Home » सत्तरीतही राहा तंदुरुस्त नियमित करा हे 3 योगप्रकर; 3 नंबरचा आहे एकदम सोपा… 

सत्तरीतही राहा तंदुरुस्त नियमित करा हे 3 योगप्रकर; 3 नंबरचा आहे एकदम सोपा… 

by Team Gajawaja
0 comment
Yoga for old age
Share

निरोगी शरीर ही सर्वात मोठी देणगी मानली जाते. मात्र वयाच्या साठीनंतर अनेकांना वारंवार डॉक्टरांकडे जावे लागते. वयाच्या सत्तरीमध्ये तर दुखण्यांमुळे आयुष्यच निरस वाटू लागते. औषधांच्या आधारे दिवस काढण्यापेक्षा या वयातही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योगसाधना केल्यास त्याचा निश्चित फायदा मिळू शकतो.  मुळात या उतारवायचा चांगला सोबती, मित्र म्हणून योगासनांची साधना करणे गरजेचे आहे. नियमीत योगासने आणि व्यायाम केल्यास सत्तरीनंतरही शारीरिक आणि मानसिक आरोग्य तंदुरुस्त रहाते.(Yoga for old age) 

योगासने आणि व्यायामाला वयाची अट नाही. उतारवयात स्नायूंचा आकार आणि वजन कमी होते. काहींना मधुमेह, रक्तदाब आणि हृदयरोगासारखे आजार होतात. याशिवाय हाडे ठिसूळ होतात. अशावेळी थोड्याशा धक्‍क्‍यानेसुद्धा हाड फ्रॅक्‍चर होऊ शकते. उतारवयात बऱ्याच कारणांनी आपल्या शरीराची संतुलन सांभाळण्याची क्षमता कमी झालेली असते. तोल सांभाळू न शकल्यामुळे वारंवार पडण्याच्या घटना घडतात. या सर्वात योगसाधना उपयोगी पडते.  

वयाची साठी ओलांडल्यावर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आणि त्यांच्याच देखरेखीखाली नियमीत योगासने करण्याची सवय लावावी. आपल्या शारीरिक क्षमतेनुसार ही आसने केल्यास त्याचा चांगला फायदा होतो.  या वयात होणारी सांधेदुखी, हातपायांचे दुखणे यातील वेदना कमी होण्यास मदत होते. या वयात प्राणायाम हा मोठ्या वरदानासारखा उपयोगी पडतो. (Yoga for old age) 

प्राणायाम

तपो न परं प्राणायामात्। ततो विशुद्‌धिर्मलानां दीप्तिश्च ज्ञानस्य। प्राणायामापेक्षा मोठी अशी दुसरी कोणतीही साधना नाही. प्राणायामाने सर्व दोषांचे निर्मूलन होते.  काहीवेळा वय वाढल्यावर अल्झायमरसारखा आजार होतो. स्मरणशक्ती कमी होते. काही आठवत नाही.  या सर्वांत प्राणायाम केल्यास त्याचा फायदा होतो. 

प्राणायमाचा नियमीत सराव केल्यास मन स्थिर होते, मेंदुला रक्तपुरवठा सुरळीत होतो. प्राणायाम केल्याने शरीर सुदृढ आणि निरोगी राहते. पोट, यकृत, मूत्राशय, लहान, मोठे आतडे, तसेच पचनसंस्था कार्यक्षम बनतात. भूक लागते आणि अन्नाचे पचनही चांगले होते. या सर्वांमुळे झोपही शांतपणे लागते. परिणामी शरीराच्या तक्रारीही दूर होण्यास मदत होते.  उतारवयातही नियमीत व्यायाम केल्यास शारीरिकच नव्हे, तर मानसिक आरोग्यही छान राहते. (Yoga for old age)  

सूर्यनमस्कार 

सूर्यनमस्कार करताना संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. रोज सूर्यनमस्कार घातल्याने कफ, वात, पित्त या त्रिदोषांमध्ये समतोल साधला जातो. त्याद्वारे पोट आणि मज्जासंस्था यातील कार्य सुधारते.  सूर्यनमस्कारामुळे शरीरात ऑक्सीजनचे प्रमाण वाढते. मेंदूची कार्यक्षमता वाढते. उतारवयात अनेकांना स्मृतीभंशाचा आजार त्रस्त करतो. अशांकडून सूर्यनमस्काराचा सराव करुन घेतल्यास त्यांना नक्कीच फायदा होतो.(Yoga for old age) 

====

हे देखील वाचा – गुडघेदुखीने त्रस्त असाल तर कार ‘हे’ ७ योगप्रकार

====

हास्ययोगा

आणखी एक योगप्रकार वृद्धांसाठी फायदेशीर ठरत आहे, तो म्हणजे हास्ययोगा. अनेक ठिकाणी योगासने सामुहीक पद्धतीनं केली जातात. तिथे हा हास्ययोगाचा प्रयोग केला जातो. मोठमोठ्यांनी हसल्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी त्याची मदत होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय रोगप्रतिकारशक्तीही वाढल्याचे निदान झाले आहे. मुळात हा प्रकार सर्वासोबत करायचा असल्यानं आपण एकटे नाहीत ही भावना मनात रहाते. आपल्या सहकाऱ्यांसोबत, मित्र-मैत्रिणींसोबत हा हास्ययोगा करताना अनेकजण आपले दुःख, एकटेपणा विसरुन जातात. या आनंदातूनच शारीरिक आजारांवरही आपसूक उपचार होतात.(Yoga for old age)  

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.