महाराष्ट्रात असलेल्या काही किल्ल्यांना जवळजवळ दोन-एक हजारांचा इतिहास आहे. परंतु रायरी म्हणजेच रायगड किल्ला आहे तो विजय नगर साम्राज्याच्या वेळेला फक्त नावापूर्ता बांधला गेला होता. कारण ‘राय’ हा जो शब्द आहे तो महाराष्ट्राचा नसून कर्नाटकातील आहे. जसे अच्युत देवराय, कृष्णदेवराय. त्यांचे राज्य चौल पर्यंत होते. तेव्हा त्यांनी तो फक्त एक चौकी म्हणून बांधला. रायरीवरच्या पाठीमागील बाजूस जे १६ घाट आहेत ते कोकणात जाण्यासाठी आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तो बांधला. ज्यावेळी एखादी साधारण वास्तूची उभारणी केली जाते त्यावेळी ते तेथपूर्तेच मर्यादित असते. त्याचप्रमाणे त्यांनी बांधणी करत जवळजवळ ९ बाजूंनी , ८ दिशांना तो अभेद्य आहे. तर एका बाजूला त्याला चढण्यासाठी वाट आहे. तिथेच त्यांनी एक दरवाजा बांधला आणि त्याला रायरी असे नाव देत एक किल्लेदार नेमला.(Wagh Darwaja)
कालांतराने रायरी हा किल्ला ज्यावेळेला शिर्के, मोरे वैगरे प्रबळ झाले तेव्हा तो त्यांच्या ताब्यात गेला. पुढे ज्यावेळेला बहमनी सुल्तानाचे तुकडे झाले त्यावेळी तो निजामशाहीच्या ताब्यात गेला. परंतु त्याला फारसे असे कोणीही महत्व दिले नाही. मात्र त्याची काही जुजबी बांधकाम आहेत. पुढे महाराजांच्या लक्षात आले की, पुरंदरच्या तहाच्या वेळेला उत्तरेकडील जे सैन्य आहे ते घाटमाथ्यावर सहज येऊ शकते. परंतु जवळजवळ ३०० सह्याद्रीचे घाट उतरून कोकणात येऊ शकत नाही. म्हणूनच महाराजांनी कोकणात राजधानी करण्याचे ठरविले. त्याच्या अभ्यास करत असताना रायरी त्यांच्या पसंदीत पडला. कारण रायरी हा सावित्री नदीने जोडला गेला आहे. त्यामुळे आयात-निर्यात ही होऊ शकते, घाटमाथ्यावर जाण्याचा ही मार्ग आहे. आणि ज्यावेळी राजधानी करण्याचे ठरविण्यात आले, साधारण हे ७० ला ठरले आणि ७४ पर्यंत तो बांधून पूर्ण झाला.
हे देखील वाचा- बराच संघर्षमय होता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास, ‘असे’ घडले भारतीय संविधानाचे शिल्पकार

पहिल्यांदा १६६५ मध्ये ज्यावेळी सुरतवर हल्ला केला त्याच्यात सिंधुदुर्ग बांधला. तसेच ७० मध्ये पुन्हा हल्ला केल्यानंतर जे काही धन मिळाले त्यात त्यांनी रायरी बांधला. आपल्याला महाराज हे फक्त जयजयकारापूर्तेच माहिती आहेत. पण ते एक वास्तूतज्ञ सुद्धा होते. त्यांना विज्ञानाचे विविध विषय आहेत त्याचा त्यांनी अभ्यास केलेला. त्यामुळे राजधानीचा किल्ला म्हणून आपण रायरीचा किल्ला ठरवल्यास ज्याला एका बाजूने चढायला वाट आहे, तोच दरवाजा शत्रूने रोखल्यास आपत्कालीन स्थितीत काय करायचे? त्यामुळेच महाराजांनी मागच्या बाजूस ही एक दरवाजा बांधण्याचे ठरविले. या दरवाजा त्यांना वापर करायचा नव्हता कारण तो आपत्कालीन दरवाजा होता. अशा दरवाज्याने आपत्कालीन वेळी दोरी बांधून किंवा टोपलीला दोरी बांधून खाली जाता येत होते. परंतु तसा प्रसंग राज्याभिषेक झाला तर 89 पर्यंत कधीच आला नाही.
मात्र रायरीवरील वाघ दरवाजा हे नाव कधी पडले, का पडले किंवा हे नाव शिवाजी महाराजांनी दिलयं का? संभाजी महाराजांनी दिलयं का? पुढे ज्यावेळी तो मुघलांच्या ताब्यात गेला तेव्हा त्यांनी दिलयं का? किंवा जंजिराच्या ताब्यात गेला तेव्हा त्यांनी वाघ दरवाजा हे नाव दिलयं का असे माहिती नाही. परंतु वाघ याचा अर्थ असा की, ज्याची कोणाची हिंमत असेल, वाघाचे ज्याचे काळीज आहे तोच या दरवाज्याचा वापर करु शकतो. म्हणूनच बोली भाषेत त्याला ‘वाघ दरवाजा’ (Wagh Darwaja) असे नाव मिळाले. आजही रायरीवरील हा वाघ दरवाजा खालून पाहिल्यास अजिबात दिसत नाही. असा हा ऐतिहासिक वारसा लाभलेला वाघ दरवाजा महाराजांचा इतिहास सांगतोच पण महाराजांचा दूरदृष्टीकोन ही यामधून स्पष्ट करतो.