Home » वडिलांचा आधार ते सिनेमा क्षेत्रातील संजू बाबाचा प्रवास, संजय दत्तच्या आयुष्यातील काही खास किस्से

वडिलांचा आधार ते सिनेमा क्षेत्रातील संजू बाबाचा प्रवास, संजय दत्तच्या आयुष्यातील काही खास किस्से

by Team Gajawaja
0 comment
Share

Sanjay Dutt Birthday- बॉलिवूडमध्ये डेडली दत्त, मुन्ना भाई नावाने ओळखल्या जाणाऱ्या संजय दत्तचा आज वाढदिवस. संजय दत्तने वयाची साठी जरी ओलांडली असली तरीही त्याच्या चाहत्यांकडून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला जातो. नायक ते खलनायक अशा वेगवेगळ्या चौकटीतील भूमिका पार पाडणाऱ्या संजय दत्तने रोमान्सच्या कथेत सुद्धा प्रेक्षकांवर आपली छाप सोडली आहे.  प्रेक्षकांनी प्रेमाने त्याला संजू बाबा असे नाव दिले. संजू बाबाचे रुपेरी पडद्यावरील आणि खासगी आयुष्य हे नेहमीच चर्चेत राहणारे ठरले आहे. संजय दत्तच्या आयुष्यात वेळोवेळी त्याच्या वडिलांनी त्याला फार सांभाळून घेतले होते.  संजय दत्तच्या आयुष्यातील काही खास किस्स्यांबद्दल थोडंसं –

सुनील दत्त आणि संजय दत्त

संदय दत्तचे वडील सुनील दत्त हे सुद्धा बॉलिवूडमधील एक दिग्गज अभिनेते आणि निर्माते होते. त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काही हिट सिनेमे दिले होते. परंतु सुनील दत्त आणि संजय दत्त यांचे नाते हे वडील-मुलापेक्षा जास्त मित्रत्वाचे होते. वेळोवेळी संजय दत्तच्या वडिलांनी प्रत्येक संकटात त्याची मदत केली. वडिलांच्या पुण्यतिथीच्या दिवशीही त्याने एक भावूक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये त्याने म्हटले होते की, तुम्ही माझ्या चांगल्या-वाईट काळात माझी साथ दिली होती. तुम्ही माझी ताकद, प्रेरणा होतात/आहात माझ्या प्रत्येक गरजांमध्ये तुम्ही उभे राहिलात… या सर्वांची कोणताही मुलगा अपेक्षा करतोच पण तुम्ही ते त्यात कुठेही कसूर केली नाही. संजय दत्तने आपल्या बॉलीवूड करियरमध्ये अनेक सिनेमे केले पण त्याच्यासाठी ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ हा फार खास आहे. कारण यामध्ये संजय दत्तने आपल्या वडिलांसोबत काम केलं होतं. यामध्ये दोघांनी मुलगा आणि वडिलांची भूमिका साकारली होती.

संजय दत्तची कारकीर्द 

संजय दत्तच्या कारकिर्दीमध्ये फार चढउतार आले आहेत. AK 47 बाळगल्याप्रकरणी त्याला तुरुंगातही जावे लागले होते. याचा संजय दत्तच्या कारकिर्दीवर फार मोठा परिणामही झाला होता. बाल कलाकाराच्या रुपात संजय दत्तने पहिल्यांदाच ‘रेशमा आणि शेरा’ सिनेमातून एन्ट्री केली होती. पण मुख्य अभिनेत्याच्या भुमिकेत पहिलाच सिनेमा होता ‘रॉकी’. संजय दत्तचा हा सिनेमा फार गाजला. त्यानंतर त्याने अनेक सुपरहिट सिनेमे दिले आणि उत्तम अभिनेता म्हणून नावारुपाला आला. ‘खलनायक’ सिनेमातील त्याची ‘बल्लू’ नावाची व्यक्तिरेखा आजही सर्वांना माहिती आहे. वास्तव सिनेमातील त्याच्या भुमिकेला सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला होता. संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित ‘संजू’ नावाचा सिनेमा आला होता. त्यामध्ये संजय दत्तच्या उभ्या आयुष्याची कथा रुपेरी पडद्यावर दाखवण्यात आली आहे. या सिनेमात अभिनेता रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका साकारली होती. 

जेव्हा गर्लफ्रेंडच्या सी-ग्रेड फिल्ममुळे लाज वाटली तेव्हा…

असे सांगितले जाते की, वयाने जवळजवळ १९ वर्ष लहान असलेली मान्यता दत्त अशा वेळी संजय दत्तच्या आयुष्यात आली जेव्हा त्याची दुसरी पत्नी रिया पिल्लई सोबत त्याचा घटस्फोटही झाला नव्हता. दुबईत वाढलेली-शिकलेली मान्यता ही १९९९ च्या दशकात आपल्या परिवारासोबत मुंबईत आली आणि आपले नशीब सिनेमा क्षेत्रात आजमावायचा प्रयत्न करत होती. मान्यताने २००२ मध्ये सी-ग्रेड फिल्मध्ये काम केले होते. परंतु संजय दत्तला याची फार लाज वाटली होती. एवढेच नव्हे तर त्याने २० लाख रुपये खर्च करुन त्या फिल्मचे राईट्स घेतले आणि फिल्मीच्या सर्व डिव्हिडी-सीडी सुद्धा मार्केटमधून परत मागवल्या.(Sanjay Dutt Birthday)

हे देखील वाचा- कधीही न मावळणारं फुल दीपिकाला देण्यासाठी रणवीरने केलं भलतंच  साहस…

संजय दत्तचे लग्न आणि परिवार

संजय दत्तच्या आयुष्यात आलेल्या नव्या स्त्रीमुळे त्याच्या जवळच्या लोकांसह बहिणांना सुद्धा ती गोष्ट आवडली नव्हती. पण संजयने ७ फेब्रुवारी २००८ मध्ये मान्यतासोबत सिव्हिल सेरेमनीअंतर्गत लग्न केले आणि त्यावेळी दोन्ही बहिणी लग्नात आल्या नाहीत. कथित रुपात असे सांगितले जाते की, मीडियाला त्याच्या लग्नाबद्दल मीडियाला ११ फेब्रुवारीला कळले जेव्हा त्याने हिंदू पद्धतीने लग्न केले.  तेव्हा सुद्धा बहिणी आल्या नाहीत. पण संजय दत्तचा खास मित्र सुनील शेट्टीने या लग्नात कन्यादान केले होते.  

आता मान्यता बेस्ट लाइफ पार्टनर आणि उत्तम आई म्हणून नेहमीच आपली भूमिका पार पाडताना दिसून येते. ऐवढेच नव्हे तर संजय दत्तची पहिली बायको ऋचा शर्मा हिची मुलगी त्रिशाला सुद्धा मान्यता आणि तिच्या मुलांसोबत आता आपले नाते नेहमीच जपण्याचा प्रयत्न करताना दिसून येते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.