पृथ्वीच्या उर्जेचा मुख्य स्रोत म्हणून सूर्याकडे बघितले जाते. सूर्यामुळे पृथ्वीवरील वातावरणाला आवश्यक उष्णता, ऊर्जा मिळते. सूर्याविना पृथ्वीचे अस्तित्व काय, हा प्रश्नच निर्माण होऊ शकत नाही. कारण सूर्याचे किरण पृथ्वीवर काही दिवस पोहचले नाहीत तरी मोठं संकट निर्माण होईल, अशात सूर्याचं अस्तित्वच नसेल तर पृथ्वीचेही अस्तित्व अशक्य आहे. पृथ्वीच्या जीवनस्रोताचे मुख्य माध्यम असलेल्या या सूर्याच्या बाबत शास्त्रज्ञांनी मोठा दावा केला आहे. त्यामुळे पृथ्वीवर काय परिणाम होणार आहे, याचा अभ्यास शास्त्रज्ञ करीत आहेत. सूर्याच्या हालचाली टिपणा-या शास्त्रज्ञांनी सूर्याचा मोठा भाग तुटल्याची (Sun Piece Broke Off) माहिती दिली आहे. यासंदर्भातला व्हिडीओच शास्त्रज्ञांनी सोशल मिडीयावर शेअर केला आहे. ही मोठी खगोलीय घटना असून पृथ्वीवरील सजीव सृष्टीवर याचा सखोल परिणाम होईल, अशी भीतीही शास्त्रज्ञांना वाटत आहे. मात्र या खगोलीय घटनेचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे. यामुळे सौर वादळ निर्माण होण्याची शक्यता असून, जर पृथ्वीच्या दिशेने सौर वादळ आलं तर यामुळे संपूर्ण जीपीएस यंत्रणा ठप्प होईल. तसेच पॉवर ग्रिड आणि रेडिओ सिग्नलवरही याचा परिणाम होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. (Sun Piece Broke Off)
अंतराळ हवामानशास्त्रज्ञ डॉ. तमिता स्कोव्ह यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवर एका मोठ्या खगोलीय घटनेचा व्हिडीओ शेअर करुन जगभर खळभर निर्माण केली आहे. हा व्हिडीओ सूर्यबाबतचा आहे. सूर्याच्या एका मोठ्या भागाचे तुकडे (Sun Piece Broke Off) झाल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहेत. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने सूर्यास्ताची ही घटना नोंद केली आहे. या घटनेमुळे जगभरातील शास्त्रज्ञांना धक्का बसला आहे. या घटनेनंतर शास्त्रज्ञ अभ्यासाला लागले आहेत. तसेच ही घटना का झाली आणि कशी झाली यासह याचे परिणाम काय याचा शोध घेण्यात येत आहे.
अंतराळ हवामानशास्त्रज्ञ डॉ. तमिता स्कोव्ह यांनी या खगोलीय घटनेचा व्हिडिओ शेअर करताना त्यापासूनचे संभाव्य धोकेही व्यक्त केले आहेत. त्यांनी या खगोलीय घटनेचे विश्लेषण करताना सांगितले आहे की, सूर्याचा एक भाग ठळकपणे वेगळा झाला आहे (Sun Piece Broke Off) आणि उत्तर ध्रुवाभोवती एक विशाल ध्रुवीय भोवरा म्हणून फिरण्यास सुरुवात केली आहे. सूर्याचा तुकडा तुटल्याने (Sun Piece Broke Off) त्याचा पृथ्वीवर काय परिणाम होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एका स्पेस वेबसाइटनुसार, काही दिवसांपूर्वी प्रशांत महासागरात एका शक्तिशाली सौर ज्वालांमुळे रेडिओ ब्लॅकआउट झाला. कोलोरॅडो येथील नॅशनल सेंटर फॉर अॅटमॉस्फेरिक रिसर्चचे उपसंचालक आणि सौर भौतिकशास्त्रज्ञ स्कॉट मॅकिंटॉश यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक सौर चक्रात एकदा सूर्याच्या 55-अंश अक्षांशावर काहीतरी विचित्र घडते. या घटना होत असतात. मात्र त्यांनी कबूल केले की, सूर्याचा भाग तुटल्यामुळे निर्माण झालेला भोवरा आपण आतापर्यंत पाहिला नव्हता…त्यामुळेच ही घटना गंभीर असल्याचे वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. सौरज्वाला सूर्यापासून बाहेर पडत राहतात. याचा पृथ्वीवरील दळणवळणावर परिणाम होतो त्यामुळे, यावेळी सूर्याचा एक भाग तुटल्याची भीती (Sun Piece Broke Off) शास्त्रज्ञांना वाटत आहे. या ताज्या विकासाचा पृथ्वीवर काय परिणाम होईल हे शास्त्रज्ञ समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
=======
हे देखील वाचा : जगातील सर्वाधिक महागड्या हँन्डबॅगेचा लिलाव, किंमत ऐकून व्हाल हैराण
=======
या अभूतपूर्व घटनेवर नासा सध्या चोवीस तास लक्ष ठेऊन आहे. नासानं सांगितलं आहे की, या अशा घटनेमुळे चिंता वाढली आहे. अंतराळ शास्त्रज्ञ आता या अनोख्या घटनेबद्दल अधिक माहिती गोळा करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे 24 तास सूर्याचे अवलोकन करण्यात येत आहे. अशाप्रकारची घटना झाल्यावर मोठ्या सौर वादळाचा धोका असल्याचा संभव आहे. सूर्य हा आगीचा गोळा आहे आणि हा एक निसर्गाचा अद्भुत चमत्कारच आहे. हायड्रोजन एकत्र होऊन हेलियम बनतं आणि या प्रक्रियेला न्यूक्लिअर फ्युजन म्हणतात. त्यामुळे हा ऊर्जेचा एक ज्वालामुखी आहे. हाच सूर्य आपल्या सर्वांचे जीवन आहे. पण या सूर्याचा एक तुकडा तुटल्याची (Sun Piece Broke Off) शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचा पृथ्वीवर काय परिणाम होणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.
सई बने