Home » NCB च्या आरोपपत्रात रिया चक्रवर्ती दोषी…नेमकं काय आहे आरोपपत्रात? 

NCB च्या आरोपपत्रात रिया चक्रवर्ती दोषी…नेमकं काय आहे आरोपपत्रात? 

by Team Gajawaja
0 comment
Rhea Chakraborty
Share

14 जून 2020 ही तारीख कोणताही बॉलिवुडप्रेमी विसरू शकत नाही….या दिवशी अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाल्याची बातमी टिव्हीच्या स्क्रीनवर झळकली आणि सर्वत्र एकच हल्लाकोळ झाला. ती वेळ कोरोना आणि लॉकडाऊनची होती. तरीही सुशांतचे अनेक चाहते त्याच्या निवासस्थानाजवळ जमले होते. (NCB charges Rhea Chakraborty in drugs case)

काही दिवसांतच सुशांतनं आत्महत्या केली की त्याची हत्या झाली याबद्दल चर्चा सुरु झाली आणि एक एक नावं पुढे यायला लागली. त्यातलं प्रमुख नाव होतं ते म्हणजे रिया चक्रवर्ती या अभिनेत्रीचे. यापूर्वी रिया चक्रवर्ती कोण आहे, याची कोणाला फारशी माहितीही नव्हती.

महिनाभर तुरुंगात राहिल्यावर रियाची सुटका झाली. यानंतर सुशांतने आत्महत्याच केली पण त्यात रियाला उगाचच अडकवण्यात आल्याच्या बातम्याही चर्चेत होत्या…पण सुशांत सिंग राजपूतच्या चाहत्यांनी तिला कधीच माफ केले नाही. रियाला कायम सोशल मिडीयातून ट्रोल करण्यात आले. आता या ट्रोलिंगमध्ये अजून भर पडली आहे, ती एससीबीच्या आरोपपत्रामधून. 

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी रिया आणि तिच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले. रिया आणि सुशांत रिलेशनशिपमध्ये होते आणि लिव्ह-इनमध्ये राहत होते. सुशांतच्या मृत्यूच्या एक आठवडा आधी रियाने त्याचे घर सोडले होते. आरोपानंतर चौकशी झाली आणि नंतर यात ड्रग्ज कनेक्शन आढळल्यावर या प्रकरणात एनसीबीची एन्ट्री झाली.  

आता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या 760 दिवसांनंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने 286 पानांचे मसुदा आरोपपत्र दाखल केले आहे. यापैकी 237 पानांमध्ये 33 आरोपींचे तपशीलवार जबाब आहेत.  त्यातल्या पान 49 मध्ये आरोपी क्रमांक 10 म्हणजेच रिया,  आरोपी क्रमांक 7 म्हणजेच तिचा भाऊ शोविक यांचा उल्लेख आहे. (NCB charges Rhea Chakraborty in drugs case)

सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर अनेक वादळी चर्चा झाल्या. रियानं सुशांतला ड्रग्जची सवय लावली होती. या माध्यमातून ती सुशांतचा सर्व पैसा वापरत होती. त्यात सुशांत हा बॉलिवडूमध्ये नवीन…त्याला कोणीही गॉडफादर नाही…असे असतानाही सुशांत सिंगने मेहनत आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवडूमध्ये चांगलेच बस्तान बसविले होते. बॉलिवडूच्या प्रस्थापितांना हे आवडतं नव्हतं…याच वादातून सुशांतची हत्या करण्यात आली, अशा स्वरुपाच्याही बातम्या चर्चील्या गेल्या.  त्यातच सुशांतची सेक्रेटरी दिशा सालियनचाही अपघाती मृत्यू झाला होता. 

दिशाची हत्या झाली आणि त्यामागचे कारण सुशांतला माहित होते, म्हणून त्याचीही हत्या करण्यात आल्याचीही चर्चा तेव्हा रंगल्या होत्या. इतकंच काय तर, रिया चक्रवर्ती जादू करत असून तिनं काळ्या जादूनं सुशांतला वश केल्याच्याही बातम्या चर्चेत होत्या. या सर्व चर्चांचा मध्यबिंदू होती ती रिया चक्रवर्ती….रियाच्या मार्फतच सुशांतला मारण्यात आल्याचा आरोप सुशांतच्या चाहत्यांनी केला. (NCB charges Rhea Chakraborty in drugs case)

