जगात सात आश्चर्य असल्या तरीही काही देशातील अशी ठिकाणं आहेत जेथे स्वर्गाचा भास होतोच. तसेच सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी सुद्धा लोक विविध ठिकाणांना भेट देतात. मात्र अशी काही ठिकाण आहेत जेथे ना सूर्यास्त होत ना सुर्योदय. तुम्हाला ऐकून हे थोडे विचित्र वाटेल पण हे खरंय. कारण नॉर्वे, अलास्का, आइसलँन्ड, स्विडन, फिनलँन्ड आणि स्टोनिया अशा देशातील काही शहरात सूर्योदय होत नाही तर काही महिन्यांपर्यंत सूर्यास्त होतच नाही. तर जाणून घेऊयात जगातील अशी कोणती ठिकाणं आहेत जेथे सूर्योदय आणि सुर्यास्त होत नाही.(Places where sunset-sun never rise)
-स्वीडन स्टॉकहोल्म (Stockholm)
स्टॉकहोल्म येथे रात्र मोठी असते आणि सूर्य फक्त काही तासांसाठीच दिसतो. स्टॉकहोल्मच्या आकाशात एके दिवशी सूर्योदय सकाळी 8.44 वाजता झाला आणि दुपारी 2.49 वाजता सूर्यास्त ही झाला. म्हणजेच फर्त 6 तासांठी येथील लोकांना उजेड पाहण्यास मिळाला होता. या देशाची भौगोलिक स्थिती वेगळी असल्याने येथील दिवस तर कधी रात्र ही मोठी असते. असे नाही की, येथे फक्त रात्रच मोठी असते. काही दिवस असे ही असतात जे रात्रीपेक्षा मोठे असतात. 21 जूनला येथे सर्वाधिक मोठा दिवस असल्याचे म्हटले जाते. या दिवशी 20 तास 24 मिनिटांपर्यत सूर्य दिसतो.
-स्टोनिया (Stonia)
स्टोनियाची राजधानी तालिम असून येथे सर्वाधिक लहान दिवस हा डिसेंबर मध्ये असतो. त्यावेळी दिवस ऐवढा लहान असतो की तो काही तासांमध्येच मोजला जातो. देशाच्या उत्तरेला वसलेल्या या शहरात दिवस आणि रात्रीचा खेळ हा नेहमीच सुरु असतो. हे शहर फिनलँन्डच्या समुद्र तटापासून 80 किमी दूर आहे. येथे सुद्धा 21 डिसेंबरला सूर्य फक्त 6 तास 3 मिनिटांपर्यंत दिसतो. दरम्यान 21 डिसेंबर नंतर येथे सूर्य दिसण्याचा कालावधी वाढत जातो आणि अशी वेळ येते की, दिवस मोठा आणि रात्र लहान होत जाते. थंडीच्या दिवसात येथे बर्फवृष्टी होते, परंतु फेब्रुवारी महिन्यात वातावरणाचा पारा अधिक खाली उतरत नाही. फेब्रुवारी मध्ये येथे तापमान -4.3 डिग्री सेल्सियस असते.
हे देखील वाचा- नदीतून बाहेर आलं हजारो वर्ष जुनं एक गूढ शहर, तेव्हाही होत्या उंच इमारती अन् टॉवर
-आइसलँन्ड (Iceland)
ब्रिटेननंतर युरोपातील सर्वाधिक सुंदर असलेल्या आइसलँन्ड देशात बहुतांश परिसर ही बर्फाच्छादीत असतात. येथे मे महिन्याच्या सुरुवातीपासून ते जुलैच्या अखेर पर्यंत सूर्यास्त होतच नाही. परंतु उन्हाळ्याच्या वेळी सूर्यास्त मध्यरात्री होतो आणि लगेच मध्यरात्रीच 3 वाजता उगवतो. 21 डिसेंबला आइसलँन्ड मध्ये एका ठिकाणी 4 तास 7 मिनिटांसाठी सूर्य दिसला होता. जुन-जुलै महिन्यात या ठिकाणी आकाशात सूर्य हा दिसतोच. या काळात रात्र होतच नाही. येथील लोक सुद्धा या काळाची वाट पाहत असतात. कारण त्यांना या दिवसात गोल्फ खेळण्यासाठी वेगळीच मजा येते असे ते सांगतात.
-नॉर्वे (Norway)
युरोपातील नॉर्वे असा एक देश आहे जेथे लोकांना सूर्याचे दर्शनच होत नाही. 21 डिसेंबरला येथे एके दिवशी 6 तास सूर्य दिसला आणि तो दिवस आतापर्यंतचा सर्वाधिक लहान दिवस असल्याचे मानले जाते. खरंतर सूर्य नेहमीच पहाटेच्या वेळी दिसते पण तुम्ही हे ऐकून हैराण व्हाल की, नॉर्वेत असे एक ठिकाण आहे जेथे रात्रीच्या वेळेस ही सूर्य दिसतो. नॉर्वेत मध्यरात्री दिसणाऱ्या सूर्याला पाहण्यासाठी खुप पर्यटक येत राहतात. याच्या उत्तरेला हेमरपेस नावाचे शङर आहे. या शहराला मध्यरात्रींचे शहर असे ही म्हटले जाते. आणखी एक गोष्ट अशी की, याच देशात एका ठिकाणी जेथे गेल्या 100 वर्षांपासून सूर्य दिसलाच नाही आहे.(Places where sunset-sun never rise)
-फिनलँन्ड (Finland)
निसर्गाचा अमूल्य ठेवा असावा असा फिनलँन्ड देश अत्यंत सुंदर आणि फिरण्याजोगा आहे. या देशात जगभरातून पर्यटक येत राहतात. 55 लाख लोकसंख्या असलेल्या या देशाच्या 1 किलोमीटर आतमध्येच फक्त 19 लोक राहतात. फिनलँन्डमध्ये खुप झरे आहेत आणि हेच त्यांचे मुख्य आकर्षण असल्याने या देशाला झऱ्यांचा देश असे ही म्हटले जाते. जगातील असे काही देश जेथे सूर्य फक्त काही वेळासाठी दिसतो. पण फिनलँन्डमध्ये सूर्य सातत्याने 73 दिवसांपर्यंत डुबत नाही.म्हणजेच सूर्यास्त होत नाही.. येथे उन्हाळा 21 जून ते 23 सप्टेंबर पर्यंत असतो. याच दरम्यान, सूर्य हा सातत्याने 73 दिवस कायम राहतो.
-अलास्का (Alaska)
21 डिसेंबर हा वर्षातील सर्वाधिक लहान दिवस असतो त्यामुळेच अलास्का मध्ये 21 डिसेंबरला सूर्य फक्त 3 तास 40 मिनिटांसाठी दिसतो. परंतु एक गोष्ट अशी की, येथे डिसेंबर नंतर दिवस मोठे असतात. तर जून महिन्यापर्यंत येथे दिवस आणि रात्रीत मोठे अंतर होते. जून महिन्यात येथे सूर्य 22 तास दिसतो तर रात्र ही लहान होते.