उत्तरप्रदेशमधील तिर्थराज प्रयागराजची भूमी महाकुंभसाठी सज्ज झाली आहे. 12 वर्षांनी होणा-या महाकुंभसाठी साधुसंतांचे आखाडे या भूमीमध्ये दाखल झाले आहेत. त्यासाठी प्रत्येक आखाडा पेशवाई काढून या महाकुंभस्थानी येत आहे. लाखो साधू आपल्या शस्त्रांस्त्रांसह या भूमीत दाखल होत आहेत. या साधूंचे आशीर्वाद घेण्यासाठी प्रयागराजमध्ये भाविकांची गर्दी होत आहे. महाकुंभ 13 जानेवारी पासून सुरु होणार आहे. या दिवसापासून शाही स्नानाची सुरुवात होणार आहे. 26 फेब्रुवारीपर्यंत हा महाकुंभ चालणार असून या 45 दिवसात हे सर्व संत याच भूमीमध्ये रहाणार आहे. या सर्वात नागा साधूंचे प्रमाण मोठे आहे. फक्त महाकुंभमेळ्यासाठी जगासमोर येणा-या या साधूंची राहणी हा सर्वसामान्यांसाठी उत्सुकतेचा भाग असतो. अंगभर राख लावलेले हे साधू अनेक करतब करत असतात, कधी कोणी आपल्या डोक्यावर हजारो रुद्राक्ष धारण करतात, तर कोणी तराजूवर बसून ध्यानधारणा करतात. महाकुंभसाठी नेपाळहून चालत आलेल्या साधूंचीही संख्या मोठी आहे. या सर्व अनोख्या साधूंना बघण्यासाठी प्रयागराजमधील आखाड्यांमध्ये मोठ्या रांगा लागल्या आहेत. (Uttar Pradesh)
प्रयागराजमधील महाकुंभसाठी आलेल्या साधूंची चर्चा सुरु झाली आहे. त्यात नेपाळच्या महाराज निरंजनी आखाड्याचे संत 750 किमी चालत तपश्चर्या करून विष्णूगिरीवर पोहोचले, नेपाळचे महाराज निरंजनी आखाड्याचे संत विष्णू गिरी महाराज यांचा समावेश आहे. विष्णू गिरी महाराज हे महाकुंभसाठी 750 किलोमीटर अंतर पायी चालत प्रयागराजला पोहचले आहेत. यासाठी ते नऊ महिने आधी नेपाळहून निघाले होते. विष्णू गिरी महाराज हे नेपाळमधील मुक्तिनाथ गोरखा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ते निरंजनी आखाड्याचे संत आहेत. वर्षभरापूर्वी त्यांनी महाकुंभ दरम्यान प्रयागराजला पायी जाण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांनी नेपाळहून 1 एप्रिल 2024 रोजी पायी प्रवास सुरु केला. या दरम्यान ते रस्ताही चुकले. ते थेट शिमल्याला पोहचले. मात्र पुन्हा आपली पायी प्रवास करत त्यांनी योग्यवेळी प्रयागराजमध्ये प्रवेश केला. या सर्व प्रवासात आलेला थकवा संगमस्थानी स्नान केल्यावर दूर झाल्याचे ते सांगतात. निरंजनी आखाड्याच्या प्रयागराजमधील मंडपात आता ते ध्यानधारणा करीत आहेत. (Marathi News)
महाकुंभमधील कॉम्प्युटर बाबाही लोकप्रिय होत आहेत. त्यांचे नाव दास त्यागी असून त्यांनी 1998 मध्ये त्यांनी दिक्षा घेतली. त्यांना आधुनिक तंत्रज्ञानात अधिक रुची असल्यानं त्यांना संगणक बाबा म्हणतात. यासोबत महाकुंभमध्ये पर्यावरण बाबाही आहेत. आव्हान आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर अरुणा गिरी हे पर्यावरण बाबा म्हणून ओळखले जातात. त्यांनी ऑगस्ट 2016 मध्ये वैष्णोदेवी ते कन्याकुमारी या मार्गावर 27 लाख रोपांचे वाटप केले आहे. 12 वर्षानंतर होत असलेल्या या महाकुंभमध्येही त्यांनी 51 हजार रोपं लावण्याचा संकल्प केला आहे. महाकुंभमध्ये असे अनेक बाबा आहेत, जे एक हात करुन ध्यान करत आहेत, कोणी एका पायावर उभं राहून ध्यान करत आहेत. असेच एक महाराज आहेत, दिगंबर हरिवंश गिरी. गेल्या 5 वर्षापासून ते हात वर करुन चालत आहेत. 12 वर्षे असेच चालण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. त्यातूनच सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. महाकुंभ 2025 च्या साधूंपैकी रुद्राक्ष बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी अनेक भाविकांनी गर्दी केली आहे. या रुद्राक्ष बाबांनी 108 रुद्राक्षांची जपमाळ धारण केली आहे. (Uttar Pradesh)
========
हे देखील वाचा : Prayagraj : कठोर कायदे पाळणारा श्री पंचायती महानिर्वाणी आखाडा
Kumbh Mela : गुरू नानक देव यांच्या पुत्राने उभारलाय कुंभ मेळ्यातला हा आखाडा !
======
त्यात एकूण 11,000 रुद्राक्ष असून 11,000 रुद्राक्षांचे वजन 30 किलोपेक्षा जास्त आहे. यासोबत महंत राज गिरी नागा बाबा यांना ॲम्बेसेडर बाबा म्हणून ओळखले जाते. महंत राज गिरी नागा बाबा हे 35 वर्षांपासून ॲम्बेसेडर कार चालवत आहेत. ते जिथे जातात, तिथे आपल्या या गाडीनेच जातात. याच ॲम्बेसेडर कारमध्येच झोपतात. त्यामुळेच त्यांना ॲम्बेसेडर बाबा म्हणून ओळखले जाते. प्रयागराजमध्येही ते याच आपल्या गाडीने दाखल झाले आहेत. राजस्थानमधील भरतपूर येथील हनुमान मंदिराचे महंत बाबा जानकीदास हे सिलेंडर बाबा म्हणून ओळखले जातात. ते 66 वर्षांचे असून त्यांची दाढी 21 फूट लांब आहे. ते या दाढीनं सिलेंडर ओढतात. वजन उचलण्याच्या अनेक स्पर्धात सिलेंडर बाबा सहभागी होतात, आणि आपल्या दाढीने वजन ओढतात. आत्ता महाकुंभमध्येही ते आपल्या दाढीनं करतब दाखवत आहेत. प्रयागराजमध्ये असे लाखो साधूसंत आले आहेत. महाकुंभ सुरु झाल्यावर या साधूंची संख्या कोटीच्या घरात जाणार असून त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी भक्तांची गर्दी होणार आहे. (Marathi News)
सई बने