Home » ‘या’ बंदरावर नांगरण्यात आले प्रचंड मोठे जहाज

‘या’ बंदरावर नांगरण्यात आले प्रचंड मोठे जहाज

by Team Gajawaja
0 comment
Mundra Port
Share

मुंद्रा बंदर (Mundra Port) हे भारतातील सर्वात मोठे बंदर आहे. फक्त भारतातीलच नव्हे तर अरबी समुद्रावर असलेल्या या सर्वात मोठ्या बंदराची अदानी समूहाच्या अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनने केली आहे. या मुंद्रा बंदराने अनेक विक्रम केले आहेत. 

मात्र आता त्या विक्रमांचाही विक्रम झाला आहे, या बंदरावर प्रचंड मोठे जहाज नांगरण्यात आले आहे.  या जहाजाची लांबी ही चार फुटबॉल मैदानांएवढी आहे. भारतातील मुंद्रा बंदरावर पहिल्यांदाच एवढं मोठं जहाज नांगरलं आहे. भारतातील कोणत्याही बंदरासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतीय शिपिंग उद्योगासाठी ही अभिमानाची गोष्ट ठरली आहे.  या जहाजाचे नाव एमएससी अण्णा आहे. हे जहाज मेडिटेरेनियन शिपिंग कंपनी (MSC) चे आहे. मुंद्रा बंदरावर नांगरण्यात आलेल्या या MSC अण्णाला नुसते बघण्यासाठीही अनेक नागरिकांची गर्दी होत आहे.  (Mundra Port)

भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर म्हणून मुंबईमधील न्हावा शेवा बंदराचा उल्लेख होत असे. मात्र या बंदराचा धक्का मोठा कंटेनर जहाजे सामावून घेण्याइतका खोल नाही. त्यामुळे अशी मोठी कंटेनर जहाजे सिंगापूर किंवा श्रीलंकेतील ट्रान्सशिपमेंट हबमध्ये जातात. तेथून छोट्या जहाजांमध्ये कंटेनर भरून भारतात आणले जाई. 

मात्र मुंद्रा बंदराच्या (Mundra Port) निमिर्तीनंतर अशी मोठी कंटेनर जहाजे थेट येऊ लागली आहेत.  या सर्व कंटेनर जहाजांचे रेकॉर्ड एकाच जहाजानं मोडले आहेत.  एमएससी ॲना हे भलेमोठे  जहाज मुंद्रा बंदरात नांगरण्यात आले, आणि सर्वत्र एकच चर्चा सुरु झाली आहे. 

हे जहाज अल्ट्रा लार्ज कंटेनर व्हेसल्स या श्रेणीशी संबंधित आहे ही श्रेणी केवळ जगातील निवडक बंदरांमध्येत नांगर टाकते.  कारण त्यासाठी समुद्राची खोली आवश्यक असते, ती फक्त मुंद्रा बंदरामध्ये आहे. १५.२ मीटर किंवा त्याहून ही खोली आहे.  MSC अण्णा हे जहाज म्हणजे, मोठी अलीबाबाची गुहाच आहे. 

या जहाजाची एकूण लांबी ३९९.९८ मीटर आहे म्हणजेच चार फुटबॉल मैदानं यात बसू शकतील. हे जहाज एका वेळी १९,२०० TEU एवढे कंटेनर लोड करू शकते. एवढ्या मोठ्या कंटेनरला सामावणारे असे भव्य जहाज पहिल्यांदाच भारतीय बंदरात दाखल झाले आहे.

यापूर्वी देखील जुलै २०२३ मध्ये, अदानी पोर्ट्स, मुंद्रा बंदरामध्ये (Mundra Port) जगातील सर्वात लांब कंटेनर जहाजांपैकी एक, MV MSC हॅम्बर्ग या जहाजाची नांगरणी झाली होती. या जहाजाची एकूण लांबी ३९९ मीटर आणि क्षमता १६६५२ TEU आहे.  यावेळीच जगभरातून मुंद्रा बंदराच्या क्षमतेवर शिक्कामोर्तब मारण्यात आले.   जगातील सर्वात मोठी जहाजे हाताळण्याची बंदराची क्षमता दिसून आली आणि MSC अण्णांच्या आगमनाची मुहूर्तमेढ रोवली गेली.

मुंद्रा बंदर (Mundra Port) हे भारतातील पहिले खाजगी बंदर आहे. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील मुंद्राजवळ कच्छच्या आखाताच्या उत्तरेकडील किनारा या मुंद्रा बंदरानं व्यापलेला आहे. २०२०-२१ या वर्षामध्ये मध्ये  मुंद्रा बंदराने १४४.४ दशलक्ष टन कार्गो हाताळले आहेत. भारताच्या सागरी मालवाहू मालाच्या सुमारे ११ टक्के मालाची वाहतून याच बंदराच्या माध्यमातून होत आहे. 

=============

हे देखील वाचा : राष्ट्रध्यक्षांच्या निधनानंतर इराणमध्ये आनंदोत्सव का झाला ? 

=============

१९९८ मध्ये गुजरात अदानी पोर्ट लिमिटेड ने या बंदराच्या कामाची पायभरणी केली.  २००१ मध्ये जेव्हा मुंद्रा बंदराचे कामकाज सुरु झाले. या बंदराच्या बांधणीवर अनेक प्रश्नचिन्ह विचारण्यात आले. मात्र अदानी कंपनीनं या सर्वाना आपल्या विशाल उद्देशातून उत्तर दिले. हे बंदर सागरी रेशीम मार्गाचा एक भाग आहे,  हा मार्ग चिनी किनाऱ्यापासून भूमध्य समुद्रापर्यंत आणि वरच्या एड्रियाटिक प्रदेशातून मध्य युरोप आणि उत्तर समुद्रापर्यंत जातो.  

मुंद्रा बंदराच्या (Mundra Port) बहुउद्देशीय टर्मिनल्समध्ये एकूण १.८  हजार मीटर लांबीचे नऊ बर्थ आहेत.  ज्याच्या बाजूची खोली ९ ते १६.५ मीटर आहे.  या बंदराचा बर्थ २ हा  १८० मीटर लांबीचा आहे.  त्याची खोली १३ मीटर आहे आणि ३० हजार DWT पर्यंत जहाज यात नांगरणी करु शकते.  यापेक्षाही दुप्पट क्षमता असलेली जहाजे अन्य बर्थवर नांगरणी करतात.   त्यामुळे सध्या भारतातील सर्वात व्यस्त बंदर म्हणून मुंद्रा बंदराचा उल्लेख करण्यात येतो.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.