भारताकडून चीनला रक्षाबंधनचं गिफ्ट
आज देशभरात रक्षाबंधनचा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाला राखी बांधत असते. गेल्या काही वर्षांपासून रक्षाबंधन या उत्सवासाठी चीन कडून मोठ्या प्रमाणात राख्या आयात केल्या जातात. मात्र या वर्षी एक वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. सध्या जगभरात सुरू असलेल्या कोरोनाचं संकट तसेच भारत चीन सीमेवरच्या वातावरण पाहता यंदा सर्वच भारतीय नागरिकांनी तसेच नागरिकांनी या चीनी राख्यांवर बहिष्कार टाकला आहे. यामुळे यंदा तरी चीनला कोटींचा फटका बसला आहे.
चिनी राख्यांवर बहिष्कार
भारतीय संस्कृती मध्ये बहीण भावाच्या नात्याला एक वेगळंच महत्व आहे. रक्षाबंधन या सणासाठी बहिण खूप अगोदरच खरीदी करत असते. साधारण गेल्या वर्षापर्यंत चीन कडून विविध रंग,डिझाइन,आकार, कलाकृती, लाईट तसेच लहानांना आकर्षित करण्यासाठी कार्टूनच्या राख्या बाजारात उपलब्ध असायच्या. मात्र नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी चिनी वस्तूंवर बहिष्काराची भूमिका घेतल्यामुळे या वर्षी बाजारात हे चिनी वस्तू कोणीच खरीदी करत नाही तर जिथे आहेत तिघे कोणीच हे वस्तू खरीदी करायला तयार नाही असे मत दुकानदारांनी व्यक्त केले. काहीही असो यामुळे चीनला कोटींचे नुकसान सहन करावे लागणार आहे या काहीच शंका नाही.
‘वोकल टू लोकल’ला प्रतिसाद
तर दुसऱ्या बाजूला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितल्या प्रमाणे ‘वोकल टू लोकल’ या अभियाना अंतर्गत लोक भारतीय बनावटीच्या राख्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच यामुळे का होई ना पण छोट्या प्रमाणात काम करणाऱ्या लोकांना याचा चांगलाच फायदा होत आहे.
ऑनलाइन पर्यायांचा वापर
या वर्षी लॉकडाऊनमुळे अनेकांना हे शक्य शॉपिंग नव्हतं. मात्र ऑनलाइन शिपिंग आणि कुरिअर द्वारे अनेकांनी आपल्या लाडक्या भाऊरायाला राखी पाठवली. तर भाऊने देखील आपल्या गूगल पे, ऑनलाइन मनी ट्रान्स्फर, शॉपिंग वेबसाईट सारख्या पर्यायांचा चांगलाच वापर करत आपल्या बहिणीला भेट वस्तू दिल्या आहेत.
भारतीय डाक विभागाचा हातभार
महत्वाचं म्हणजे भारतीय डाक विभागाने देखील बहिनाच्या राख्या त्यांच्या लाडक्या भाऊरायाकडे पाठवण्यासाठी देखील चांगलीच मेहनत घेतली आहे. डाक विभाग रविवार आणि सुट्टीच्या दिवशी देखील काम करत आपले हे कर्तव्य बजावत आहे. यंदा भारतीय डाक विभागाच्या वतीने रक्षाबंधनसाठी एक विशिष्ट प्रकारचे कव्हर देखील बनवण्यात आले आहे.
– टीम KFacts