अनेकदा असे दिसून आले आहे की, महिलांना त्यांची नखे वाढवण्याची खूप आवड असते. मात्र तुमची ही सुंदर दिसणारी नखे तुमच्या आरोग्याला अनेक प्रकारे हानी पोहोचवू शकतात. होय, एका संशोधनात ही बाब समोर आली आहे. हाताच्या अस्वच्छतेमुळे आणि लांब नखे न कापल्यामुळे, बाहेरील घाण आणि जंतूंमुळे पिनवर्म्ससारखे अनेक धोकादायक आजार होण्याची शक्यता वाढते. (long nails side effects)
काय आहे पिनवर्म?
पिनवर्म हे जंत संसर्गाचा एक प्रकार आहे. हे अतिशय पातळ आणि पांढऱ्या रंगाचे कीटक आहेत, जे एक इंचापेक्षाही लहान असतात. अनेकांना याच्या संसर्गाची माहितीही नसते. अनेकांना खाज येणे, झोपेत त्रास होणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. हे कीटक तुमच्या नखांच्या मदतीने शरीरात जाऊन तुमचे नुकसान करते.
कधी मिळते या संसर्गाबद्दल माहिती?
या संसर्गाबद्दल तेव्हा समजते, जेव्हा नखांच्या आजूबाजूला सूज आणि वेदना जाणवू लागतात. जर तुमची नखे लांब असतील, तर ही समस्या नीट कळत नाही. ज्यामुळे ही समस्या आणखी गंभीर बनू शकते. (long nails side effects)
====
हे देखील वाचा: ‘Haunted’ मानले जाते सुरतचे ‘हे’ बीच, विकिपीडियावरही केला गेलाय भयावह उल्लेख!
====
अशी घ्या काळजी
– नखं वेळोवेळी ट्रिम करत रहा.
– नखे दातांनी कुरतडू नका.
– नेल ग्रूमिंग टूल वापरण्यापूर्वी आणि नंतर ते पूर्णपणे स्वच्छ करा.
– नखे त्यांच्या आतील भागापर्यंत स्वच्छ करा.
– जास्त काळ कृत्रिम नखे वापरू नका. (long nails side effects)
====
हे देखील वाचा : मधुमेहाची कारणं, लक्षणांसह ‘या’ बद्दल ही जाणून घ्या अधिक
====