आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात मोबाईल आणि टीव्हीसह स्मार्ट गॅजेटशिवाय जगणे मुश्किलच आहे. परंतु जगातील असा एक देश आहे जेथे या सर्व गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. येथे तर ना टीव्ही ना मोबाइल वापरता येत. फक्त रेडियोवर गाणी काय तर स्मार्ट गॅजेट ही वापरु शकत नाही. वायफायचा ही वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. खरंतर अमेरिकेतील पश्चिम वर्जिना मधील ग्रीन बँक या शहरात हे सर्व नियम लागू करण्यात आले आहेत. येथे कठोर नियम लागू केल्याने तो एखाद्याने मोडल्यास त्याला थेट तुरुंगात पाठवले जाते. नियमांमुळेच येथे राहणाऱ्या लोकांना काही गोष्टी संभाळून कराव्या लागतात.(Green Bank City)
फक्त १५० लोकसंख्या असलेले शहर आहे ग्रीन बँक सीटी
अमेरिकेतील या शहरात अत्यंत कमी लोक राहतात. फक्त १५० लोकसंख्या असलेल्या या शहरात ना कोणाकडे टीव्हा ना ही मोबाईल आहे. ऐवढेच नव्हे तर वायरलेस हेडफोन, रिमोट कंट्रोलने चालणारी खेळणी, मायक्रोवेवचा सुद्धा वापर करु शकत नाहीत. येथील लोक गोष्टींशिवाय आयुष्य जगतात. येथील लोक अत्यंत साधेपणाने आयुष्य जगतात. बाहेरील व्यक्तींना ही गोष्ट थोडी विचित्र वाटेल पण येथे राहणाऱ्यांसाठी ही सामान्य स्थितीच आहे. कारण येथील नियमांनुसार त्यांनी जगणं शिकलं आहे. सोशल मीडियात सुद्धा जेव्हा या शहरावर लावण्यात आलेल्या प्रतिबंधासंदर्भातील गोष्टी व्हायरल होतात तेव्हा बहुतांश युजर्सला वाटते की, हे सर्व खोटे आहे.
हे देखील वाचा- ‘या’ शहरात तब्बल ६६ दिवस उगवत नाही सूर्य, पण कसं काय?
गोष्टींवर बंदी का घालण्यात आली?
अमेरिकेतील या शहरातील काही गोष्टींवर बंदी घालण्यामागील कारण असे की टेलिस्कोप. येथे जगातील सर्वाधिक मोठा स्टीयरेबल रेडियो टेलिस्कोप आहे. त्याला ग्रीन बँक टेलिस्कोप असे सुद्धा म्हटले जाते. तो आकाराने ऐवढा मोठा आहे की, त्याच्या डिशमध्ये एक फुटबॉलचे मैदान सामावले जाऊ शकते. हे टेलिस्कोप जवळजवळ ४८५ फूट लांब आणि वजन ७६०० मॅट्रिक टन आहे. द गार्जियनच्या रिपोर्ट्सनुसार येथे वाय-फायवर ही बंदी आहे.(Green Bank City)
जेथे टेलिस्कोप लावण्यात आला आहे तेथे अमेरिकेतील नॅशनल रेडिओ एस्ट्रोनॉमी ऑब्जरवेट्री असून ते १९८५ मध्ये स्थापन करण्यात आले होते. या ऑब्जरवेट्री मध्ये वैज्ञानिक अशा तरंगांवर अभ्यास करत आहेत जे अंतराळातून पृथ्वीवर येतात. त्यामुळे या वेधशाळेच्या आसपास टीव्ही, मोबाईल, वायफायचा वापर केल्यास यामधून निघणाऱ्या तरंगांचा थेट परिणाम अंतराळातून पृथ्वीर येणाऱ्या तरंगावर पडेल आणि ते प्रभावित होईल. अशातच त्या संदर्भातील योग्य माहिती मिळालेली नाही. त्यामुळे येथे इलेक्ट्रॉनिक गोष्टी आणि गॅजेट्सच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.