Home » बार्बीच्या गुलाबी जगाची झलक

बार्बीच्या गुलाबी जगाची झलक

by Team Gajawaja
0 comment
Barbie Movie
Share

बार्बी नावाची सुंदर बाहुली प्रत्येक मुलीचं स्वप्न असते. ही सुंदर बाहुली लहानपणी प्रत्येक मुलीच्या खेळण्याच्या सेटमध्ये पहिल्या क्रमांकावर असते. या बार्बींचं सगळं जग सुंदर असतं आणि ते ही गुलाबी रंगातलं. अगदी तिचे कपडे, तिची पुस्तकं, बगिचे, खेळण्याचं सामान अगदी समुद्रावरची वाळूसुद्धा गुलाबी असते. या बार्बीच्या जगात सगळं छान छान असतं. ही बार्बीची गुलाबी दुनिया प्रत्यक्षात पाहता आली तर कसं होईल आणि या गुलाबी जगातील सुंदर बार्बी ख-या जगात गेली तर काय होईल, या सर्व प्रश्नांची उत्तरं बार्बी नावाच्या चित्रपटातून मिळणार आहेत. बार्बी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. दिग्दर्शन ग्रेटा गेरविगने यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर त्याच्यावर लाइकचा पाऊस पडत आहे.  बार्बीची ही गुलाबी दुनिया बघण्यासाठी उत्सुक असल्याची प्रतिक्रीया त्यावर व्यक्त होत आहे. (Barbie Movie)

दिग्दर्शक ग्रेटा गेरविगन यांचा चित्रपट बार्बी गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत आहे. त्याचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला.  त्यातील सुंदर बार्बी लॅंडची एक झलक पाहिल्यावर सर्वांनाच त्याला पसंती दिली आहे. यात मार्गोट रॉबी आणि रायन गॉस्लिंग या दोघांच्या भूमिका असून बार्बी लॅंडमधून हे दोघंही वास्तविक जगात येतात आणि मग काय गंमती जंमती होतात ते या चित्रपटात पाहता येणार आहे. बार्बी तिचे गुलाबी जग सोडून ख-या जगात आली की, काय अवस्था होते,  तिचे चाहते तिच्याबरोबर कसे वागतात हे या चित्रपटातून बार्बीच्या चाहत्यांना दिसणार आहे. (Barbie Movie) 

हॉलिवूडमध्ये काही वेगळ्या साच्यातले चित्रपट येतात. त्यापैकी हा बार्बी एक चित्रपट (Barbie Movie) ठरणार आहे. प्रसिद्ध प्रोडक्शन हाऊस वॉर्नर ब्रदर्स बार्बीचे विश्व एका चित्रपटातून घेऊन येत आहेत. बार्बी नावाच्या या चित्रपटात मार्गारेट रॉबी आणि रायन गोसलिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हॉलिवूडमध्ये आत्तापर्यंत अनेकवेळा बार्बीवर चित्रपट बनवण्यात आले आहेत. त्यात काही वेगळी  कथा असणारा हा चित्रपट आहे.  यात बार्बी बाहेरच्या जगात आल्याचे दाखवण्यात आले आहे.  

बार्बी (Barbie Movie) तिच्या स्वत:च्या जगात हरवलेली आहे. बाहेरच्या जगात काय चालले आहे, याची तिला कल्पना नाही. स्वतःच्या जगात मस्त असणा-या बार्बीची एक मौल्यवान वस्तू चुकून जमिनीवर पडते. ती शोधण्याचं आव्हान तिला स्विकारावं लागतं. ती वस्तू तिच्यासाठी मौल्यवान असते  कारण तिने तिच्या मौल्यवान वस्तू पृथ्वीवरून परत आणल्या नाहीतर तिला बार्बी वर्ल्डमध्ये माणसांसारखे सामान्य जीवन स्विकारावे लागणार होते.  या अशा अटीमुळे त्रासलेली बार्बी तिचे सामान परत मिळवण्यासाठी पृथ्वीवर जाण्याचा निर्णय घेते.  बार्बी या लांबच्या प्रवासासाठी तिच्या गुलाबी रंगाच्या गाडीमधून निघते. मात्र तिला प्रवासादरम्यान समजतं की केन (रायन गोसलिंग) तिच्यासोबत आला आहे. केनचे बार्बीवर प्रेम आहे.  त्यामुळेच तिला सोबत देण्यासाठी तोही या प्रवासावर निघतो. दोघेही पृथ्वीवर पोहोचल्यावर त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.  अगदी  बार्बी आणि केनला तुरुंगातही जावे लागते. बार्बी एका अज्ञात जगात अडकते.  ती तिची शक्ती कशी परत मिळवते  आणि त्याच्या सुखी, गुलाबी जगात कशी परत जाते,  हे या बार्बी चित्रपटातून बघता येणार आहे. हा चित्रपट 21 जुलै रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे.   या काल्पनिक विनोदी चित्रपटाची कथा नोहा बाउम्बा यांची आहे. (Barbie Movie) 

========

हे देखील वाचा : टॉलिवूडचे आवडते अम्मापल्ली रामचंद्र स्वामी मंदिर

========

मुळात बार्बी ही अमेरिकन कंपनी मॅटेल, इंकची एक फॅशन बाहुली आहे. या कंपनीनं 9 मार्च 1959 रोजी बार्बीला लॉन्च केली.  तेव्हापासून बार्बी खेळण्यांच्या मार्केटचा एक महत्त्वाचा भाग आहे. मॅटेलने एक अब्जाहून अधिक बार्बी बाहुल्या विकल्या आहेत.   रुथ हँडलरने तिची मुलगी बार्बरा कागदी बाहुल्यांसोबत खेळताना पाहिली आणि या बाहुलीची कल्पना सुचली.  पहिल्या बार्बी डॉलने काळ्या-पांढऱ्या झेब्रा पट्टे असलेला स्विमसूट आणि सिग्नेचर टॉपकनॉट पोनीटेल परिधान केले होते.  ती गौर आणि सावळ्या रंगात उपलब्ध होती.  पहिल्या बार्बी बाहुल्या जपानमध्ये तयार केल्या गेल्या होत्या. त्यांचे कपडे जपानी महिलांनी हातांनी शिवलेले होते.  पहिल्या वर्षात सुमारे 350,000 बार्बी बाहुल्या विकल्या गेल्याची नोंद आहे. त्यानंतर या बार्बीच्या रुपात अनेक बदल करण्यात आले.  आत्ताही या बार्बी बाहुल्या प्रत्येक लहान मुलीच्या खेळण्यामध्ये प्रमुख असतात. आता त्याच बार्बीवर येणार हा नवा चित्रपट बॉक्सऑफीसवर काय जादू करतो, हे लवकरच समजेल.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.