जंकफुड आणि स्ट्रिटफूड हे सध्या सर्वाधिक प्रमाणात लहान मुलं सुद्धा खाऊ लागली आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये ही लठ्ठपणाची समस्या वेगाने वाढत आहे. दरम्यान, लठ्ठपणाचे कारण फक्त खाणं असू शकत नाही या व्यतिरिक्त काही गोष्टी सुद्धा आहेत जी अधिक वजन वाढण्यासाठी कारणीभूत आहेत. ज्या वेळी एक मुलगा लठ्ठपणाचा शिकार होते तेव्हा त्याच्यामध्ये मधुमेह किंवा हायपरटेंन्श सारख्या आरोग्यासंबंधित आजार वाढू शकतात. ही एक योग्य बाब नव्हे. अशातच स्वत:सह मुलांच्या वजनावर सुद्धा लक्ष ठेवावे. जेणेकरुन आरोग्यासंबंधित आजारांपासून दूर राहता येईल. लठ्ठपणापासून सुटका मिळवण्याचे एकच उपाय म्हणजे नियमित रुपात व्यायाम करणे. तसेच फक्त खाणं नव्हेच तर अयोग्य लाइफस्टाइल सुद्धा मुलांमध्ये होणाऱ्या लठ्ठपणाचे मोठे कारण असते तर जाणून घेऊयात मुलांमध्ये लठ्ठपणाची खाणं हेच कारण नसून आखणी कोणती कारणं असतील त्याबद्दल अधिक. (Childhood obesity)
अयोग्य लाइफस्टाइल
जर एखादे मुल कोणतीही शारिरीक अॅक्टिव्हिटी करत नसेल आणि तो संपूर्ण दिवस हा फक्त बसून टीव्ही, गेम खेळत असेल तर त्याचे वजन वाढण्याचे मुख्य कारण होऊ शकते.
डाएट
गरजेपेक्षा अधिक प्रोसेस्ड फूड, गोड ड्रिंक्स आणि कॅलरीमुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढू शकतो.
जेनेटिक ही असू शकते कारण
जर पालकांमध्येच लठ्ठपणाची समस्या असेल तर मुलाला सुद्धा लठ्ठपणाची शक्यता असते.
मनोवैज्ञानिक कारण
पालक आणि घरातील तणावामुळे मुलांमध्ये लठ्ठपणाचा धोका वाढवू शकतात. काही मुलं समस्येपासून सुटका मिळण्यासाठी सुद्धा गरजेपेक्षा अधिक खातात.
हे देखील वाचा- नॉन-व्हेज खाल्ल्याने लठ्ठपणा येतो?
वैद्यकिय समस्या
जर एखादे मुलं वैद्यकिय स्थितीतून जात असेल आणि त्याची कोणत्याही प्रकारची शारिरीक हालचाल होत नसेल तर त्यामध्ये लठ्ठपणा वाढू शकतो.(Childhood obesity)
तर लहान वयातच लठ्ठपणा आल्यास आरोग्यासंबंधित गंभीर आजात होतात. जसे की, उच्च रक्तदाब, ऑस्टियोआर्थराइटिस, कोलेस्ट्रॉल ऑरट्राइल्गिसराइड्स, प्रकार-२ मधुमेह, पित्ताशय रोग आणि श्वसनासंबंधित समस्या. लठ्ठपणा झालेल्या तीन मुलांपैकी दोन जण ही त्यांच्या तरुणपणी सुद्धा लठ्ठच राहतील आणि त्यावेळी सुद्धा त्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागेल. भारतात सध्या मधुमेह असलेल्या रुग्णांचा आकडा सर्वाधिक वाढत चालला आहे.
मात्र मुलांना लठ्ठपणाच्या समस्येपासून दूर ठेवायचे असतील तर त्यांच्या खाण्यात फळ आणि भाज्यांचा अधिक वापर करावा. टीव्ही कमी पाहणे, टीव्ही पाहता पाहता जेवणे किंवा टीव्ही वर दाखवले जाणाऱ्या फास्टफूडच्या जाहिरातींमुळे मुलं त्याकडे वळतात. त्यामुळे त्यांना यापासून दूर ठेवावे. तसेच मुलांना अधिक गोड पदार्थ खाण्यास देऊ नये. सर्वाधिक महत्वाचे म्हणजे त्यांना त्यांच्या शरिराची हालचाल करण्यास सांगणे जेणेकरुन खुपवेळ बसून राहिल्याने येणारा लठ्ठपणा हा दूर राहिल.