धकाधकीच्या आयुष्यात आरोग्याकडे योग्य वेळीच लक्ष न दिल्यास काही गंभीर आजारांना आपणच आमंत्रण देतो. त्यापैकीच एक म्हणजे मधुमेह. असे मानले जाते की, मधुमेह एखाद्याला झाल्यास तो त्याच्यासोबत आयुष्यभर राहतो. या व्यतिरिक्त वेळीच मधुमेहाच्या समस्येवर लक्ष न दिल्यास तुमच्या आरोग्यासाठी ती घातक ठरु शकते. याच कारणामुळे आम्ही तुम्हाला मधुमेहासंबंधित सर्व माहिती सांगणार आहोत. त्याचसोबत तो नियंत्रित कसा करायचा हे सुद्धा पाहणार आहोत.(Diabetes symptoms)
मधुमेह म्हणजे काय?
रक्तातील साखर वाढणे याला आपण मधुमेह म्हणतो. ही समस्या अशावेळी उत्पन्न होते जेव्हा इंन्सुलिनचे काम बाधित होते. इंन्सुलिन हे एक हार्मोन आहे. इंन्सुलिन हे ग्लुकोजला उर्जेत रुपांतक करण्यास मदत करते. पण जेव्हा त्याच्या कार्यात अडथळा येते तेव्हा ग्लुकोजचे उर्जेत रुपांतरण होण्याऐवजी रक्तात ते थांबते आणि जेव्हा ग्लुकोजचा रक्तातील स्तर वाढू लागतो तेव्हा मधुमेहाची समस्या निर्माण होते.
मधुमेहाचे प्रकार
मुख्यत्वे मधुमेहाचे तीन प्रकार असतात त्याची आपण पुढे माहिती घेऊयात.
टाइप १- यामध्ये मधुमेहात इम्युन सिस्टिम इंन्सुलिन तयार करणाऱ्या कोशिका नष्ट करतात. यामुले इंन्सुलिन तयार होत नाही. अशा स्थितीत रुग्णाला इंन्सुलिनचे इंजेक्शन द्यावे लागते.
टाइप २- यामध्ये शरिरातील इंन्सुलिनचे प्रमाण कमी होते किंवा योग्य प्रकारे इंन्सुलिनचा पुरवठा शरिराला होत नाही. हा मधुमेहातील सर्वसामान्य प्रकार आहे, जो कोणत्याही वयातील व्यक्तीला होतो.
गर्भावधि मधुमेह (Gestational Diabetes)- हा मधुमेह प्रेग्नेंसीदरम्यान होते. काही वेळेस प्रेग्नेंसीमध्ये टाइप-२ मधुमेहाचे प्रकार अधिक दिसून येतात.
या व्यतिरिक्त सुद्धा मधुमेहाचे आणखी काही प्रकार आहेत. जसे की मोनोजेनिक मधुमेह, सिस्टिक फाइब्रोसिस.
मधुमेहाची लक्षणं
तहान लागणे, वारंवार लघवी होणे, भुक वाढणे, थकवा जाणवणे, अंधुक दिसणे, हात-पाय सुन्न पडणे, जखम लवकर न भरणे आणि वजन कमी होणे.(Diabetes symptoms)
मधुमेहाची कारणं
-टाइप १ मधुमेहामध्ये जेव्हा इम्युन सिस्टिम इंन्सुलिन तयार करणाऱ्या कोशिका नष्ट करतो. संक्रमणामुळे किंवा हा अनुवांशिक सुद्धा असू शकतो.
-टाइप २ मध्ये हा सर्वसामान्य प्रकार असून यामध्ये लठ्ठपणा, इंन्सुलिन कमी होणे किंवा टाइप १ प्रमाणेच अंनुवांशिक ही असू शकतो.
-गर्भावधि मधुमेहाची कारणं ही, जर प्रग्नेंसी दरम्यान वय २५ वर्षापेक्षा अधिक, महिलेच्या परिवारातील एखाद्याला मधुमेहाची समस्या, हाय बीपी ची समस्या, प्रग्नेंसीपूर्वी वजन अधिक असणे, यापूर्वी गर्भपात केला असेल तर, जर ४ किलोपेक्षा अधिक वजन असणाऱ्या मुलाला जन्म दिल्यास किंवा प्रेग्नेंसी दरम्यान महिलेचे वजन अधिक वाढणे.
हे देखील वाचा- किडनी स्टोन झाला असेल तर काय खाल्ले पाहिजे?
मधुमेहासाठी डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
जर एखाद्याला मधुमेहाची समस्या आहे आणि त्याला आजारी वाटत असेल आणि खाली दिलेली लक्षणं ही दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.
-जर रक्तातील साखर अधिक प्रमाणात वाढली
-उलटी झाली
-रक्तातील साखरचेचे प्रमाण हे सामान्यवरुन अधिक कमी झाले आणि काही खाल्ल्याने सुद्धा न वाढल्यास
-जर १०० °F किंवा त्याहून अधिक शरिराचे तापमान असेल
-पाहणे, बोलण्याची समस्याची असेल तर
-हात पाय हलवण्यास समस्या.
मधुमेह झालेल्यांनी काय खावे आणि काय खाऊ नये?
काय खाल्ले पाहिजे?
हिरव्या भाज्या- जसे ब्रोकली, गाजर, मिर्ची, टोमॅटो, हिरवे वाटाणे आणि मका. तसच फळ जसे केळ, संत्र, द्राक्ष, सफरचंद, मासे, ओट्स, चिकन, अंडी, लो फॅट दूध, दही, नट्स किंवा शेंगदाणे.
काय खाऊ नये?
अधिक तळलेले पदार्थ, अतिगोड पदार्थ, सोडियम युक्त आहार, शुगर युक्त पेय जसे कोल्ड ड्रिंक, एनर्जी ड्रिंक किंवा सोडा.