परदेशात उच्च शिक्षण घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी काही लोक त्यासाठी प्रयत्न करतात पण काहींना तेथे शिक्षण घेणे परवडत नाही. परदेशातून शिक्षण घेतल्याने काही करिरवेळी काही संधी उपलब्ध होतात. असे जरी असले तरीही उच्च शिक्षणातून जरी संधी मिळत असल्या तरीही ते तेवढेच खर्चिक सुद्धा आहे. कारण परदेशात जाऊन शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला व्यवस्थितीत प्लॅनिंग करण्याची गरज असते, त्याचसोबत तेथील काही गोष्टींबद्दल माहिती सुद्धा पाहिजे. याच आधारावर तुम्ही परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी स्कॉलरशिपसाठी अर्ज करु शकता. पण जेव्हा स्कॉलरशिपची वेळ येते तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवणे खरंच गरजेचे असते. तर जाणून घेऊयात परदेशात शिक्षणसाठी जर तुम्ही स्कॉलरशिपसाठी अर्ज करणार असाल तर कोणत्या गोष्टी जरुर लक्षात ठेवल्या पाहिजेत.(Scholarship for study abroad)
-उत्तम प्रोफाइल तयार करा
प्रत्येक स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला शैक्षणिक कालावधीत उत्तम गुण मिळणे आवश्यक असते. त्यामुळे जर तुम्ही मास्टर्स करण्याचा विचार करत असाल तर तुमचा GPA 7.0 पेक्षा अधिक असेल तर उत्तमच. मात्र ऐवढेच आवश्यक नाही आहे. स्कॉलरशिपसाठी अर्ज करताना तुमचे प्रोफाइल ही अधिक उत्तम असणे महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही शिक्षणासह अन्य कोणत्या गोष्टींमध्ये कुशल आहात याबद्दल ही सांगू शकता.
-स्कॉलरशिपसंदर्भात अधिक माहिती जाणून घ्या
लक्षात ठेवा, परदेशात शिक्षणासाठी फक्त युनिव्हर्सिटी नव्हे तर काही संस्था सुद्धा स्कॉलरशिप देतात. ही स्कॉलरशिप शासकीय किंवा खासगी संस्थेकडून ही दिली जाते. जर तुम्ही भारतात राहत असाल तर स्कॉलरशिपसाठी काही संस्था आहेत. जसे टाटा, जी तुम्हाला परदेशात शिक्षणासाठी स्कॉलरशिप देते. तसेच तुम्ही परदेशात असाल तर तेथे सुद्धा तुम्हाला स्कॉलरशिप देणाऱ्या बहुतांश संस्था मिळतील.त्यामुळे स्कॉलरशिप संदर्भात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा.
हे देखील वाचा- Business Idea: शासनाच्या मदतीने तुम्ही सुरु करु शकता ‘हा’ व्यवसाय, मिळेल लाखोंचा नफा
-कोर्सची निवड करण्यापूर्वी करा अर्ज
तुम्हाला ज्या विभागातून शिक्षण घ्यायचे आहे ते सुरु होण्यापूर्वी १९ महिन्याआधी अर्जाची प्रक्रिया सुरु करा. कारण अर्ज केल्यानंतर तुम्हाला काही कागदपत्र द्यावी लागतात आणि नंतर त्याची पडताळणी केली जाते. या सर्व प्रक्रियेसाठी काही कालावधी लागतो. त्यामुळे स्कॉलरशिपसाठी अर्ज करताना ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा.(Scholarship for study abroad)
-अर्ज नीट वाचा
स्कॉलरशिपचा अर्ज भरल्यानंतर तो व्यवस्थित वाचा. कारण त्यामध्ये काही चुका असतील तर तुमचा अर्ज स्विकारला जाणार नाही. त्यामुळे तो सबमिट करण्यापूर्वी आपण दिलेली माहिती ही योग्य आणि खरी असल्याची पुन्हा एकदा खात्री करुन घ्या. जेणेकरुन स्कॉलरशिप मिळण्यासाठी कोणताही अडथळा येणार नाही.