्याच्या परंपरेनुसार हा कोहीनूर असलेला मुकुट राणी परिधान करते. प्रिन्स चार्ल्स यांची द्वितीय पत्नी कॅमेला हिच्या डोक्यावर हा मुकूट घालण्यात येणार होता. पण कॅमेला यांनी हा मुकुट घालण्यास नकार दिल्याची माहिती आहे.  त्यांच्या डोक्यावर राज्याभिषेकाच्या दरम्यान अन्य मुकूट घालण्यात येणार असल्याची माहिती आहे. हे करतांना कॅमेला यांनी राजघराण्याची परंपरा तोडल्याचा आरोपही होत आहे. आता कॅमेला राजघराण्याचा मान ठेवण्यासाठी कोहिनूर लावलेला मुकूट घातलतात की अन्य मुकूट घालतात, हे काही तासातच स्पष्ट होणार आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.