डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत निर्विवादपणे विजयी झाले आहेत. 20 जानेवारी 2025 पासून त्यांच्या अध्यक्षेतेखालील सरकार अमेरिकेत येणार आहे. ट्रम्प सध्या आपल्या सरकारमधील मंत्र्यांची नियुक्ती करण्यात व्यस्त आहेत. त्याचवेळी ट्रम्प यांचे विरोधक काय करत आहेत, हा प्रश्न आहे. तर ट्रम्प यांचे विरोधक ट्रम्प यांच्या कार्यकालातील चार वर्षात काय करायचे याचे उत्तर शोधत आहेत. अनेक ट्रम्प विरोधकांनी पुढच्या चार वर्षासाठी अमेरिकेच्या बाहेर रहाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यात ट्रम्प यांचे खंबीर पाठिराखे एलॉन मस्क यांच्या ट्रान्स मुलीचाही समावेश आहे. याशिवाय अनेकांनी ट्रम्प अमेरिकेला एखाद्या जेलमध्ये परावर्तीत करतील या भीतीनं अमेरिकेला सोडून अन्य देशात जाण्याची तयारी सुरु केली आहे. (Villa VIE Residences Company)
अमेरिकेत ट्रम्प विरोधात हा ट्रेंण्ड वाढल्याचा फायदा मात्र एका ट्रॅव्हल कंपनीनं घेतला आहे. अमेरिकेतल्या एका ट्रॅव्हल कंपनीनं ट्रम्प विरोधकांना आपल्या क्रूझवर एक सहल आयोजित केली आहे. ही सहल चार-पाच दिवसांची नाही, तर चक्क चार वर्षाची आहे. त्यांच्यामते या चार वर्षानंतर ट्रम्प यांचे राज्य संपुष्ठात येईल, तोपर्यंत त्यांचे विरोधक या क्रूझवरुन संपूर्ण जगात फिरु शकणार आहेत. या क्रूझवर त्यांना जगातील सर्वोच्च सुविध देण्यात येणार आहेत. त्यामुळे तमाम ट्रम्प विरोधकांनी या सुविधेचा फायदा घ्यावा म्हणून या ट्रॅव्हल कंपनीनं जाहीरात करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने अनेकांना आनंद झाला असला तर नाराज नागरिकांची संख्याही कमी नाही. यातून या सगळ्या नाराज मंडळींना पुढच्या चार वर्षांसाठी अमेरिकेच्या बाहेर नेण्यासाठी एक ट्रॅव्हल कंपनी पुढे आली आहे. ट्रम्प यांचे नवनियुक्त सरकार नव्या वर्षात आपला पदभार स्विकारणार आहे. तेव्हापासून ही ट्रॅव्हल कंपनी या नाराज मंडळींना अमेरिकेपासून दूर नेणार आहे. (International News)
या नाराज लोकांना एका भल्यामोठ्या क्रूझच्या माध्यमातून जगाची सफर घडवण्यात येणार आहे. या प्रवास सहलीला स्किप फॉरवर्ड असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये व्हिला व्हिए रेसिडेन्सेस ही ट्रॅव्हल कंपनी चार वर्षा प्रवाशांना जगातील सर्व प्रसिद्ध शहरांमध्ये घेऊन जाणार आहे. या चारवर्षांनी पुन्हा हे क्रूझ अमेरिकेमध्ये परतणार आहे. या क्रूझवर असलेले प्रवाशी जगभरातील सर्व खंडातून प्रवास करतील. शिवाय 150 प्रसिद्ध ठिकाणांना भेट देऊ शकणार आहेत. क्रूझवर सगळ्याच आधुनिक सुखसोयी असतात. तसेच हे क्रूझही जगातील सर्वात अद्ययावत सुखसोयींनी सुसज्ज असणार आहे. त्यामुळे याच क्रूझच्या माध्यमातून नोकरदर मंडळी कामही करु शकणार आहेत. शिवाय जे व्यावसायिक असतील, त्यांनाही आवश्यक सुविधा पुरवण्यात येणार आहेत. पुढच्या चार वर्षात कधीही क्रूझवर प्रवेश मिळू शकणार आहे. जी मंडळी चार वर्षासाठी क्रूझवर प्रवेश करणार आहेत, त्यांना त्याचा खिसा मात्र चांगलाच खाली करावा लागणार आहे. कारण या लक्झरी सुविधापूर्ण सहलीसाठी जे जातील त्यांना एका केबिनसाठी $255,999 म्हणजेच 2.2 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. (Villa VIE Residences Company)
======
हे देखील वाचा : टीव्ही होस्ट ते संरक्षण मंत्री
====
शिवाय दोघांच्या केबिनसाठी $319,998 म्हणजेच 3.2 कोटी रुपये रक्कम मोजावी लागणार आहे. या क्रूझवर स्वादिष्ट भोजन, हाय-स्पीड इंटरनेट, वेलनेस प्रोग्राम, स्विमिंग पूल, लायब्ररी, इनडोअर स्पोर्ट्स, आरोग्य सुविधा आदींचा समावेश आहे. ही चार वर्षाची क्रूझ सहल आयोजीत करणा-या व्हिला व्ही रेसिडेन्स कंपनीने जगातील सर्वात सुविधापूर्ण प्रवास असेच वर्णन या सहलीचे केले आहे. अर्थात चार वर्षानंतर ही क्रूझ अमेरिकेत परत आल्यावर पुन्हा ट्रम्प यांच्याच पक्षाचे किंवा पुन्हा ट्रम्प यांचेच सरकार आले तर काय, या प्रश्नाचे उत्तर संबंधित कंपनीकडे नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर त्यांना अनेकजणांनी जाहीर विरोध केला आहे. त्यात त्यांचे कट्टर समर्थक एलॉन मस्क यांच्या ट्रान्स कन्येचाही समावेश आहे. एलॉन मस्कची कन्या ट्रान्स कन्या व्हिव्हियन जेना विल्सन हिने ट्रम्प निवडणूक जिंकल्यानंतर अमेरिकेत स्वतःचे भविष्य दिसत नाही असे सांगून अमेरिका सोडणार असल्याचे जाहीर केले आहे. व्हिव्हियनच्या मते आता ती अमेरिकेत राहणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे अमेरिकेत राजकीय अस्थिरता वाढेल, असे तिला वाटते. ट्रान्स विरोधी नियम ट्रम्प जाहीर करतील अशी भीती तिला आहे. (International News)
सई बने