रशिया युक्रेन युद्धात आता कधीही आण्विक अस्त्रांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या जो बिडेन प्रशासनाने युक्रेनला रशियात लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी दिली. त्यानंतर युक्रेनने प्रथमच रशियावर अमेरिकन क्षेपणास्त्रे डागली. या घटनेनं मोठा गदारोळ झाला. रशिया अण्वस्त्रांचा वापर करणार अशी अटकळ सुरु झाली. खुद्द अमेरिकेतही बिडेन प्रशासनाच्या या निर्णयाचा विरोध होत आहे. एकीकडे अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया युक्रेन युद्धाला संपवण्याची भाषा केली तर दुसरीकडे जो बिडेन यांनी आपल्या अध्यक्षीय कारर्कितीमधील सर्वात धक्कादायक निर्णय घेतला. या निर्णयावर युरोपमधील देशांनीही टिका केली आहे. तिस-या महायुद्धाची सुरुवात करणारा निर्णय असे या निर्णयाचे वर्णन होत आहे. हे सर्व होत असतांना युक्रेन आणि रशियाच्या सीमेवर असलेल्या देशांमध्ये दहशतीचे वातावण आहे. रशियानं अण्वस्त्रांचा वापर केल्यास त्याची झळ या देशांनाही बसणार आहे. त्यापैकी काही देशांमध्ये तर युद्ध परिस्थिती झाली तर त्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा याबाबतची प्रणालीही नाही. (America)
त्यामुळे या देशांनी आपल्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. हे सर्व एकीकडे होत असतांना युक्रेनचे अध्यक्ष झेलस्की यांनी आणखी आत्मघातकी पाऊल उचलले आहे. युक्रेनने पहिल्यांदाच ब्रिटनकडून मिळवलेल्या स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्राचा वापर करून रशियाच्या आत हल्ला केला आहे. रशियाने उत्तर कोरियाच्या सैन्याला युद्धात उतरवल्याच्या विरोधात ब्रिटनने प्रथमच रशियाच्या आत या क्षेपणास्त्राचा वापर करण्यास मान्यता दिली आहे. या कृतीमुळे रशिया आणि युक्रेनच्या युद्धात ब्रिटनचीही एन्ट्री झाली आहे. या सर्वांना उत्तर देण्यासाठी रशियानं आपली परमाणू शस्त्र सज्ज करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी जर परमाणू शस्त्र त्यांचा वापर केला तर अर्धेअधिक जग हे युद्धाच्या फे-यात येणार आहे. अमेरिकेच्या बिडेन प्रशासनाच्या या घातकी निर्णयामुळे युक्रेनच्या सामान्य नागरिकांना आणि त्यांच्या शेजारी देशांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. परिणामी या देशांमध्ये आता अणुहल्ला झालाच तर काय करावे यासाठी नागरिकांना माहितीपत्रकाचे वाटप सुरु झाले आहे. (International News)
रशिया आणि युक्रेन युद्धाला 1000 दिवस पूर्ण होत असतांना युद्धानं अण्वस्त्रांकडे कल केला आहे. युक्रेननं अमेरिकेची ATACMS ही एक सुपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली वापरल्यामुळे रशियात संताप व्यक्त होत आहे. यामुळे रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी अण्वस्त्रांचा वापर करण्यासाठी आवश्यक ती तयारी सुरु केली आहे. यामुळे युक्रेनच्या भोवती असलेल्या लहान देशांमध्ये भीतीचे वातावण आहे. फिनलंड, स्वीडन, नॉर्वे या देशांनी युद्धाचा इशारा जाहीर केला आहे. तर 4 देशांनी युक्रेनमधील आपले दूतावास बंद केले