Home » युक्रेनवर ओढावले मोठे वीज संकट

युक्रेनवर ओढावले मोठे वीज संकट

by Jyotsna Kulkarni
0 comment
Ukraine Electricity Issue
Share

२४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाने युक्रेनवर आक्रमण केले आणि युद्धाचा प्रारंभ केला. आज या युद्धाला तब्बल अडीच वर्ष होत आले, तरीही हे युद्ध थांबण्याचे कोणतेही चिन्ह अजून दिसत नाही. या युद्धामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्त हानी झाली. युद्ध जरी रशिया आणि युक्रेनचे असले तरी त्याचा फटका मात्र संपूर्ण जगाला विविध प्रकारे बसला आहे. (Ukraine Electricity Issue)

रशिया आणि युक्रेन या युद्धामुळे लाखो युक्रेनियन लोकं विस्थापित झालेत. युरोपचे भू राजकीय चित्र देखील मोठ्या प्रमाणात बदलले आहे. पुरवठा साखळी विस्कळीत होत महागाई अतिप्रचंड प्रमाणात वाढली. रशिया-युक्रेन युद्धामुळे मोठी आर्थिक अनिश्चितता निर्माण झाली. याचा फटका जगभरातील सर्वच अर्थव्यवस्थांना बसला आहे. दोन वर्षांपासून युक्रेनच्या भूमीवर रशिया सातत्याने हल्ले करीत आहे. लढाऊ विमानांपासून रणगाड्यांपर्यंत युक्रेनची शहरे उद्ध्वस्त होत आहेत.

आजही हे युद्ध तितक्याच ताकदीने सुरु असून, यामुळे युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण झाल्या असून, त्यातून बाहेर पाडण्यासाठी तिथल्या लोकांना खूपच त्रास होत आहे. युक्रेनमध्ये सर्व काही उध्वस्त झाले आहे. जीवनावश्यक गोष्टींसाठी देखील येथील लोकांना झगडावे लागत आहे. (Ukraine Electricity Issue)

आपल्याकडे लाइट गेली तर आपण लगेच सैरभैर होतो. फोन करून लाइट कधी येईल विचारतो. मात्र मागील बऱ्याच महिन्यांपासून युक्रेनियन लोकं विजेशिवाय त्यांचे जीवन जगत आहे. रशियाने मागील काही दिवसात युक्रेनवर जे काही हल्ले केले त्यामध्ये युक्रेनच्या वीज उत्पादन केंद्रांचे आणि उर्जा विषय पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नागरिकांना विजेशिवाय राहावे लागत आहे.

Ukraine electricity Issue

वीज नसल्यामुळे युक्रेनियन नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेक रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे, अनेकांना ऑक्सिजन पुरवठा सुरु आहे, अनेकांचे ऑपरेशन बाकी आहे. टॉर्चच्या प्रकाशात डॉक्टरांना ऑपरेशन करावे लागत आहे. शिवाय अनेक उंच इमारतीच्या लिफ्ट काम करत नाही. त्यामुळे वर राहणाऱ्या लोकांना खाली वर करणे शक्य होत नाही. (Ukraine Electricity Issue)

उंच इमारतींमध्ये वरच्या मजल्यांवर राहणारे नागरिक कोणत्याही मोक्याच्या क्षणी हे लोकं सहायता मिळवू शकत नाही. वृद्ध, मुलं यांना देखील कोणत्याही सुविधा मिळत नाही. रशियाकडून होणाऱ्या हवाई हल्ल्यांपासून वाचण्यासाठी तयार करण्यात आलेल्या बंकरमध्ये देखील ते वेळेवर पोहचु शकत नाही. पाणी देखील त्यांच्यापर्यंत पोहचत नाही. येथील लोकं ज्यांना शक्य आहे ते पेट्रोलवर चालणारे जनरेटर सतत वापरताना दिसतात. मात्र ते देखील जास्त गरम झाले की काही तास थंड होण्यासाठी बंद ठेवावे लागत नाही.

======

हे देखील वाचा : ॲव्होकॅडो खाण्याचे ‘हे’ आहेत चमत्कारिक फायदे

======

तत्पूर्वी आपण पाहिले तर एका माहितीनुसार युक्रेनने मागील तीन महिन्यांत नऊ गिगावॅट वीज निर्मिती करण्याची क्षमता गमावली आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियन हल्ल्याच्याआधी युक्रेनमध्ये मुबलक प्रमाणात वीज निर्मिती व्हायची. ही वीजनिर्मिती एवढी होती की, या देशातून नेदरलँड्स, स्लोव्हाकिया, लाटविया, लिथुआनिया आणि एस्टोनियाला वीजनिर्मिती केली जायची. रशियाच्या हल्ल्यांमध्ये सध्या सरकारच्या मालकीचे सर्व थर्मल पॉवर प्लांट नष्ट झाले आहेत. देशातील सर्व हायड्रो-पॉवर प्लांट्सना रशियन क्षेपणास्त्र किंवा ड्रोन हल्ल्यामुळे नुकसान झाले आहे. (Ukraine Electricity Issue)

हे युद्ध कधी संपणार आणि कधी परिस्थिती सुरळीत होण्यास सुरुवात होईल हे अजून कोणालाही नक्की सांगता येत नाही. मात्र या युद्धामुळे अतिशय मोठ्या संकटाना सामोरे जावे लागत आहे. लवकरच हे युद्ध संपो आणि शांतता पसरू हीच आपण प्रार्थना करू शकतो.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.