कोल्डड्रिंक्सच्या बाटल्यांवर बाटल्या रिचवणारे अनेक चाहते आहेत. मोठ्या मॉलमध्ये या कोल्डड्रिंकच्या बाटल्यांच्या खरेदीत सुट असते. अशावेळी ट्रॉलीच्या ट्रॉली भरुन कोल्डड्रिंक्स खरेदी करणारे दिसतात. महिन्याच्या सामानात ज्या गरजेच्या वस्तू असतात त्यात कोल्डड्रिंक्सच्या बाटल्यांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व कोल्डड्रिंक्सच्या चाहत्यांसाठी आणि त्यातही कोका कोलाच्या (Coca-Cola) चाहत्यांसाठी जागतिक आरोग्य संघटनेनं एक गंभीर इशारा दिला आहे. या कोल्डड्रिंकमध्ये प्रमाणाच्या बाहेर गोडवा असतो. यासाठी अस्पार्टम स्वीटनर त्यात टाकलेले असते. यामुळे कर्करोगाचा धोका सर्वाधिक आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं या कोल्डड्रिंक संदर्भात इशारा देत त्यांना धोकादायक पदार्थांच्या यादीत टाकण्याची तयारी सुरु केली आहे. खाद्यपदार्थ बनवणाऱ्या अनेक कंपन्या साखरेऐवजी कृत्रिम गोडवा वापरतात. यापैकी सर्वात जास्त वापरला जाणारा Aspartame आहे. आता या रसायनाशी संबंधित एक मोठी माहिती समोर आली आहे. त्यानुसार हे कृत्रिम स्वीटनर कर्करोगासारखे आजार देऊ शकते. WHO पुढील महिन्यात अधिकृतपणे याला कार्सिनोजेन म्हणून घोषित करणार आहे. (Coca-Cola)

कोल्डड्रिंक घातक असल्याची आतापर्यंत अनेकवेळा ओरड करण्यात येत होती. मात्र आता त्यावर जागतिक आरोग्य संघटनेनंच घातक असा शिक्का मारला आहे. कोका कोला (Coca-Cola) आणि अन्यही त्यासारख्या पेयांमध्ये गोडव्यासाठी कृत्रिम स्वीटनर वापरण्यात येतो. त्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटना गंभीर झाली आहे. तरुणांमध्ये कोल्डड्रिंक्स पिण्याची सवय जास्त आहे. परिणामी ही तरुण पिढी कर्करोग्याच्या विळख्यात अडकली जात आहे. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं अशा पेयांना धोकादायक पदार्थांच्या यादीत टाकण्याची तयारी सुरु केली आहे. साधारण पुढच्या महिन्यापर्यंत ही कारवाई होईल, असेही WHO ने स्पष्ट केले आहे. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर ही संस्था कर्करोगाला कारणीभूत ठरू शकणार्या किंवा वाढवणार्या पदार्थांच्या यादीत एस्पार्टमचा समावेश करणार आहे. कोका-कोला (Coca-Cola), डाएट सोडा ते मार्स एक्स्ट्रा च्युइंगम आणि इतर काही पेयांमध्ये एस्पार्टमचा वापर केला जातो. आणि हे सर्व तरुणपिढीमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. एस्पार्टम असलेले उत्पादन किती सुरक्षित आहेत यासंदर्भात WHO चे आणखी संशोधन चालू आहे. WHO च्या संशोधनानुसार एस्पार्टमचे दररोज एका मर्यादेपर्यंत सेवन केले तर ते सुरक्षित आहे. पण जर 60 किलो वजनाची व्यक्ती दिवसातून 12-36 कॅन कोल्डड्रिंक पीत असेल तर ते धोकादायक ठरु शकते.
गेल्या वर्षी फ्रान्समध्ये अस्पार्टमवर संशोधन करण्यात आले आहे. यादरम्यान आर्टिफिशियल स्वीटनरचे सेवन करणाऱ्या एक लाख लोकांच्या सवयींचा आणि आरोग्याचा यात अभ्यास करण्यात आला. त्यात असे आढळून आले की, जे लोक मोठ्या प्रमाणात कृत्रिम गोड पदार्थांचे सेवन करतात, म्हणजेच ज्यामध्ये एस्पार्टमचा समावेश आहे, त्यांच्या शरीरात कर्करोगाचा धोका जास्त वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. संशोधनाच्या अहवालानुसार, 350 मिलीच्या लहान असलेल्या कोल्डड्रिंकच्या कॅनमध्ये 10 ते 12 चमचे साखर असते. जागतिक आरोग्य संघटनेनं 5-6 चमच्यांपेक्षा साखर खाणे हे आरोग्याला हानीकारक असते. पण एका छोट्या कोल्डड्रिंकच्या कॅनमधून एकाच वेळी 12 चमचे साखर पोटात जाते. बरेच जण असे चार ते पाच कॅन सेवन करतात. त्यापट साखर त्यांच्या पोटात जाते. हा नाहक गोडवा शरीरात कर्करोगाच्या पेशींना पोषक ठरत असल्याचे संशोधनात आढऴून आले आहे. न्यू हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ अहवालानुसार कोल्डड्रिंकमुळे दरवर्षी सुमारे 2 लाख मृत्यू होत आहेत. यामध्ये कर्करोग झालेल्यांची संख्या अधिक आहे. विशेष म्हणजे आजकाल डायट कोक नावाचेही कोल्डड्रिंक आले आहे. त्यातही तेवढ्याच प्रमाणात साखर असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Coca-Cola)
======
हे देखील वाचा : Hotel आणि Motel मध्ये ‘हा’ आहे फरक
======
सध्या भारतासह जगातील 90 देशांमध्ये एस्पार्टम असलेल्या पेयांचा अतिरिक्त वापर होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं त्यासंदर्भात गंभीर इशारा या देशांना दिला आहे. यापैकी अनेक देशात दिवसा जेवढी कोल्डड्रिंकची विक्री होते, तेवढीच रात्रीही होते. रात्री अशाप्रकारचे अतिगोडवा असणारे पेयांचे सेवन केल्यानं कर्करोग आणि मधुमेहांचे रुग्ण भविष्यात दुप्पटीनं वाढणार आहेत. त्यामुळे या कोल्डड्रिंकपासून जेवढे दूर राहता येईल, तेवढं रहायला हव.
सई बने