आपली आर्थिक परिस्थिती ही बहुतांश गोष्टींवर अवलंबून असते. त्याचा थेट परिणाम आपल्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर होतो. दरम्यान, नेहमीच लक्षात असू द्या की पैशाने सर्व काही गोष्टी खरेदी करता येत नाहीत. काही वेळेस आर्थिक परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यास मुश्किल होते. पण तुम्ही प्रयत्न केलात तर आर्थिक ताणाचा तुमच्या दैनंदिन आयुष्यावर कमी प्रभाव पडू शकतो. कर्जात डुबणे किंव प्रत्येक महिन्याला कर्जाची फेड करणे हे थोडे त्रासदायक असते. मात्र याचा थेट परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर होतो. ऐवढेच नव्हे तर कर्ज कसे फेडायचे यासंदर्भात वारंवार विचार केल्याने अतिताण येऊन नक्की काय करावे हे सुचत नाही. त्यामुळेच आम्ही तुम्हाला आर्थिक तणावापासून (Financial Stress) कसे दूर रहायचे आणि त्याचा कसा सामना करावा याबद्दल काही टीप्स सांगणार आहोत. त्या जरुर फॉलो करा.
-खर्चावर नियंत्रण ठेवा
आपल्या खर्चाची एक यादी तयार करा. त्यानुसार आपण किती पैसे खर्च करतोय त्याकडे सातत्याने लक्ष द्या. या व्यतिरिक्त आपले अतिरिक्त खर्च टाळण्याचा अधिकाधिक प्रयत्न करा. त्याचसोबत अतिरिक्त पैसे जरी असतील तरीही ते लगेच खर्च करण्यामागे लागू नका.
-महिन्याभराचे बजेट तयार करा
तुम्हाला खर्च नियंत्रणात ठेवायचे असतील तर प्रथम महिन्याभराचे एक बजेट तयार करा. जेणेकरुन त्यानुसार तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी पैसे खर्च करु शकता. लक्षात असू द्या, आपल्या बजेटपेक्षा अधिक खर्च करणे टाळा. ज्या गोष्टींसाठी पैसे खर्च करायचे आहे ते जरुर करा.
हे देखील वाचा- अनेक गंभीर रोगांची मूळ समस्या आहे ‘लठ्ठपणा’, त्यासाठी ‘या’ योगासनांचा सराव ठरेल फायदेशीर

-आपत्कालासाठी पैसे ठेवून द्या
एखादी आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास आणि त्यावेळी पैशांची गरज भासल्यास तुमच्याकडील पैसे लगेच काढून देऊ शकता. त्यामुळे ऐन आपत्कालीन स्थितीत तुम्हाला कोणापुढे हात पसरावे लागणार नाही. त्यामुळेच आपले एकूण खर्च, बजेट आणि आपत्कालासाठी लागणारे पैसे वेळोवेळी बाजूला काढून ठेवता जा.
-पैशांव्यतिरिक्त अन्य गोष्टीत आनंद शोधा
पैशांव्यतिरिक्त अन्य गोष्टीत सुद्धा आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. पैसे येतात आणि जातात पण एखाद्या गोष्टीतील आनंद हा कायम आपल्यासोबत टिकून राहतो. वास्तविक गोष्टी आपण किती उत्तमपणे उपभोगू शकतो याचा सुद्धा विचार करा.
-कृतज्ञता व्यक्त करा
तुमच्याजवळ ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये कृतज्ञ रहा. कारण आपल्याला जे काही मिळाले आहे त्यात आनंद मानावा असे आपल्याला सांगितले जाते. त्यामुळे आपल्यावर ओढावलेली परिस्थिती ही कधी ना कधी तरी बदलणार यावर विश्वास ठेवा.