Home » ‘या’ ठिकाणी उघडल जाणार साधूंसाठी पार्लर

‘या’ ठिकाणी उघडल जाणार साधूंसाठी पार्लर

by Team Gajawaja
0 comment
Saint Parlor
Share

साधु-संत यांची ओळख म्हणजे त्यांच्या डोक्यावरील जटा….या सर्व साधुंचे त्यांच्या जटांवर खूप प्रेम असते. या जटा करण्यासाठी आणि नंतर त्यांची निगा राखण्यासाठी ही साधू मंडळी विशेष मेहनत घेत असतात. मात्र आता या साधुंसाठी आणि त्यांच्या जटांसाठी एक खास पार्लर (Saint Parlor) चालू झालं आहे. भोपाळ येथील एका इंजिनिअरींग तरुणीनं पार्लर चालू केलं आहे. यात ती साधुसंताच्या जटा स्वच्छ करुन देतेच, शिवाय त्यांना नवीन आकारही दिला जातो.  संपूर्ण मध्यप्रदेशमध्ये साधू संतांचे वास्तव्य मोठया प्रमाणात आहे.  या साधूंची सेवा करण्यासाठी ही तरुणी मोफत त्यांच्या जटांची स्वच्छता करुन देते. त्यामुळे तिचे कौतुक होत आहे. 

मध्यप्रदेशच्या भोपाळमधील करिश्मा नावाची तरुणी सध्या चर्चेत आहे. करिश्मा स्वतः संगणक अभियंता आहे. मात्र शिक्षण केल्यावर यात काही करण्यापेक्षा वेगळा व्यवसाय करण्याचे तिच्या मनात आले.  तिनं चक्क टॅटू पार्लर (Saint Parlor) चालू केले. सुरुवातीला अगदी 10-10 रुपयांमध्ये टॅटू काढून देत असे. या सोबत करिश्मानं पार्लर चालू केलं.  करिश्माची खासियत तिच्या हेअर स्टाईलमध्ये आहे. याच पार्लरमध्ये आता करिश्मा साधू-संतांच्या जटा साफ करण्याचे आणि नंतर त्यांची नव्यानं रचना करण्याचे काम करत आहे.  देशातील अशाप्रकारचे हे पहिलेच  पार्लर (Saint Parlor) असल्याची महिती आहे. येथे ऋषी-मुनींच्या जटा मोफत तयार केल्या जातात.

जटा ही साधूंची सर्वात मोठी ओळख आहे. साधूंना त्यांचे केस खूप आवडतात,  पण त्यांची काळजी घेणे फार कठीण असते. साधू आपले केस मातीने धुतात,  त्यामुळे त्यांच्या जटा तयार होतात, पण या जटा साफ करणे खूप कठीण काम असते. काही साधू आपल्या जटा, सुईच्या धाग्याने बांधून ठेवतात. त्यांना बांधून त्या सरळ वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे त्या नंतर सोडतांना आणि त्यांना स्वच्छ केल्यावर पुन्हा बांधतांना खूप त्रास होतो.  या साधुंचा हा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करिश्मा करीत आहे. जटा स्वच्छ करणा-या या पार्लरला (Saint Parlor) ब्रेडिंग स्टुडिओ ही म्हटले जाते. हा स्टुडीओ उघडण्यापूर्वी करिश्मानं काशी, उज्जैनसह अनेक तीर्थक्षेत्री जाऊन ऋषी-मुनींची भेट घेतली. त्यांच्याबरोबर संवाद साधला.  तेव्हा तिला जटा ठेवणा-या ऋषी मुनींची पहिली अडचण लक्षात आली. तिला अनेक साधुंच्या जटा तुलटलेल्या दिसल्या.  काही साधु जटा सुई-दो-यानं बांधत असत.  तर काही त्यामध्ये विशिष्ट माती लावून त्यांना जाड करण्याचा प्रयत्न करीत असत. असे अनुभव ऐकून करिश्मानं ब्रेडिंग स्टुडीओ चालू केला. तिच्या या स्टुडिओला दीड वर्ष झाले असून जवळपास चाळीसच्यावर  साधू तिच्याकडे नियमीत आपल्या जटा स्वच्छ करण्यासाठी येतात. या कामासाठी करिश्मा एकही पैसा घेत नाही. साधूंनी जे काही पैसे दिले, ते ती आशीर्वाद म्हणून ठेवते.

========

हे देखील वाचा : मृत्यूनंतर पुन्हा आयुष्य मिळणार, अमेरिकन डॉक्टरांनी केले दावे

========

साधू आपले केस वेगवेगळ्या प्रकारे सजवतात.  फुले, रुद्राक्ष, मोती, मणी आदींनी साधू आपल्या जटांना सजवतात. साधू संन्यासी आयुष्यभर केस न कापण्याचा निश्चय करतात. पण काही साधू त्यांच्या  गुरूंच्या मृत्यूनंतर जटा कापतात…पण अशावेळी त्यांना जखम होण्याची शक्यता असते. करिश्मा अशा सर्व साधूंना मदत करते. आता अनेक पुरुष आणि महिला साधू केस काढण्यासाठी करिश्माकडे येतात.  हे काम खूप आव्हानात्मक असल्याचे ती सांगते. साधूंच्या केसात सरुवातीला साधी फणीही जात नाही कारण त्यात तूप, हळद आदी गोष्टी टाकून जटा राठ केलेल्या असतात. त्या पूर्णपणे कडक असतात. हे काम करण्यासाठी चार जणांची मदत घ्यावी लागते.  आणि एका साधूच्या जटा साफ करण्यासाठी तब्बल तीन ते चार दिवसांचा वेळ जात असल्याचे ती सांगते. करिश्मा सांगते, साधूंचे केस खूप लांब आणि जड असल्यामुळे अनेक ठिकाणी तुटतात.  मग या केस तुटलेल्या जागेवरून क्रोकेटने विणावे लागते. त्यामुळे ते मजबूत होतात आणि पुढची दहा वर्ष तरी ते टिकून राहतात. यासाठी करिश्मा कुठलेही शुल्क त्या साधूंकडून घेत नाही. आता मध्यप्रदेशमध्ये महाकुंभमेळा भरणार आहे.  या मेळ्यामध्ये हजारो साधू येणार आहेत.  यापैकी जे साधू करिश्माकडे त्यांच्या जटा स्वच्छ करण्यासाठी जाणार आहेत, त्यांना ती मोफत हे काम करुन देणार आहे.  करिश्माच्या मते या कामामुळे तिला समाधान मिळते, आणि यावरच ती खुश आहे. (Saint Parlor)  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.