Home » अबब…’या’ देशात 25 माळ्याच्या इमारतीएवढे झाड

अबब…’या’ देशात 25 माळ्याच्या इमारतीएवढे झाड

by Team Gajawaja
0 comment
Amazon jungle
Share

ब्राझीलमध्ये पसरलेले अमेझॉन जंगल म्हणजे पृथ्वीचे फुफ्फुस आहे. पृथ्वीला जवळपास वीस टक्के ऑक्सीजनचा पुरवठा या जंगलातून होतो असं सांगितलं जातं.  अद्यापही या जंगलाची पूर्ण माहिती माणसाला नाही. यात अनेक आदिवासी प्रजाती असून 17 हजाराहून अधिक जास्त झाडांच्या प्रजाती या जंगलात आठळतात.त्यामुळेच या जंगलामध्ये अनेक शोध मोहिमा राबवल्या जातात.यातील झाडांच्या प्रजातींबाबत शोध चालू असतात.असाच नुकताच एक शोध लागला आहे.तो म्हणजे अमेझॉनमध्ये 25 मजली इमारतीएवढे उंच झाड सापडले आहे.  या  झाडाचे वय सुमारे पाचशे वर्षाचे असून अंतराळातून काढलेल्या एका फोटोद्वारे संशोधकांनी हे झाड शोधून काढले आहे.25 मजली इमारतीएवढी उंची असलेल्या या झाडाला शोधण्यासाठी संशोधकांनी 2019 पासून मोहीम राबवली होती. या मोहिमेला आत्ता यश आले आहे. (Amazon jungle) 

अमेझॉन जंगल संपूर्ण जगाला ऑक्सिजनचा पुरवठा करते.त्यामुळेच जगाचे फुफ्फुस म्हणून या जंगलाचा गौरव करण्यात येतो.ब्राझीलची ओळख या जंगलानी झाली आहे.काही वर्षापूर्वी या जंगलाला लागलेल्या आगीमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती.जगभरातून संशोधकांनी तेव्हा या जंगलाकडे धाव घेतली होती.या आगीमुळे अमेझॉनच्या जंगलाचे महत्त्व किती आहे, याची जाणीवही पुन्हा एकदा झाली होती.याच अमेझॉनच्या जंगलात(Amazon jungle) अनेक संघटना वृक्षांच्या संवर्धानाचे काम करत आहे.नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस रिसर्च या संघटनेच्या माध्यमातून अमेझॉनच्या जंगलात आता आग प्रतिबंधक उपाय योजना राबवण्यात येत आहेत.  याच दरम्यान या जंगलातील सर्वात उंच झाडाची माहिती संशोधकांना लागली.हे झाड थोड थोडकं उंच नसून त्याची उंची 25 मजली इमारतीएवढी आहे.  

अमेझॉनमधील हा  वृक्ष 88.5 मीटर म्हणजेच 290 फूट उंच आहे.या वृक्षाची जाडी 9.9 मीटर म्हणजेच 32 फूट आहे.या उंच झाडाला शोधण्यासाठी मोठी मोहीम राबवण्यात आली. संशोधकांनी तब्बल तीन वर्ष या शोधमोहीमेवर काम करत होते.अमेझॉन जंगल(Amazon jungle) अतिषय घनदाट आहे.त्यात जेवढ्या वृक्षांच्या प्रजाती आहेत, त्यापेक्षाही अधिक प्राणी रहात आहेत.  या सर्वांना सांभाळून संशोधकांच्या टिमने तब्बल दोन आठवड्यांची पायपीट या जंगलात केली.  हा अतिषय धोकादायक प्रवास होता.  कारण या टिमला फक्त अंदाजावर या उंच झाडाचा माग काढायचा होता.  अखेर दोन आठवड्यांच्या पायपीटीनंतर अतिषय घनदाट भागात हे 290 फूट उंचीचे झाड शोधण्यात यश आले आहे.  

या झाडाला शोधण्यासाठी एकून चार मोहीमा काढण्यात आल्या.  त्यातील पहिल्या तीन अयशस्वी झाल्यावर चौथ्या मोहिमेला यश संपादन झाले.  या विशाल झाडाखाली पोहोचल्यानंतर शास्त्रज्ञांनी त्याची पाने, माती आणि इतर नमुने गोळा केले.यावरुन हे झाड किती जुने आहे याचा शोध घेतला जाणार आहे.त्यासाठी या झाडाच्या मुळातील माती उपयोगी ठरणार आहे. तरीही या झाडाचे वय किमान 500 ते 600 वर्ष असल्याचा अंदाज आहे.याशिवाय या परिसरात अशीच काही झाडे आहेत का याचीही पाहणी करण्यात येणार आहे.  

उत्तर ब्राझीलमधील इरातापूर रिव्हर नेचर रिझर्व्हमध्ये हे प्रचंड उंच झाड आहे.  एंजेलिम वर्मेलोचे प्रजातीचे हे झाड  अमेझॉनमध्ये आढळणारे सर्वात मोठे झाड आहे.  3D मॅपिंगच्या आधारे संशोधकांनी 2019 मध्ये उपग्रहामधून आलेल्या फोटोच्या माध्यमातून हे झाड प्रथम शोधले.  त्यानंतर मग  हा जंगलाचा परिसर नक्की करुन त्यापर्यंत जाण्याचा मार्ग आखण्यात आला.यावेळी प्रमुख धोका म्हणजे येथील हिंस्त्र जनावरांचा होता.त्याचाही अभ्यास आणि योग्य उपाययोजना करुन ही मोहीम आखण्यात आली.  या मोहिमेत शिक्षणतज्ज्ञ, पर्यावरणवादी आणि स्थानिक मार्गदर्शकांचा समावेश होता.पहिल्यांदा दहा दिवसांच्या प्रवासानंतर टीम परत आली.यानंतर संशोधकांनी बोटीने 250 किलोमिटरचा प्रवास करत नंतर 20 किलोमीटर पायपीट केली.  झाडापर्यंत चालत गेलेले संशोधक,प्रथम हे उंच झाड बघितल्यावर भारावून गेले.  त्यांनी  आत्तापर्यंत पाहिलेल्या सर्वात सुंदर गोष्टींपैकी ही एक गोष्ट असल्याचे सांगितले.मानवाने यापूर्वी कधीही पाऊल ठेवले नाही, अशा भागात पहिल्यांदाच गेल्यानं हे सर्व संशोधक उत्साही झाले होते. (Amazon jungle)

=========

हे देखील वाचा : कॅनडात नोकरीसाठी बंदी, भारतीय विद्यार्थ्यांना ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

=========

सध्या अमेझॉन जंगलामध्ये (Amazon jungle) आगीचे  प्रमाण चिंताजनक आहे.शिवाय जंगलतोडही वाढत आहे.गेल्या तीन वर्षांत 75 टक्क्यांनी वाढली आहे,  यावर उपाययोजना करण्यासाठी विशेष टीम कार्यरत आहे.  यातच हे उंच झाड मिळाल्यानं संशोधक अधिक सतर्क झाले आहेत. आणि या झाडाच्या संवर्धनासाठी विशेष उपाय काय करता येतील याबाबतची चाचपणी सुरु झाली आहे.  

सई बने…


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.