आलिशान आयुष्य जगावे हे प्रत्येकालाच वाटत असते. परंतु दुबई म्हटलं की, श्रीमंतीची झळ बसलेली असणारच यामध्ये काही कसर नाही. परंतु श्रीमंती म्हणजे नेमके काय हे दुबईतील पुरुषांकडून जेवढे आपण पाहतो तेवढीच किंवा त्याहून अधिक श्रीमंती काय असते हे येथील बायकांनी सुद्धा दाखवून दिले आहे. याबद्दल ‘द रियल हाउसवाइव्स’ ही एक अमेरिकन रिअॅलिटी टेलिव्हिजन सीरिजमधून दाखवण्यात आले. परंतु या फ्रेंचाइजीची सुरुवात ‘द रियल हाउसवाइव्स ऑफ ऑरेंज काउंटी’ सह झाली होती. याचा पहिलाच प्रीमियर २००६ मध्ये कॅलिफोर्नियामध्ये झाला होता.वैंकूर, मेलबर्न, चेशायर, ऑकलँन्ड, सिडनी, जोहान्सबर्ग, हंगेरी, एथेंसनंतर ही सीरिज दुबईत ही सुरु झाली. रियल हाउसवाइव्सच्या फ्रेंचाइजीची पहिली सीरिज ही युएईतील दुबईत झाली. यामध्ये दुबईत राहणाऱ्या काही महिलांच्या खासगी आयुष्यासह त्यांचा प्रोफेशनल आयुष्याबद्दल काही गोष्टींचा उलगडा करण्यात आला. त्यामधूनच दुबईतील सर्वाधिक श्रीमंत गृहिणींची (Richest housewives of Dubai) नावे समोर आली होती. त्यांचे एकूण नेटवर्थ किंवा त्यांच्या लाइफस्टाइल बद्दल तुम्ही ऐकलात तर थक्क व्हाल. तर पाहूयात दुबईतील सर्वाधिक श्रीमंत गृहिणींच्या लिस्टमधील नावे आणि त्यांच्या लाईफस्टाइल बद्दल अधिक.
-कॅरोलीन स्टॅनबरी (Caroline Standbury)
साउथ चाइना मॉर्निंग पोस्टच्या मते लेडीज ऑफ लंडन (२०१४) शो मध्ये अभिनय करणारी आणि लंडनमध्ये जन्मलेली कॅरोलीन स्टॅनबरी ही दुबईतील सर्वाधिक श्रीमंत गृहीणी आहे. तिची संपत्ती पाहता जवळजवळ २३२.७० कोटी (US$30 मिलियन) रुपये आहे. कॅरोलिन हिचे यापूर्वी सुद्धा आधी एक लग्न झाले होते. त्याचे नाव सेम हबीब होते आणि त्याच्यापासून तिला तीन मुले होती. परंतु घटस्फोटानंतर नवऱ्याकडून पोटगीची रक्कम ही बक्कळ मिळाल्याचे सांगितले जाते. सर्जियो कॅरलो हे सध्याच्या कॅरोलीनच्या नवऱ्याचे नाव असून तो एक फुटबॉलपटू आहे. तर कॅरोलीन स्टॅनबरी ही शू लाइन मधील एका ब्रँन्डची मालकीण असून तिच्या ब्रँन्डचे शूज हे सर्वाधिक लक्झरी ब्रँन्डचे असल्याचे मानले जाते.
हे देखील वाचा- कोटींच्या गाड्या अन् बंगला! जाणून घ्या मुकेश अंबानींच्या आलिशान जीवनशैलीबद्दल
![Richest Housewives of Dubai](https://kfacts.in/wp-content/uploads/2022/06/richest-houseviews-in-dubai.jpg)
-लेसा मिलान (Lesa Milan)
माजी मिस जमॅका विनर आणि फॅशन डिझइनर लेसा मिलान ही नेट वर्थमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तिची एकूण संपत्ती ३१.७ ते ५७.१ कोटी (US$9 मिलियन) दरम्यान आहे. लेसा मिलान ही मीना रो मॅटरनिटी नावाच्या कपड्याच्या ब्रँन्डची मालकीण आहे. दुबईत येण्यापूर्वी मिलान ही जमॅका येथून निघून जात मियामी मध्ये स्थायिक झाली होती. तेथे ती ८ वर्ष राहिली. तेव्हाच तिचे लग्न करोडपती डेवलपर रिचर्ड हॉल याच्यासोबत झाले. तिला तीन मुल असून फिरण्याची आणि फोटोग्राफीची खुप आवड आहे.
-कॅरोलीन ब्रुक्स (Caroline Brooks)
कॅरोलीन ब्रुक्स ही दुबईतील तिसऱ्या स्थानावर असलेली सर्वाधिक श्रीमंतर हाऊसवाइफ आहे. तिचे नेटवर्थ २५.३० ते ३८.०९ कोटी (US$6मिलियन) पर्यंत आहे. कॉस्मोपॉलिटन मिडल ईस्टनुसार, ब्रुक्सने दुबईत एक प्रॉपर्टी ब्रोकरेज फर्मच्या डायरेक्टरच्या रुपात ही काम केले आहे. कॅरोलीन ब्रुक्स हिचे इंस्टाग्रामवर 2.20 लाख फॉलोअर्स आहेत. तिला नुकत्याच कांन्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर स्पॉट करण्यात आले होते.(Richest housewives of Dubai)
-सारा अल मदनी (Sara Al Madani)
सारा अल मदनीने वयाच्या 15 व्या वर्षात स्वत: चा बिझनेस सुरु केला होता. तिच्या लिंक्डइन (Linkdin) च्या प्रोफाइलनुसार मदनी सध्या हलही ची मालकीण आहे. हा एक पर्सनल स्टेज असून जो नामवंत लोकांच्या संदर्भातील व्हिडिओ शाउटआउट तयार करतात. साला अल मदनी हिचे नेटवर्थ 6.34 कोटी (US$1 मिलियन) आहे.