Home » बर्गरमधून ई कोलाय नावाचा विषाणू !

बर्गरमधून ई कोलाय नावाचा विषाणू !

by Team Gajawaja
0 comment
America
Share

तमाम अमेरिकन नागरिकांच्या ह्दयावर राज्य करणा-या मॅकडोनाल्डमुळे एका व्हायरसचा प्रचार होत असल्याचे निदर्शनास आल्यानं खळबळ उडाली आहे. अमेरिकतील नागरिक दिवसातून एकदा तरी मॅकडोनाल्डमध्ये जाऊन आपली पोटपुजा करतात. याच मॅकडोनाल्डच्या एका बर्गरमधून ई कोलाय नावाचा विषाणू मानवी शरीरात जात असल्याचे उघड झाले आहे. यामुळे एकाचा मृत्यू झाला असून काहीजणं गंभीर आहेत. मॅकडोनाल्डचे बर्गर खाल्ल्याने संसर्ग होण्याची प्रकरणे अमेरिकेतील 10 राज्यांमध्ये आढळून आली आहेत. त्यापैकी सर्वाधिक प्रकरणे कोलोरॅडो आणि नेब्रास्का सारख्या राज्यांमध्ये आढळून आली आहेत. (America)

या नागरिकांनी जे बर्गर खाल्ले ते गायीच्या मासांपासून तयार करण्यात आले होते. आता यातूनच विषबाधा झाल्यानं मॅकडोनाल्डची काही रेस्टॉरंट बंद करण्यात आली आहेत. तर काहींमधून सदर मेनू मागे घेण्यात आला आहे. याप्रकरणी आत्ता फक्त दहा राज्यात रोगाचा फैलाव झाल्याचा अंदाज आहे. प्रत्यक्षात याप्रकणी अनेकजण रुग्णालयात दाखल आहेत. तर काहींनी घरी राहून औषधं घेण्याचा पर्यांय स्विकारला आहे. त्यामुळे ई कोलाय नावाच्या विषाणूची किती जणांना नेमकी बाधा झाली आहे, याचा नेमका आकडा बाहेर आला नाही.  ई. कोलाय हा विषाणू मुख्यतः मावनी शरीराच्या आतड्यांमध्ये राहतो . दूषित अन्न आणि प्रदूषित पाणी हे या विषाणूचे प्रमुख खाद्य आहे. यामुळे त्याचा आतड्यात फैलाव होतो आणि मग उलटी, तीव्र ताप, अतिसार सारख्या समस्या निर्माण होऊ लागतात. (International News)

ई कोलायवर योग्य उपचार झाले नाही तर हा विषाणू गंभीर स्वरुपात शरीरात फैलावतो. 31 वर्षांपूर्वी म्हणजेच 1993 मध्येही या विषाणूमुळे अनेकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जॅक इन द बॉक्स रेस्टॉरंटमध्ये न शिजवलेले हॅम्बर्गर खाल्ल्याने चार मुलांचा मृत्यू झाला होता. आता त्याच प्रकारचा विषाणू अमेरिकेत पसरला आहे. यामुळे मॅकडोनाल्डच्या रेस्टोरंटमधून बिफ आणि कांदा यांना बाजुला करण्यात आले आहे. मात्र अमेरिकेत मॅकडोनाल्डची मोठी चेन आहे. यातील नेमक्या कुठल्या रेस्टॉरंटमध्ये विषाणूयुक्त बिफ आहे, याचा तपास आता केला जातोय. अमेरिकेत मॅकडोनाल्डची संख्या 15,000 पेक्षा जास्त आहे. (America)

ही निव्वळ फिरती रेस्टॉरंट आहेत. तर 2,770 अन्य रेस्टॉरंट्स आहेत. मॅकडोनाल्ड्स फ्रँचायझी रेस्टॉरंट्स 35,085 वर आहेत. न्यूयॉर्कमध्ये मॅकडोनाल्डच्या फ्रँचायझींची सर्वाधिक संख्या आहे. एकट्या मॅनहॅटनमध्ये 74 मॅकडोनाल्ड आहेत. त्यामुळे अमेरिकेत मॅकडोनाल्ड्समधून ई कोलाय नावाचा संसर्ग पसरल्याची बातमी आली आणि एकच खळबळ उडाली आहे. मॅकडोनाल्ड्सनेही यासंदर्भात तपास सुरु केला. त्यानंतर क्वार्टर पाउंडर हॅम्बर्गरमधून चिरलेला कांदा आणि गोमांस काढून टाकले आहे. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, सप्टेंबरच्या उत्तरार्धात सुरू झालेला हा ई. कोलाय विषाणू आत्तापर्यंत 10 पश्चिम राज्यांमध्ये पसरला आहे. बहुतेक प्रकरणे कोलोरॅडो आणि नेब्रास्कामध्ये नोंदवली गेली आहेत. मात्र आता त्यातील बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ झालीच, शिवाय रुग्णाचा मृयू झाल्यानं प्रशासन जागं झालं आहे. ई कोलाय हा विषाणू साधारण वयोवृद्ध आणि लहान मुलांना सहजपणे आपल्या ताब्यात घेतो. त्यातच अमेकिरेत लहान मुलांमध्ये फुफ्फुसे पांढरे होत असल्याचे आढळून आले आहे. (International News)

======

हे देखील वाचा :  तो आलाय तब्बल ऐंशी हजार वर्षांनी !

======

3 ते 8 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये हे प्रमाण जास्त असल्यानं चिंता व्यक्तकरण्यात येत आहे. ई कोलाय हा विषाणू आणि लहान मुलांमध्ये अधिक वेगानं फैलावत आहे. आता त्यातच ई कोलाय सारख्या घातक विषाणूचा फैलाव अमेकिरेत झाला आहे. या दोन्ही विषाणूंचा परस्परांशी काही संबंध आहे का याचाही तपास तज्ञ करीत आहेत. मॅकडोनाल्डच्या बर्गरमधील जिन्नसांचा यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनतर्फे तपास करण्यात आला आहे. ई कोलाय लक्षणांमध्ये संक्रमित व्यक्तीमध्ये उच्च ताप, जुलाब आणि उलट्या यांचा समावेश होतो. त्याची लक्षणे साधारणपणे तीन ते चार दिवसांनी दिसू लागतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, संक्रमित व्यक्ती स्वतःहून बरी होते, परंतु काही प्रकरणे गंभीर असू शकतात आणि रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागू शकते. ज्या नागरिकांना मधुमेहासारखे आजार आहेत, त्यांनी विशेष काळजी घ्या असे आवाहन करण्यात आले आहे. (America)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.