ग्लॅमर आणि ब्युटी प्रोडक्टसच्या जगातील असे एक नाव जे सध्या एक मोठा ब्रँन्ड म्हणून नाव घेतल्या जाणाऱ्या ‘लॅक्मे’ चे एकेकाळी नाव हे ‘लक्ष्मी’ होते. तुम्हाला हे ऐकून थोडे विचित्र वाटेल, पण त्या संबंधित अधिक माहिती वाचाल तर तुम्ही सुद्धा हैराण व्हाल. कारण या देशाचे प्रख्यात उद्योगपती जेआरटी टाटा यांनी तो सुरु केला होता. या कंपनीच्या उदयाची कथा ही देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यासंबंधित आहे. लॅक्मे कंपनीचा ब्रँन्ड होण्यामागे गेल्या काही पिढ्यांमधील ते आतापर्यंत अभिनेत्र्यांनी जाहिरातींमधून तो ब्रँन्ड प्रमोट केला आहे. तर जाणून घेऊयात जेआरडी टाटा यांच्या हस्ते सुरु झालेल्या ब्युटी प्रोडक्टसची कंपनी लक्ष्मी म्हणजेच लॅक्मेची कथा.(Lakme brand story)
कंपनीची कथा ही जवळजवळ ७० वर्ष जुनी आहे. जेआरडी टाटा यांनी १९५२ मध्ये या कंपनीची सुरुवात केली होती. तेव्हा मध्यव वर्गातील महिला या घरगुती पद्धतीने तयार करण्यात आलेल्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करायच्या. तर श्रीमंत घरातील महिला या परदेशातून आणलेल्या ब्युटी प्रोड्क्टस वापरायच्या. अशाप्रकारे भारतातील पैसा हा विदेशात जात होता. देशात औद्योगिकीकरण संदर्भात काम करत असलेले तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरुन यांना देशाचा एक ब्युटी ब्रँन्ड तयार करायचा होता. तेव्हा भारतात कोणाताही ब्युटी प्रोड्क्ट्स ब्रँन्ड नव्हता. त्यांना असे वाटायचे की, मध्यम वर्गातील महिला सुद्धा भारतातील ब्युटी प्रोडक्टचा ब्रँन्ड हा त्यांच्या शिखाला परवडण्यासारखा असावा.
नेहरुंनी टाटांना सांगितली आयडिया
पंडित नेहरुंना असे वाटायचे की, ब्युटी प्रोडक्टसची किंमत स्वस्त असावी, जेणेकरुम मध्यम वर्गातील लोकांकडून ते खरेदी केले जाईल. हिच आयडिया त्यांनी जेआरडी टाटा यांना सांगितली. टाटा हे व्यवसायाची साखळी उभी करण्यास तरबेज होतेच आणि त्यांना नेहरुंची ही नवी आयडिया फार आवडली. अशाप्रकारे लॅक्मे कंपनीची सुरुवात झाली. पण तेव्हा कंपनीचे नाव हे लॅक्मे नव्हते. या ब्युटी प्रोडक्टच्या नावावरुन फार चर्चा आणि विचार ही करण्यात आला. तेव्हा भगवती देवी लक्ष्मी नावाने त्याचे नाव लक्ष्मी असे ठेवण्यात आले. १९५२ मध्ये याची सुरुवात झाल्यानंतर काही वर्षे त्याचे नाव लक्ष्मीच राहिले होते.
हे देखील वाचा- Bisleri च्या ब्रँन्डचे पाणी कसे झाले लोकप्रिय? वाचा यशाची कहाणी
बॉलिवूडच्या अभिनेत्र्यांमुळे मिळाली अधिक प्रसिद्धी
लक्ष्मी ब्रँन्ड मोठा होण्यामागे बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्र्यांची महत्वाची भुमिका राहिली आहे. ५०-६० दशकातील काही बॉलिवूड अभिनेत्र्यांनी या ब्रँन्डसाठी जाहिराती केल्या. हेमा मालिनी ते जया प्रदा सारख्या अभिनेत्र्यांनी या कंपनीच्या जाहिरातींमध्ये काम केले. याचा परिणाम असा झाला की, ब्रँन्ड लॉन्च झाल्यानंतर लक्ष्मीचा देशात अधिक खप होऊ लागला आणि परदेशातून येणारे ब्युटी प्रोडक्ट्स हे जवळजवळ बंदच होऊ लागले. तेव्हा लक्ष्मी ब्युटी प्रोडक्ट्सचा सिनेमांमध्ये अधिक वापर करण्यात येऊ लागला तेव्हा तो लोकांमध्ये अधिक लोकप्रिय होऊ लागला.(Lakme brand story)
लक्ष्मीचे नाव लॅक्मे कसे झाले?
अवघ्या ५ वर्षातच लक्ष्मी एक ब्रँन्ड झाला होताच. तसेच टाटांचा हा व्यवसाय ही अधिक विस्तारला गेला होता. त्यामुळे त्यांनी १९६६ च्या आसपास लक्ष्मी ब्रँन्ड विकण्याचा विचार केला. बहुतांश कंपन्यांनी तो खरेदी करण्यासाठी बोली लावल्या. पण अखेर हिंदुस्तान लीवर यांनी बोली जिंकली. टाटा यांना वाटत होते की, हिंदुस्तान लीवर आपला ब्रँन्ड वरती घेऊन जातील. त्यानंतर १९६६ मध्ये लक्ष्मी ब्रँन्ड हा हिंदुस्तान लीवरचा झाला. त्याचसोबत कंपनीने त्याचे नाव बदलून लॅक्मे असे ठेवले.