Home » सोशल मीडियावर व्यक्त होताना सावध राहा अन्यथा गमवाल नोकरीची संधी 

सोशल मीडियावर व्यक्त होताना सावध राहा अन्यथा गमवाल नोकरीची संधी 

by Team Gajawaja
0 comment
social media and hiring process
Share

आयुष्य जस जसं पुढे सरकत असतं तसं तसं तुम्ही अपग्रेड होत असता आणि तुमच्या सोबतच तुमच्या आजूबाजूची परिस्थितीसुद्धा बदलत असते, बदलत राहते. नोकऱ्यांच्या बाबतीतही तसंच. पूर्वी एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जॉब करायला गेलं की, त्या नोकरी बदलणाऱ्या माणसाचं व्यक्तिमत्व कसं आहे हे तपासून पाहण्यासाठी त्याच्याविषयी चार ठिकाणी चौकशी करावी लागत असे. (Social media and Hiring process)

हल्ली मात्र तसं फार क्वचित करावं लागतं. कारण सोशल मीडिया हे नवं गणित आता अस्तित्वात आलंय. पूर्वी चार पैकी एखादा सोशल मीडिया वापरणारा निघायचा, हल्ली चारापैकी चारही सोशल मीडिया वापरत असतात. आपल्याही नकळत आपला सोशल मीडियावरचा वावर आपल्याबद्दल खूप काही सांगत असतो आणि तोच सोशल मीडियावरचा वावर पडताळून आपल्याला नोकरीसाठीसुद्धा ताडलं जात असतं.

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, हाच सोशल मीडियावरचा वावर तुमचं प्रोफेशनल अस्तित्व चांगलं बनवण्यासाठी कसा वापरुन घ्यायचा. ( Social media and Hiring process)

सोशल मीडियावरचं अस्तित्व

आता मुळात आपल्याला असा प्रश्न पडतो की linkdin सारख्या प्रोफेशनल ॲप्सवर आपलं अकाउंट असणं ठीक आहे, पण इंस्टाग्राम किंवा फेसबुक सारख्या ॲप्सवर मुळात आपलं अकाऊंट असण्याची काही गरज आहे का? तर आहे, आणि कायम असते. उलट तुमचं कुठेही अकाऊंट नसलं, तर ते तुमच्या नोकरी मिळवण्याच्या दृष्टीने जास्त घातक असेल.

तुमचं नाव समजा कुठल्या कंपनीसाठी निवडलं गेलं, तर तुमचा इंटरव्ह्यू घेणारी व्यक्ती  सर्वात आधी  तुमचं सोशल मीडियावरचं अकाऊंट पाहून घेतात. त्यामुळे सोशल मीडिया हेच तुमचं पहिलं इम्प्रेशन ठरत असतं.

सोशल मीडियावर मतं मांडणं

सोशल मीडियावर आपली मतं परखडपणे मांडणं चुकीचं नाही, पण लोकं एखाद्या गोष्टीवर आक्षेप घेऊ शकतील अशा गोष्टी तिथे लिहिणं किंवा बोलणं चुकीचं ठरू शकतं. त्याचा तुमच्या रोजच्या आयुष्यावर आणि नोकरीवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काय बोलायचं, कशा विषयी बोलायचं आणि किती मर्यादेत बोलायचं या सगळ्याचा आपल्याला विचार करायला हवा आणि मगच व्यक्त व्हायला हवं. (Social media and Hiring process)

पर्सनल नव्हे प्रोफेशनल व्हा

सोशल मीडियावरचं तुमचं अकाऊंट तुम्हाला जितकं कमी पर्सनल आणि जास्त प्रोफेशनल ठेवता येईल तितकं ठेवायला लागतं. हवंतर पर्सनल प्रोफाइल वेगळं ठेवलं तरी चालेल पण तुमचा प्रोफेशनल अपीयरन्स तुमच्याविषयी नेहमी एक चांगली आणि वेगळी छाप पाडणारा असतो. त्यामुळे चांगली छाप पाडण्यासाठी शक्यतो कामाविषयी आणि करियरशी संबंधित असलेल्या गोष्टीच सोशल मिडियावर टाकाव्या.

====

हे देखील वाचा – पार्टनरला सरप्राइज देताना कधीच करु नका ‘या’ चुका

====

फोटो फार महत्वाचा

सोशल मीडियावरचा तुमचा फोटो तुमच्याबद्दल सगळं काही सांगणारा असतो. तुमचे लूक्स फार महत्वाचे नसले तरी तुमचं राहणीमान, तुमचा चॉइस, तुमचे फीचर्स, तुमच्या आवडी निवडी, तुमचा आत्मविश्वास, गेटअप आणि तुमचा एकंदरीत प्रेझेन्स हे सगळं त्या एका फोटोवर स्पष्ट होत असतं. त्यामुळे हा फोटो फार महत्त्वाचा आहे.

आता प्रोफेशनल फोटोसाठी प्रोफेशनल फॉटोग्राफरकडून तो काढून घ्यायची गरज नाही, पण फोटो सोबर, नीट आणि क्लियर आहे की नाही याची काळजी घेतली तरी तेवढं पुरतं. (Social media and Hiring process)

संवाद साधणं महत्त्वाचं 

सोशल मिडीयाची ओळखच मुळात लोकांशी जोडलं जाणं अशी आहे. शिवाय लोकांपर्यंत पोहोचणं किंवा जोडलं जाणं हे संवादामुळेच साध्य होतं. त्यामुळे सोशल मीडियावरुन लोकांशी संवाद साधणं हीच तुमच्यासाठी नवीन संधी असू शकते. तुमच्या आवडी निवडी, तुमचे स्किल्स, तुमची काम करण्याची क्षमता या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही स्वतः व्यक्त होणं फार महत्त्वाचं असतं.

शिवाय सतत काळासोबत स्वतःला अपडेट करत रहाणं, सोशल मीडियामुळे कळणाऱ्या चार चांगल्या गोष्टी आत्मसात करणं, शिकून घेणं, दुसऱ्याच्या उपयोगी येणं, समोरच्याला मदत करणं, कॉन्टॅक्ट्स वाढवणं या सगळ्या गोष्टी तुम्ही साध्य केल्यात तरी तुम्हाला अनेक नव्या संधी खुल्या होऊ शकतात. तुमची एक छान इमेज तयार होऊ शकते आणि फक्त नोकरीसाठी म्हणून नाही, तर तुमच्या संपूर्ण आयुष्यावर सुद्धा त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो.(Social media and Hiring process)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.