आहेत. युद्धात अण्वस्त्रांचा वापर झाल्यास त्याचा धोका नॉर्वे, फिनलंड आणि डेन्मार्क या देशांना अधिक आहे. कारण त्यांच्या सीमा या युक्रेनला लागून आहेत. त्यामुळे या देशांनी आपल्या नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंचा साठा करण्याचे आवाहन केले आहे. तसेच सैनिकांना युद्धासाठी तयार रहा असेही निर्देश दिले आहेत. नॉर्वेमध्ये युद्ध झाले आणि आण्विक अस्त्रे वापरल्यास काय काळजी घ्यावी यासंबंधी पत्रके वाटण्यात येत आहेत. (America)
स्वीडन मधील 52 लाखांहून अधिक नागरिकांनाही अशाच स्वरुपाची पत्रके वाटण्यात येत आहेत. तसेच अणुयुद्धाच्या वेळी किरणोत्सर्गापासून संरक्षण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आयोडीनच्या गोळ्या तयार ठेवा, अशाही सूचना आहेत. स्वीडनमध्ये एक एमजर्न्सी विभाग चालू करण्यात आला आहे. आमच्या देशात सुरक्षेची परिस्थिती गंभीर आहे आणि आम्हाला युद्धाला तोंड देण्यासाठी आमची लवचिकता बळकट करण्याची गरज असल्याचे स्वीडीश संरक्षणमंत्र्यांनी नागरिकांना सांगितले आहे. तसेच नागरिकांनी हल्ला झाल्यास आर्थिक, शारीरिक आणि मानसिक संघर्षासाठी तयार राहण्याचे आवाहन केले आहे. नॉर्वे, स्वीडन या देशात गेल्या अनेक वर्षापासून युदध परिस्थिती कधीही अनुभवलेली नाही. त्यामुळे आता जर युद्ध झाले तर करायचे काय, असा प्रश्न या देशांमधील नागरिकांना पडला आहे. द्वितीय विश्वयुद्धानंतर स्वीडनने आता नागरिकांना युद्धाच्या सूचना देण्यास सुरुवात केली आहे. एका पिढीचे अंतर यात आहे, त्यामुळे नागरिकांना संभाव्य धोकादायक परिस्थिती काय असू शकते, हे समजावणे जिकरीचे झाल्याचे स्वीडनच्या मंत्र्यांचे मत आहे. गेल्या दोन शतकांपासून स्वीडनने एकही युद्ध लढलेले नाही. (International News)
======
हे देखील वाचा : टीव्ही होस्ट ते संरक्षण मंत्री
====
त्यामुळे नागरिकांना अन्नधाऩ्य साठा, आरोग्य सुविधा यासंदर्भात काळजी घेण्याचे आवाहन आहे. आता तिथे नागरिकांना दीर्घकाळ टिकणारे अन्न आणि पाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था आणि बागांमध्ये फळे आणि भाज्या वाढवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. फिनलॅंडमध्येही अशीच परिस्थिती आहे. फिनलँडने रशियासोबतच्या 8 सीमा चौक्या बंद केल्या आहेत. तिथे सरकारने विविध संकटांसाठी सज्जतेची माहिती गोळा करणारी वेबसाइट सुरू केली आहे. याव्यतिरिक्त, फिनलॅंडने आपल्या नागरिकांना युद्धामुळे वीज खंडित होण्यास सामोरे जाण्यासाठी बॅक-अप वीज पुरवठा ठेवण्यास सांगितले आहे. या देशांमधून संभाव्य युद्धपरिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयारी सुरु असतांना अमेरिकेने युक्रेनची राजधानी कीवमधील आपला दूतावास बंद केला आहे. याशिवाय इटली, ग्रीस आणि स्पेननेही कीव दूतावास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे युक्रेनशेजारील देशांमध्ये अमेरिकेबाबत संताप व्यक्त केला जात आहे. आम्हाला युद्धाच्या खायीत लोटून स्वतःच्या नागरिकांना सुरक्षित नेणा-या अमेरिकेचा निषेध आहे, असे मेसेज व्हायरल होत आहेत. (America)
सई बने