नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची अंमलबजावणी संचालनालयात (Ed) चौकशी करण्यात आली. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात, असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडच्या अधिग्रहणासंदर्भात राहुलची चौकशी करण्यात आली होती. राहुल गांधी यांच्या चौकशीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेसच्या अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते उभे असल्याचे दिसले. (Rahul Gandhi Lifestyle)
राहुल गांधी हे राजकारणातील एक प्रसिद्ध नाव आहे. ते देशातील सर्वात जुना पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आहेत, मात्र त्यांनी स्वत: या पदाचा राजीनामा दिला आहे. ते अमेठीचे खासदार होते, पण नंतर स्मृती इराणी यांच्याकडून निवडणूक हरले आणि ते यूपीच्या राजकारणातून बाहेर पडले. यानंतर प्रियांका गांधी यांना यूपीच्या राजकारणाचा उगवता चेहरा बनवण्यात आले. तर राहुल गांधी हे काँग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणाचा चेहरा आहेत. परंतु तुम्हाला राहुल गांधींचे वैयक्तिक आयुष्य, घर, छंद, वाहने, नेट वर्थ बद्दल काही माहिती आहे का?

राहुल गांधी यांचे बालपण आणि शिक्षण
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा जन्म १९ जून १९७० रोजी, नवी दिल्ली येथे झाला. त्यांचे वडील राजीव गांधी आणि आई सोनिया गांधी आहेत. राहुल गांधी हे इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांचे नातू आहेत. त्यांनी आपले प्रारंभिक शिक्षण १९८९ मध्ये सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली येथून पूर्ण केले. ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षांनंतर राहुल गांधींनी हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला आणि परदेशात पुढील शिक्षण घेतले. वडिलांच्या मृत्यूनंतर, राहुलने संरक्षणात्मक कारणांसाठी फ्लोरिडातील रोलिन्स कॉलेजमध्ये स्थलांतर केले. येथे राहुलने नाव आणि ओळख लपवून शिक्षण घेतले. मात्र याची माहिती फक्त कॉलेज प्रशासन आणि सुरक्षा एजन्सीला होती. येथे त्यांनी राऊल विंची या नावाने शिक्षण घेतले. नंतर १९९५ मध्ये राहुल गांधींनी ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिजमधून एम फिल पदवी मिळवली. (Rahul Gandhi Lifestyle)

राहुल गांधींची फिटनेस
फार कमी लोकांना माहित असेल की, राहुल गांधींनी जपानी मार्शल आर्ट ‘ऐकिडो’चे प्रशिक्षण घेतले आहे. ऐकिडो मार्शल आर्टमध्ये एखाद्या व्यक्तीला कोणत्याही शस्त्राशिवाय प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्याची कला शिकवली जाते. वयाची पन्नाशी ओलांडलेले राहुल गांधी एकदम फिट दिसतात. ते रोज सकाळी सायकल चालवतात. याशिवाय त्यांना स्विमिंग आणि स्कूबा डायव्हिंगचीही आवड आहे. राहुल रोज थोडा वेळ जिममध्ये घालवतात आणि व्यायाम करतात. गेल्या वर्षी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथील शाळेत राहुलने सर्वांसमोर स्टेजवर पुश-अप केले आणि विद्यार्थ्यांना फिटनेसचे मंत्र दिले. (Rahul Gandhi Lifestyle)
हे देखील वाचा: व्हाईट हाऊसच्या प्रमुख पदासाठी नामांकित डॉ आरती प्रभाकर नक्की आहेत तरी कोण?

राहुल गांधी यांचे लाईफ रुटीन
खासदार राहुल गांधी यांचे लाईफ रुटीन अगदी साधे आहे. ते सकस आहार घेतात. त्यांना सकाळच्या नाश्त्यात इडली-डोसा, सांबार याशिवाय ड्रायफ्रुट्स खायला आवडतात. ते फिट राहण्यासाठी लिंबूपाणी आणि शीतपेये घेतात. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात त्यांना मसूर, भात, रोटी, भाज्या आणि दक्षिण भारतीय पदार्थ खायला आवडतात. शाकाहारी खाण्यासोबतच राहुल मांसाहार देखील करतात. (Rahul Gandhi Lifestyle)

राहुल गांधींची एकूण संपत्ती
गांधी घराण्याशी संबंधित असल्यामुळे, राहुल गांधींची गणना श्रीमंत राजकारण्यांमध्ये केली जाते. मात्र शपथपत्रात दाखल केलेल्या पत्रानुसार, राहुल गांधींची एकूण संपत्ती सुमारे १६ कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल गांधी महिन्याला १० लाख रुपये आणि वर्षाला १ कोटी रुपये कमावतात. (Rahul Gandhi Lifestyle)