मान्सूनमध्ये जरी आपल्याला उन्हापासून दिलासा मिळतो आणि थंडगार वातावरणामुळे गारवा निर्माण होत असला तरीही काही आजार ही या काळात उद्भवतात. मान्सूनमध्ये डेंग्यू, मलेरिया, ताप यासारखे आजारांचे रुग्ण अधिक वाढल्याचे दिसून येते. त्यामुळेच महापालिकेकडून नागरिकांना मान्सूनमध्ये पाण्याचे व्यवस्थापन आणि स्वच्छता राखण्याचे आवाहन केले जाते. जेणेकरुन या काळात निर्माण होणाऱ्या डासांच्या अळ्यांवर नियंत्रण ठेवता येईल.तर मान्सूनमध्ये मच्छांपासून दूर राहण्यासाठी नक्की काय करावे यासंदर्भातील पुढील काही सोप्प्या टीप्स तुम्ही जरुर फॉलो करा.(Monsoon Health Care)
-झाडं
मच्छरांना घरात येण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा वापर करु शकता. जसे की. घरात अशा प्रकारची काही झाडं लावा ज्याच्या सुंगधामुळे मच्छर त्यापासून दूर राहतील. असे सांगितले जाते की, मच्छरांना तुळशीचे झाडं जर घरात असेल तर तेथे जाणे टाळतात. तुम्ही तुळशीचे झाड तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा जेथून मच्छर येतात त्या ठिकाणी लावू शकता. तसेच लेमन ग्रास, लेमन बाल्म, रोजमॅरी किंवा लॅवेंडरच्या प्लॅन्टची मदत घेऊ शकता.
-कापूर
मच्छरांपासून दूर राहण्यासाठी अगदी साधा आणि सोप्पा उपाय म्हणजे कापूरचा वापर. कापूरचा वापर करुन तुम्ही धूप करु शकता किंवा गरम पाण्यात कापूर टाकून ठेवा. जेणेकरुन मच्छरांना घरातून पळवण्यासाठी मदत होईल.
-लेव्हेंडर किंवा टी ट्री तेल
तज्ञांच्या मते मच्छरांना लेव्हेंडर किंवा टी ट्री तेलाचा सुगंध त्रासदायक ठरते. तर मान्सूनमध्ये मोठ्या प्रमाणात मच्छर घरात येतात. अशातच जर तुम्ही या तेलांचा वापर करुन ते तुमच्या त्वचेवर लावल्यास त्यापासून बचाव होऊ शकतो. या तेलाचा तुम्ही संध्याकाळच्या वेळेस खासकरुन वापर करु शकता.
हे देखील वाचा- पावसाळ्यात घाला ‘या’ प्रकारचे कपडे जेणेकरुन मनमोकळेपणाने कराल एन्जॉय
-मच्छरदाणीचा वापर करा
मच्छरांपासून तुम्हाला दूर रहायचे असेल तर रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करा. जेणेकरुन मच्छर तुमच्या संपर्कात येणार नाहीत. मच्छर चावल्यानंतर आपल्या त्वचेवर एक प्रकारची खाज किंवा जळजळ निर्माण होते. त्यामुळेच मान्सूनमध्ये मच्छर आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी मच्छरदाणी तुमच्या फायद्याची ठरु शकते.(Monsoon Health Care)
-घरात किंवा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा
मान्सूनमध्ये मच्छर अधिक प्रमाणात फिरु लागतात. त्यामुळे घरात किंवा आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण साचलेल्या पाण्यात किंवा साठवून ठेवलेल्या पाण्यात मच्छरांच्या अळ्या निर्माण होतात. अशातच तुम्हाला मच्छर चावल्यास डेंग्यू, मरेलिया, चिकनगुनिया सारख्या आजारांना सामोरे जावे लागते.
या व्यतिरिक्त मान्सूनमध्ये आपल्यासह घरात लहान मुलं असेल तर त्याची सुद्धा विशेष काळजी घ्या. वेळोवेळी घरात धूप किंवा मच्छरांचा शिरकाव होणार नाही अशा पद्धतीच्या काही क्रिम्स किंवा घरगुती उपयांचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे. सर्वाधिक महत्वाचे म्हणजे, पावसातून घरी भिजून आल्यानंतर आपले शरिर स्वच्छ करा. कारण आपण ज्यावेळी पावसातून घरी येत असतो तेव्हा आपले पाय एखाद्या डबक्यात पडतात किंवा आपल्या अंगावर पडलेल्या पाण्यामुळे काही समस्या उद्भवू शकतात.