जगातील बहुतेक देशांमध्ये रविवार हा सुट्टीचा दिवस असतो. रविवारी कोणीच काम करत नाही. खासगी कार्यालय सोडले तर, सरकारी कार्यालयात काहीही काम नसते. सोमवार ते शनिवार असे सलग ६ दिवस काम केल्यानंतर कर्मचारी रविवारी विश्रांती घेतात. रविवारी लोक त्यांची वैयक्तिक कामे करतात. (sunday is not a holiday)
पण या जगात एक असा देश आहे, जिथे रविवारची सुट्टी नसते. या देशात रविवारीही कार्यालयाची सर्व कामे करावी लागतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, रविवारी केलेल्या कामाचे पैसे देखील त्यांना मिळत नाहीत. आम्ही बोलत आहोत उत्तर कोरियाबद्दल. खरं तर, उत्तर कोरियावर किम जोंग उन यांचे राज्य आहे. त्यांनी आपल्या नागरिकांवर अनेक विचित्र नियम लागू केले आहेत, जे इतर देशांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. (sunday is not a holiday)

हुकूमशहाचे विचित्र नियम
उत्तर कोरिया जगातील सर्वात गुप्त देशांपैकी एक आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन देशातील कोणतीही माहिती बाहेर पडू देत नाही. उत्तर कोरियामध्ये काय चालले आहे, लोक कसे राहतात, त्यांची जीवनशैली काय आहे, हे जाणून घेणे फार कठीण आहे. मात्र, काही लोक उत्तर कोरियातून पलायन करत बाहेरच्या इतर देशांमध्ये आश्रय घेत आहेत. हे लोक या देशाची गुपिते उघड करत आहेत. या देशाच्या पलायन केलेल्या नागरिकांकडूनच माहिती मिळाली की, या देशातील लोकांना रविवारी सुट्टी दिली जात नाही. सुट्या देशाच्या हिताच्या नाहीत, असे हुकूमशहाचे मत आहे. (sunday is not a holiday)

रविवारी करावे लागते मोफत काम
उत्तर कोरियामध्ये प्रत्येकाला रविवारीही रोजप्रमाणे काम करावे लागते. या देशात कार्यालयातून रजा घेणे फार कठीण काम आहे. कर्मचार्यांना अगदी अत्यावश्यक असतानाच रजा दिली जाते. येथे फक्त तेव्हा सुट्टी दिली जाते, जेव्हा एखादी व्यक्ती इतकी आजारी असेल की त्याला बसताही येत नाही. (sunday is not a holiday)
हे देखील वाचा: एकही रस्ता नसलेलं गाव! लोक कार आणि बाईकऐवजी खरेदी करतात बोट

नाही मिळत पगार
या देशात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फक्त सहा दिवसांचा पगार दिला जातो. येथे रविवारी काम केल्याचा मोबदला दिला जात नाही. एखादी व्यक्ती सरकारी कर्मचारी असो वा खासगी कर्मचारी असो, प्रत्येकाला रविवारी मोफत काम करावेच लागते. हुकूमशहाच्या मते, रजा घेणे देशाच्या हिताचे नाही. त्यामुळे रविवारी मोफत काम करवून घेतले जाते. (sunday is not a holiday)