सुशांतच्या मृत्यूला आता दोन वर्ष झाली.  मात्र सुशांतच्या चाहत्यांच्या आरोपात कमी झाली नाही.  या दोन वर्षांत सुशांतच्या मृत्यूबाबत एनसीबीने तपास केला आणि आता दोन वर्षांनंतर आरोपपत्र दाखल केले आहे.  यात रिया आणि तिच्या भावाचा आरोपी म्हणून उल्लेख असल्यानं सुशांतच्या चाहत्यांनी रियाला थेट अटक करण्याची मागणी केली आहे. (NCB charges Rhea Chakraborty in drugs case)

एनसीबीने 6,272 पानांचे डिजिटल पुरावे,  2,226 पानांचे बँक दस्तऐवज आणि मोबाईल क्रमांक असलेली सीडीही या आरोपपत्रासहसादर केली आहे. पुरावा म्हणून 2,960 कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत.  विशेष म्हणजे रिया चक्रवर्ती, सुशांत सिंग राजपूतला ड्रग्ज द्यायची असा उल्लेख करण्यात आला आहे.  एनसीबीच्या 49 पानी अहवालात रियाच्या नावाचा 32 वेळा उल्लेख करण्यात आला आहे.  

====

हे देखील वाचा – विद्यार्थी चळवळ ते ‘काय झाडी’… डायलॉगने चर्चेत आलेले शाहाजीबापू कोण?

====

रिया गांजा विकत घेऊन तो सुशांतला देत असल्याचा यात उल्लेख आहे. तसेच तिचा भाऊ शोविकही चरस विकत घेऊन तो सुशांतकडे पोहचवत असल्याचा उल्लेख आहे. यावरुन रियानं सुशांतला ड्रग्जची सवय लावल्याचे स्पष्ट होत आहे. 

या प्रकरणाच्या तपासासाठी आयपीएस मनोज शशिधर, आयपीएस गगनदीप गंभीर, आयपीएस नूपुर प्रसाद आणि एसपी अनिल यादव या चार वरिष्ठ अधिकार्‍यांची नियुक्ती सीबीआयनं केली आहे. यासंदर्भात पाटणा येथे सुशांतचे वडील केके सिंग यांनीही एफआयआर दाखल केली होती. त्यानुसार ईडीने सुशांतच्या हत्येप्रकरणी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला.  (NCB charges Rhea Chakraborty in drugs case)

ईडीने रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली, मात्र विशेष काही निष्पन्न झाले नाही. पण ईडीच्या तपासादरम्यान ड्रग कनेक्शन आढळून आले. त्यामुळे त्यांनी एनसीबीला तपासात सहभागी होण्याची विनंती केली. सुशांतच्या वडिलांनी रियाने सुशांतच्या खात्यातून 15 कोटी रुपये बळकावल्याचाही आरोप केला. त्याचाही तपास इडीकडे आला.  

या सर्वांचा रोख रिया चक्रवर्तीकडे होता. आता नव्यानं दाखल झालेल्या आरोपपत्रात रियाचा आरोपी म्हणूनच उल्लेख झाला आहे. या आरोपपत्रात रियाने सुशांतला ड्रग्ज दिल्याचा उल्लेख केला आहे.   आरोपपत्रात रियाचा भाऊ शोविकसह ३५ जणांना आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणावर आता 27 जुलै रोजी विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे. यात दोषी आढळल्यास रियाला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

बंगाली कुटुंबात जन्म झालेल्या रिया 2009 मध्ये छोट्या पडद्यावरील MTV रियालिटी शो Teen Diva  ची उपविजेती ठरली. त्यानंतर तिला एमटीव्हीवर होस्ट म्हणून संधी मिळाली. रियानं बॅंड बाजा बारात चित्रपटासाठीही ऑडीशन दिली होती. पण त्यात तिच्याऐवजी अनुष्का शर्माची निवड झाली.  पुढे आयुष्मान खुरानासोबत ‘ओये हिरीये’ म्युझिक अल्बम, तुनिगा तुनिगा हा तेलगू चित्रपट तिने केला. 2013 मध्ये ‘मेरे डॅड की मारुती’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर सोनाली केबल, बँक चोर, हाफ गर्लफ्रेंड सारख्या चित्रपटातही रियानं छोटया भूमिका केल्या आहेत. (NCB charges Rhea Chakraborty in drugs case)

अलीकडेच रिया ‘चेहरे’ आणि सुपर मिर्ची या चित्रपटात दिसली होती.  पण आपल्या अभिनयची छाप काही ती पाडू शकली नाही.  आता नव्यानं पुन्हा आरोपपत्र दाखल झाल्यावर रियाची चिंता वाढली आहे.  27 जुलै नंतरच तिच्या करिअरचा फैसला होणार आहे. अर्थात तो काहीही असला तरी सुशांत सिंग राजपूतच्या चाहत्यांसाठी ती कायम खलनायिकाच रहाणार आहे.

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.