Career in foreign language- जगभरात भारताचे नाव हे सर्वाधिक वेळा चर्चेत ठरत आहे. ग्लोबलाइजेशन मुळे विविध देशांमधील अंतर हे कमी होत चालले आहे. याच कारणामुळे देशात-विदेशात नोकरी आणि रोजगाराच्या संधीत खुप मोठी वाढ होत आहे. परंतु या कामात भाषा ही फार महत्वाचा विषय असतो. कारण ज्या देशात तुम्ही नोकरी करता तेथील भाषा काही प्रमाणात येणे गरजेचे असते. कारण आपल्याला त्यांच्याच भाषेत व्यवहार, रोजगारासंबंधित बोलावे लागते. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून भारतात परदेशातील भाषांचे विशेतज्ञ असणाऱ्यांना भारतात नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहोत. खरंतर भारतात मोठ्या प्रमाणात व्यवहार आणि ग्राहकांचा बाजार आहे. या व्यतिरिक्त पर्यटनासाठी आलेल्या परदेशातील नागरिकांना सुद्धा तुम्ही त्यांची भाषा तुम्हाला येत असेल तर त्यांना गाइड करु शकता. विविध देशांमधून भारत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची संख्या ही अधिक वाढत आहे. अशातच तरुणांना परदेशातील भाषांचे ज्ञान असणे किंवा त्यांना करिरसाठी फॉरेन लँन्गवेज शिकणे हा बेस्ट पर्याय ठरु शकतो.
सध्याच्या काळात बहुतांश करुन ज्या परदेशातील भाषांना महत्व आहे त्या म्हणजे फ्रेंच, जर्मन, रशियन, जॅपनीज आणि चाइनीज भाषा. कारण गेल्या काही वर्षांपासून या देशांसोबत व्यापार हा अधिक वाढत आहे. त्यामुळेच चाइनीज, फ्रेंच, जर्मन सारख्या भाषेतील तज्ञांनी गरज अधिक वाढत आहे. फ्रेंच भाषा ही इंग्रजीनंतर जगातील सर्वाधिक पसंदीची दुसऱ्या क्रमांकावरील भाषा आहे. त्यानंतर जर्मनचा क्रमांक येतो. जर्मन भाषा ही जर्मनी, स्विर्त्झलँन्ड आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशात १० कोटींपेक्षा अधिक लोक बोलतात. जगात सर्वाधिक मोठ्या प्रमाणावर जापानने व्यापार, आयटी आणि दुसऱ्या क्षेत्रांमध्ये आपला दबदबा वाढवण्यास सुरुवात केली आहे. तेव्हापासून जापानी भाषांच्या तज्ञांची मागणी सुद्धा वेगाने वाढत आहे. परंतु या दरम्यान चाइनीज भाषेसाठी सुद्धा करियरसाठी ऑप्शन म्हणून निवडू शकतात.
हे देखील वाचा- फिटनेसची आवड असेल तर ‘हे’ पर्याय ठरतील तुमच्यासाठी बेस्ट करियर ऑप्शन
फ्रेंच आणि जर्मन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला इंग्रजी भाषा येणे गरजेचे आहे. कारण या दोन्ही भाषा इंग्रजीशी मिळत्याजुळत्या आहेत. दरम्यान परदेशी भाषा शिकण्यासाठी बेसिक इंग्रजी येणे महत्वाचे आहे. आजकाल जॅपनीज, रशियन आणि स्पॅनिश भाषा ही रोजगारासाठी वापरली जात असल्याचे मानले जाते. कारण जागतिक व्यापाराची व्यवस्था वाढवण्यासह प्रत्येक देश हा दुसऱ्या देशाला आपल्यासोबत व्यापार करण्याची संधी देत आहे.
परदेशी भाषा शिकल्यानंतर तुम्हाला आयटी, औषध, रसायन, वैज्ञानिक शोध योजना सारख्या क्षेत्रात उत्तम संधी मिळते. त्याचप्रमाणे चीनच्या लोकांची अशी समस्या आहे की त्यांना इंग्रजी हे जास्त येत नाही. अशातच तेथे चीन भाषिकांची गरज लागते. जेव्हा भारत किंवा दुसरा कोणताही देश किंवा त्यांचे प्रतिनिधीमंडळ हे दुसऱ्या देशात जातात तेव्हा त्यांना द्विभाषिकाची गरज भासते. त्यामुळे शासकीय आणि खासगी क्षेत्रात सुद्धा परदेशी भाषिकांची मोठी मागणी आहे.(Career in foreign language)
या क्षेत्रात करियर करण्यासाठी तुम्हाला मुख्यत्वे तीन कोर्स करावे लागतात. त्यामध्ये सर्टिफिकेट, डिप्लोमा आणि डिग्री कोर्सचा समावेश असतो. या तिन्ही कोर्समध्ये तुम्हाला कमीत कमी ४५ टक्के गुणांसह १२ वी पास असावे लागते. तर डिग्री कोर्ससाठी तुम्हाला ४५ टक्के गुणांसह पदवीधर असणे गरजेचे आहे.