काही लोकांना चालताना किंवा उठता-बसताना शरिरातील हाडं दुखतात. अशातच तुमची हाडं ठिसूळ झाल्याचे संकेत देतात. खासकरुन वृद्ध व्यक्तींचे सांधे आणि हाडं दुखतात हे आपण ऐकून असतो. वाढत्या वयासह शरिरातील हाडांची बळकटी कमी कमी होत जाते. परंतु सध्या तरुणांमध्ये ही शरिरातील हाडं दुखण्याची समस्या उद्भवत आहे. कारण सध्याच्या धकाधकीच्या आय़ुष्यात आपण आपल्या खाण्यापिण्याकडे आणि आरोग्याकडे पुरेसे लक्ष देत नाही आहोत. त्यामुळे तुम्हाला तंदुरस्त आणि निरोगी रहायचे असेल तर उत्तम आहार घेतला पाहिजे. तसेच हाडांच्या बळकीसाठी कॅल्शियमची गरच असते. शरिरात जर कॅल्शिअमची कमतरता असेल तर हाडं आणि सांधे दुखतात. त्यामुळे शरिरातील हाडांच्या बळकटीसाठी अशा कोणत्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत जेणेकरुन तुम्ही तंदुरुस्त ही रहाल त्याबद्दल अधिक जाणून घेऊयात.(Bone health)
हाडांना बळकटी येणे का महत्वाचे आहे?
आपल्या शरिरात वेळोवेळी नवं हाडं तयार होत असतात. त्यामुळे नवी हाडं तयार होतात तेव्हा जुनी हाडं तुटण्यास सुरुवात होते. जेव्हा तुम्ही तरुणवयात येता तेव्हा जुनी हाडं तुटतात आणि नवी हाडं लवकर तयार होत असतात. त्याचसोबत हाडावरील मांस ही वाढते. परंतु वाढत्या वयासह बोन मास ही वाढत जाते. मात्र त्यावेळी ही क्रिया हळूहळू होते. वाढत्या वयासह एका काळानंतर ऑस्टियोपोसोसिसची समस्या उद्भवते. ऑस्टियोपोरोसिस अशी एक समस्या आहे ज्यामध्ये तुमच्या शरिरातील हाडं ही अधिक कमकूवत होऊ लागतात आणि सहज मोडू शकतात.
हे देखील वाचा- भरपूर पोषक तत्व असलेले Spirulina आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

हाडांच्या बळकटीसाठी कोणत्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे?
-हाडांच्या बळकटीसाठी तीळ खाल्ले पाहिजेत. कारण यामध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियम अधिक प्रमाणात असतात. जे हाडांच्या बळकटीसाठी फायदेशीर ठरु शकतात.(Bone health)
-बीन्स हे तुमच्या हाडांना मजबूती देतात. यामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शिअम आणि फॉस्फरस असतात. जे हाडांना मजबूत करण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्ही जर डाएट करत असाल तर राजमा, सोयाबीन सारख्या गोष्टी तुमच्या खाण्यात समाविष्ट करा.
-नाचणी मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असते. ते तुमच्या हाडांसाठी उत्तम असल्याचे मानले जाते. नाचणीची भाकरी, पॅनकेक किंवा डोसा खाऊ शकतात.
‘या’ काही गोष्टींचे दररोज सेवन करणे ठरेल फायदेशीर
-अननस
अननसमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम असते. जे शरिरात तयार होणाऱ्या अॅसिडच्या स्तराला नियंत्रित ठेवतात. तसेच कॅल्शिम सुद्धा कमी होण्यापासून रोखते. यामध्ये विटमिन A सुद्धा अधिक असते.
-पालक
पालकमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण उत्तम असल्याने जे तुमच्या हाडांसह दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. दररोज एक कप पिकलेल्या पालकचा सूप तुम्ही पिऊ शकता. पालकचे सेवन केल्याने शरिरातील २५ टक्क्यांपर्यंत कॅल्शिअमची कमतरता भरुन निघते. या व्यतिरिक्त पालकमध्ये लोह आणि विटामिन A सुद्धा भरपूर प्रमाणात असते.
-केळ
केळं हे मॅग्नेशिअमचा उत्तम स्रोत असल्याचे मानले जाते. हे विटामिन बोन्स आणि दातांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरते. जर तुमची हाडं ठिसूळ होत असतील तर एक केळ्याचे सेवन तुम्ही दररोज करु शकता.
वरील काही गोष्टी खाल्ल्याने तुमच्या हाडांना बळकटी येईलच. पण तेलकट, बाहेरचे पदार्थ खाण्यावर ही नियंत्रण ठेवा.कारण यामुळे तुम्हाला आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात. आणखी महत्वाचे म्हणजे तुमची हाडं सारखी दुखत असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.