Home » पावसाळ्यात ट्रेकिंगासाठी ‘हे’ आहेत बेस्ट पर्याय

पावसाळ्यात ट्रेकिंगासाठी ‘हे’ आहेत बेस्ट पर्याय

by Team Gajawaja
0 comment
Monsoon Trek
Share

पावसाळा सुरु झाला की, झाडाला नवी पालवी फुटतेच. पण सर्वत्र थंडगार वातावरण आणि झाडांची हिरवीगार चादर पसरल्याने मन अगदी प्रसन्न होते. मात्र पावसाळ्याची मजा लुटण्यासाठी पिकनिक जाणे ते एखाद्या ठिकाणी ट्रेकला जाण्याकडे आपल्याला ओढ लागते. अशातच जर तुम्ही यंदाच्या पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी बेस्ट डेस्टिनेशन शोधत असाल तर थांबा.. कारण आम्ही तुमची पावसाळ्याची मजा आणि ट्रेकिंगसाठी कोणते बेस्ट पर्याय आहेत त्याबद्दल अधिक सांगणार आहोत. त्यामुळे अगदी खिशाला परवडणाऱ्या पैशांमध्ये तुम्ही तुमचा पावसाळ्यातील ट्रेक आपल्या मित्रमंडळींसोबत नक्की करा.(Monsoon Trek)

लोहगड किल्ला
लोहगड किल्ला हा लोणावळा आणि पुण्याच्या उत्तर-पश्चिमेपासून ५२ किमी दूर आहे. लोहगड समुद्र सपाटीपासून १०३३ मीटर उंचीवर आहे. शिवाजी महाराजांनी सन १६४८ मध्ये लोहगडावर विजय मिळवला होता. परंतु सन १६६५ मध्ये पुरंदरच्या तहामुळे किल्ला मुघलांच्या स्वाधीन करण्यास भाग पाडले.मात्र त्यानंतर सन १६७० मध्ये महाराजांनी पुन्हा एकदा त्याव कब्जा केला. या किल्ल्याचा वापर खजिना ठेवण्यासाठी करण्यात येत होता.

कसे पोहचाल- पुण्याला जाणाऱ्या ट्रेनने तुम्हाला लोणावळ्याला उतरावे लागणार आहे. त्यानंतर तेथील लोकलच्या माध्यमातून मालवली स्थानकाजवळून लोहगडसाठी ऑटो करावी लागणार आहे.

हे देखील वाचा- पावसाळ्याची मजा लुटण्यासाठी ‘या’ ठिकाणांना नक्कीच भेट द्या

Monsoon Trek
Monsoon Trek

कळसुबाई शिखर
कळसुबाई शिखऱ हे पश्चिम घाटातील एक पर्वत आहे. या शिखराची उंची १६४६ मीटर उंच असून ते महाराष्ट्रातील सर्वाधित उंच शिखर असल्याचे सांगितले जाते. कळसुबाई पर्वताची श्रृंखला हरिश्चंद्र गड आणि वन्यजीवन अभायरण्याच्या आतमधून निर्माण झालेली आहे. येथे वर्षभर उत्साही ट्रेकर्स ट्रेक करण्यासाठी येत राहतात.

कसे पोहचाल- कसारा रेल्वे स्थानकात उतरुन तेथून लोकल टॅक्सी किंवा ऑटोच्या माध्यमातून तुम्ही कळसुबाई शिखराजवळ पोहचू शकता.

माथेरान
मुंबईपासून ११० किमी दूर असलेल्या रायगड जिल्ह्यात हिरव्यागार झाडांनी, जंगलाने बहरलेले माथेरान हिवाळ्यात आणि पावसाळ्यात पर्यटकांना बोलावत असते. येथे पावसाळ्यातील वातावरण अगदी सुंदर, डोळ्यांना सुख देणारे आणि मनाला प्रसन्न करणारे असते. मात्र तुम्हाला माथेरानमध्ये कोणत्याही वाहनाला परवानगी नाही आहे.

कसे पोहचाल- माथेरानला पोहण्यासाठी तुम्हाला नेरळ स्थानक किंवा पुणे स्थानक अथवा सीएसटी येथून नेरळसाठी ट्रेन पकडावी लागणार आहे. नेरळ येथून तुम्ही माथेरानला जाण्यासाठी टॉय ट्रेन पकडू शकता.

Monsoon Trek
Monsoon Trek

ब्रम्हगिरी
ब्रम्हगिरी महाराष्ट्रातील पश्चिम घाटातील एक पर्वतरांग आहे. जी नाशिक जिल्ह्यात असून येथे जवळच त्र्यंबकेश्वर मंदिर आहे, पवित्र गोदावरी नादीचा उगम ही ब्रम्हगिरी येथून होते. ही नदी १४६४ किमी पर्यंत वाहत जाते. ब्रम्हगिरीत भटकंती करण्यासह ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्र्यंबकेश्वरजवळ हरिहर किल्ला आणि दुगरवाडी झरा सुद्धा आहे.(Monsoon Trek)

कसे पोहचाल- तुम्हाला ब्रम्हगिरी येथे पोहचण्यासाठी नाशिक येथून थेट त्र्यंबकेश्वरसाठी बस पकडावी लागणार आहे.

तपोला
महाबळेश्वरच्या घनदाट जंगल घाटांमध्ये तपोला हे गाव वसलेले आहे. तपोला मधील दृश्य आणि तेथील वातावरण मनाला प्रसन्न करते. तपोल हे फोटोग्राफर्स ते ट्रेकर्ससाठी नेहमीच आकर्षणाचे ठिकाण आहे. येथून तुम्ही सह्याद्रीच्या डोंगरावरुन काही आकर्षक स्थळ पाहू शकता. तपोलाचा जंगल ट्रेक आणि खासकरुन वासोटा किल्ला हे सुद्धा ट्रेकर्ससाठी महत्वाचे ठिकाणच आहे.

कसे पोहचाल- तपोला येथे पोहचण्यासाठी तुम्ही महाबळेश्वर येथून जाऊ शकता. रस्ते मार्गाने किंवा ट्रेनच्या माध्यमातून तुम्ही येथपर्यंत पोहचू शकता.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.