बाजारात असलेले सर्व पिशवीबंद खाद्यपदार्थांच्या पाकिटांवर त्यांची एक्सपायरी तारीख म्हणजेच ते पदार्थ तेवढ्या मर्यादित कालावधी पुरतेच खाता येऊ शकतात. त्यामुळे असे पदार्थ एक्सपायरी तारखेनंतर खाल्ल्यास आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. मात्र काही खाद्यपदार्थ असे आहेत की, ज्याची एक्सपायरी तारीख नसते. ते खुप काळ टिकतात आणि ते आपण अगदी कोणत्याही भीतीशिवाय खाऊ शकतो. परंतु त्यासाठी काही नैसर्गिक गोष्टींचा वापर केला जातो. अशातच असे काही खाद्यपदार्थ आहेत ज्यांची एक्सपायरी तारीख संपल्यानंतर ते आपण खाऊ शकतो. तर जाणून घेऊयात असे कोणते पदार्थ आहेत.(Foods can use after expiry date)
-मध
मधात कमी आम्लिय पीएच असतो जो बॅक्टेरिया तयार होण्यापासून लढतो. फक्त मध हे नेहमीच काचेच्या बाटलीत भरुन ठेवले पाहिजे. जेणेकरुन ते दीर्घकाळापर्यंत राहिले तरीही ते वापरता येईल. काही काळानंतर ते घट्ट जरी झाले तरी तुम्ही त्याचे अगदी सुरक्षितरित्या सेवन करु शकता.
-व्हिनेगर
व्हिनेगर मध्ये Self Preserving agent असतात जे आपण लोणच्यासारख्या खाद्यपदार्थांसाठी वापरतो. तुम्ही विनेगरचा वापर करण्यापूर्वी त्यावर दिलेल्या काही सुचना वाचा. दीर्घकाळ टिकाणाऱ्या बहुतांश खाद्यपदार्थांमध्ये व्हिनेगरचा वापर केला जातो.
हे देखील वाचा- जगातील विचित्र रेस्टॉरंट! जेथे खाल्ल्यानंतर भींत चाटायला लावतात
-मीठ
मीठाचे विविध प्रकार हे एक्सपायरी तारखेनंतर ही जशेच्या तसेच राहतात. परंतु मीठ हे एका डब्यात भरुन ठेवत त्याचे झाकण मात्र घट्ट लावा. या व्यतिरिक्त ज्या वेळेस तुम्हाला ते वापरायचे असेल तेव्हा त्यात थेट हात घालण्याऐवजी चमच्याने काढा.(Foods can use after expiry date)
-व्हेनिला एसेंस
व्हेनिला एसेंसचा वापर तुम्ही केक, मफिन्स, किंवा ब्रेड तयार करण्यासाठी सुद्धा करु शकता. असे म्हटले जाते की. 4-5 वर्षांमध्ये शुद्ध व्हेनिला एसेंसचा वापर करणे सर्वाधिक उत्तम. मात्र जर ते योग्य प्रकारे ठेवले असेल तरच तुम्ही ते वापरु शकता.
-दारु
दारु जेवढी जुनी तेवढी उत्तम असे नेहमीच म्हटले जाते. कारण जिन, वोडका, व्हिस्की, रम, टकिला आणि वाइन हे दीर्घकाळापर्यंत टिकून राहू शतात. मात्र त्यांना थंड जागेत आणि बंद कपाटात ठेवावे लागते.
वरील काही गोष्टी या एक्सपायरी तारखेनंतर सुद्धा तुम्ही अगदी सुरक्षितरित्या खाऊ शकता. मात्र त्याची योग्य पद्धतीने ठेवावे. जेणेकरुन आपण जर ते वापरात घेतल्यास त्याची चव आहे तशीच राहील. मात्र त्याची चव बदलली असेल तर तसे खाद्यपदार्थ खाणे टाळा आणि आरोग्याची काळजी घ्या.