Home » रामायणाच्या वारशाचे अनोखे जतन !

रामायणाच्या वारशाचे अनोखे जतन !

by Team Gajawaja
0 comment
Sri Lanka
Share

रामायण हा भारत आणि श्रीलंकेला जोडणारा सर्वात मोठा वारसा आहे. रावणाची नगरी असलेल्या लंकेमध्ये श्रीरामानं गाजवलेला पराक्रम, माता सीता यांना शोधण्यासाठी आलेल्या रामभक्त श्री हनुमानांच्या पावलांचे ठसे, रावणाचा महल, अशा कितीतरी गोष्टी श्रीलंकेत आजही पूजनीय आहेत. शिवाय रामसेतूचे अस्तित्व आहे. या सर्वांना बघायला श्रीलंकेत मोठ्या संख्येनं रामभक्त जातात. या अनोख्या वारशाचा वापर आता श्रीलंकेनं अधिक चांगल्या पद्धतीनं करुन घेतला आहे. आपल्या देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी श्रीलंकेन एअरलाइन्सलने चक्क यावर एक जाहीरात काढली आहे. या जाहीरातीमधून श्रीलंकेत असलेल्या असलेल्या रामायणातील पवित्र स्थानांची माहिती देण्यात आली आहे. आपल्या देशातील पर्यटन वाढवण्यासाठी श्रीलंकेन एअरलाइन्सने केलेल्या या जाहीरातीला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. (Sri Lanka)

श्रीलंकन ​​एअरलाइन्सने केलेल्या एका जाहीरातीची जगभर चर्चा सुरु झाली आहे. ही जाहीरात आहे, रामायणाला धरुन केलेली. आपल्या देशातील प्रभू श्रीरामांच्या पवित्र खुणा कशा आणि कुठे आहेत, माता सीता यांचे अशोकवन कुठे आहे, याबाबत या जाहीरातीत माहिती देण्यात आली आहे. श्रीलंकन ​​एअरलाइन्सने पाच मिनिटांची केलेली व्हिडिओ जाहिरात सर्वाधिक वेळा बघण्यात आली आहे. यामध्ये रामायणाच्या उल्लेखासोबतच श्रीलंकेतील सांस्कृतिक वारशाची माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये एक आजी आपल्या नातवंडांबरोबर संवाद साधतांना दाखवण्यात आली आहे. यामध्ये रामायणाच्या उल्लेखासोबतच श्रीलंकेतील अन्य सांस्कृतिक वारशाचीही माहिती देण्यात आली आहे. (International News)

व्हिडिओमध्ये एक आजी आपल्या नातवाला रामायण म्हणजे काय हे सांगतांना दिसत आहे. या माध्यमातून श्रीलंकेत असलेली रावणाची गुहा, सीता अम्मान मंदिर आणि अनेक प्रमुख पर्यटन स्थळांचा समावेश जाहिरातीत करण्यात आला आहे. अशी माहिती आहे की लंकापती रावणानं जेव्हा माता सीता यांचे अपहरण केले, तेव्हा त्यांना प्रथम एलाजवळील रावणाच्या गुहेत ठेवण्यात आले होते. सीता अम्मन मंदिराचाही जाहीरातीमध्ये उल्लेख केला आहे. हे स्थान म्हणजेच अशोक वाटिका म्हणून ओळखले जाते. याशिवाय जाहिरातीत आजी आपल्या नातवाला राम सेतूबद्दलही सांगत आहे. रामसेतूचा उल्लेख आल्यावर नातू आजीला हा पूल अजूनही आहे का विचारतो, तेव्हा आजी त्याला त्या पुलाची निर्मिती प्रभू श्री रामांनी कशी केली हे सांगते,यावेळी रामसेतूचे नयनरम्य दृश्य बघता येते. (Sri Lanka)

या जाहिरातीमध्ये रामायणाशी संबंधित ठिकाणांची सुंदर दृश्येही दाखवण्यात आली आहेत. याशिवाय भगवान हनुमानाने लंकेतील रावणाच्या महालाला आग लावल्याची घटना आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील पूल बांधण्यात त्यांची भूमिका यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय व्हिडीओमध्ये ॲनिमेशनच्या माध्यमातून रामायण कथेशी संबंधित पात्रे आणि दृश्ये दाखवण्यात आली आहेत.
श्रीलंकेत आजही हजारो रामभक्त रामायणातील या पवित्र स्थळांना भेट देण्यासाठी जातात. विशेषतः रावणाने माता सीतेचे अपहरण करुन माता सीतेला ज्या गुहेत प्रथम ठेवले होते, त्या गुहेचे प्रवेशद्वार हे कोब्रा सापासारखे आहे. नंतर माता सीता यांना अशोकवाटिकेत ठेवण्यात आले. माता सीता ज्या अशोकाच्या झाडाखाली बसल्या होत्या, ती जागा आता सीता इल्या या नावानं प्रसिद्ध आहे. श्रीलंकन सरकारनं यासंदर्भात 2007 मध्ये संशोधन समिती स्थापन केली होती. (International News)

=====

हे देखील वाचा :  ठाण्यात नेमकी कोणती गणितं चालणार?

========

याच सीता वाटीका परिसरात हनुमानांच्या पावलांचे ठसे बघण्यासाठी श्रीरामभक्त मोठ्या संख्येने येतात. रामायणात असे वर्णन आहे की, जेव्हा हनुमानजींनी माता सीता यांना शोधण्यासाठी समुद्र ओलांडला तेव्हा त्यांनी विशाल रूप धारण केले होते. त्यांनी श्रीलंकेत पोहचल्यावर पहिले पाऊल टाकले, त्याचे मोठे ठसे आजही अस्तित्वात आहेत. रामायणातील युद्धाचे अनेक प्रत्यक्ष दाखले या श्रीलंकेत अजून आहेत. त्यातील मुख्य घटक म्हणजे, संजीवनी औषध. युद्धामध्ये लक्ष्मण बेशुद्ध झाल्यावर त्यांच्यासाठी हनुमानांनी जी संजीवनी बुटी आणली त्यातील काही औषधाचे अंश आजही या भागातील जंगलात सापडतात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. याशिवाय लंकापती रावणाचा महाल बघण्यासाठी हजारो पर्यटक श्रीलंकते येतात. कैलानी नदीच्या काठावर वसलेल्या ठिकाणी हा रावणाचा महल आहे. हा महल हनुमानांनी जाळला होता. त्या जाळल्याच्या खुणा अजूनही महल आणि त्या परिसरात आहेत. या सर्वांचा उल्लेख श्रीलंकन सरकारच्या जाहीरातीमध्येही झाल्यानं रामायणाचा वारसा जपण्याची हा अनोखा उपक्रम असल्याची दादा प्रभू रामांच्या भक्तांनी दिली आहे. (Sri Lanka)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.