Home » भर उन्हात ठेवता येणार तेजस्वी चेहरा

भर उन्हात ठेवता येणार तेजस्वी चेहरा

by Team Gajawaja
0 comment
Bright Face
Share

सध्या तापमानाचा पारा चढता आहे. सूर्यदेव तापल्यावर ज्या कडक उन्हाच्या झळा बसतात, त्या झळा सोसाव्या लागत आहेत. या कडक उन्हात शक्यतो घराबाहेर पडण्यापासून टाळण्याचा अनेकांचा विचार असतो. पण नेहमी ज्यांना घराबाहेर पडावे लागते, त्यांना हे चटके सोसावेच लागतात. काहींचे काम बाहेर फिरुन करण्यासारखे असते. अशांना या उन्हाच्या झळा सोसाव्या लागतात. या उन्हामुळे चेह-याला सर्वाधिक हानी होते. चेहरा काळा होतो. अनेकांना काळे चट्टे चेह-यावर येतात. हे चट्टे लवकर जात नाहीत.  तर काहींना मोठ्या प्रमाणात पुरळ येते. अंगाची लाही लाही होते. अशावेळी चेह-याला काहीही लावले तरी जळजळ होते. त्यामुळे या उन्हाळी चट्ट्यांपासून शरीराचे संरक्षण कसे करावे याची काळजी लागली असते. त्यांच्यासाठी घरच्या घरी अनेक उपाय करता येतात. त्यातील साधे साधे उपाय केले तरी उन्हापासून त्वचा रापण्याचा आणि काळी पडण्याचा धोका कमी होतो.(Bright Face)

उन्हात शक्यतो बाहेर जाताना डोक्यावर टोपी किंवा स्कार्फचा वापर गरजेचा आहे.  तसेच घराबाहेर पडताना आवश्यक असल्यास सनक्रीमचा वापर करावा. तेही शक्य नसेल तर गुलाब जल नक्की जवळ ठेवावे. हलक्या हातांनी हे गुलाबजल चेह-याला लावावे. उन्हात घामाचा खूप वास येतो. अशावेळी हा गुलाबजलचा हलका सुगंध अल्हाददायक वाटतो. उन्हात गेल्यावर चेहरा लाल होतो. तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या लाटेमुळे, त्वचेवर लालसरपणा आणि पुरळ उठते, अशावेळी खाज येते. उन्हातील या लालसर पणावर घरगुती उपाय फायदेशीर पडतात. मात्र ते नियमित करावे लागतात.  चेहऱ्यावरील लालसरपणा कमी करण्यासाठी मध हा चांगला उपाय आहे.  मध हे नेहमीच सौंदर्य उत्पादनात वापरले जाते. त्वचा नितळ आणि सतेज करण्यासाठी मधाचा वापर होतो. यामध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म त्वचेचा लालसरपणा आणि सूज दूर करण्यात मदत करतात. त्वचेवर पुरळ आणि खाज येण्याची समस्या दूर करण्यासाठी देखील मधाचा खूप उपयोग होतो. चेहऱ्यावर लालसरपणाची समस्या देखील असेल तर मधाचा वापर फायदेशीर ठरतो. त्यासाठी रोज मध सकाळी चेह-यावर 15 ते 20 मिनिटे लावून ठेवावे. जर चेहरा लाल झाला नसेल तर त्यात थोडे लिंबू टाकले तरी चालेल. साधारण 15 मिनिटानंतर चेहरा हलक्या हातांनी चोळून  पाण्याने धुतल्यावर स्वच्छ होतो.  हा उपाय नियमितपणे केल्यावर उन्हापासून काळी झालेली त्वचा पूर्ववत होण्यास मदत होते. (Bright Face)  

उन्हाळ्यात गुलाब पाण्यासारखं बहुगुणी कोणीही नाही. गुलाबपाणी त्वचेला थंडावा देऊ शकते. त्याच्या वापरानं सूर्यप्रकाशामुळे खराब झालेली त्वचा पूर्ववत होते. जर चेहऱ्यावर लालसरपणा असेल तर गुलाब पाण्याचा वापर फायदेशीर ठरू शकतो. काहीवेळा नुसते गुलाबपाणी न लावता त्यात काकडीचा रस किंवा टोमॅटोचा रसही मिसळता येतो. तसेच घरात कुठलेही फळ असेल तर त्याचा रस या गुलाब पाण्यासोबत मिळून चेह-याला लावला तर उन्हामुळे झालेला काळेपणा दूर होतो.  शिवाय चेह-याला तकाकी मिळते. उन्हातून घरात आल्यावर अंगावर गुलाब पाणी लावल्यावर त्वचेची झालेली हानी भरुन निघते. तसेच अंघोळीच्या पाण्यातही याचा वापर केल्यास प्रसन्न वाटते. (Bright Face)  

======

हे देखील वाचा : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवणारा आहार जाणून घ्या..

======

कोरफडचा वापरही उन्हापासून त्वचेचा बचाव करु शकतो. कोरफड हे गुणांनी परिपूर्ण आहे. यातील औषधी गुणधर्म हे त्वचेसाठी वरदान ठरतात. चेहऱ्यावर लालसरपणा असेल तर संपूर्ण चेहऱ्यावर कोरफड जेल लावा आणि अर्ध्या तासानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. असे दिवसातून किमान 2 ते 3 वेळा केल्यास आराम मिळेल. तसेच घरात कोरफड उपलब्ध असेल तर त्याचा थोडासा तुकडा तोडून तो चेह-यावर 10 मिनिटे चोळावा. यामुळे त्वचेवर झालेले छोटे घावही भरुन निघतात. त्वचेला उन्हामुळे आलेला काळपटपणाही दूर करण्यास मदत होते.  त्वचा मुलायम होते (Bright Face). कोरफड किंवा त्यापासून तयार केलेली जेल हे दोन्हीही उन्हाळ्याच्या दिवसात फायदेशीर ठरतात. त्याचा वापर जरुर करावा. या सर्वांबरोबर आणखी एक उपाय आहे, तो म्हणजे नारळाचे तेल. हे प्रत्येक घरात उपलब्ध असते. नारळाच्या तेलामध्ये अँटीफंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचेची ऍलर्जी आणि लालसरपणा दूर होण्यास मदत होते. जर चेहऱ्यावर लालसरपणा येत असेल तर त्यावर खोबरेल तेल लावा. अर्ध्या तासानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ करा. दिवसातून तीन ते चार वेळा असे केल्याने लालसरपणा लवकर कमी होतो. उन्हाळा कितीही असला, तरी त्याला घाबरुन सतत घरात बसणे कोणालाही शक्य नसते.  त्यामुळे बाहेर पडणा-यांनी यापैकी कुठलाही उपाय केला तर चेह-याची त्वचा काळपट पडणार नाही.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.