Home » सलमान खानची एकूण संपत्ती किती? जाणून घ्या एका चित्रपटासाठी किती पैसे घेतो अभिनेता

सलमान खानची एकूण संपत्ती किती? जाणून घ्या एका चित्रपटासाठी किती पैसे घेतो अभिनेता

by Team Gajawaja
0 comment
Salman Khan Lifestyle
Share

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला अलीकडेच जीवे मारण्याची धमकी मिळाली. सलमानच्या वडिलांना मिळालेल्या पत्रात सलमानचीही सिद्धू मूसेवालासारखीच स्थिती करणार असल्याचे म्हटले होते. हे पत्र मिळाल्यानंतर पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. तसेच सलमानच्या चाहत्यांमध्येही चिंता वाढली आहे. एकीकडे मुंबई पोलिसांसह दिल्ली पोलिसही या प्रकरणाच्या तपासात व्यस्त आहेत, तर दुसरीकडे सलमान त्याच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या आगामी चित्रपटामुळे व्यस्त आहे. नुकतेच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून, या चित्रपटाचे शीर्षक बदलल्याची माहिती मिळत आहे. (Salman Khan Lifestyle)

सलमान खानच्या आयुष्याशी निगडीत प्रत्येक छोटी गोष्ट चाहत्यांमध्ये चर्चेत असते. सलमान खान हा इंडस्ट्रीचा एक मोठा सुपरस्टार आहे, ज्याचे चाहते त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या जीवनशैलीचेही वेडे आहेत. सलमान खान हा अभिनयातून सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता आहे, तर चॅरिटीच्या बाबतीतही सलमान इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहे. चला जाणून घेऊया सलमान खानची एकूण संपत्ती, कमाई आणि त्याच्या जीवनशैलीबद्दल.

एका आलिशान घरात राहतो सलमान खान

सलमान खान हा अभिनेते, चित्रपट निर्माते आणि पटकथा लेखक सलीम खान यांचा मुलगा आहे. यामुळे तो लहानपणापासूनच चित्रपटसृष्टीशी जोडला गेला आहे. सलमान मुंबईचा रहिवासी आहे. मुंबईत गॅलेक्सी अपार्टमेंट नावाचा सलमान खानचा आलिशान बंगला आहे. सलमान आपल्या कुटुंबासह गॅलेक्सीमध्ये राहतो. गॅलेक्सी अपार्टमेंट हे एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही. यामध्ये सुंदर ड्रॉईंग रूम, सर्वांच्या सोयीसाठी आलिशान खोल्या, स्विमिंग पूल आणि एक मोठी बाल्कनी आहे, जिथून सलमान त्याच्या चाहत्यांना पाहतो. तसेच, गॅलेक्सी अपार्टमेंट व्यतिरिक्त सलमानकडे 5 BHK बंगला देखील आहे. पनवेलमध्ये त्याचे फार्म हाऊस असून, तो सतत तिथे भेट देतो. याशिवाय दिल्ली, नोएडा आणि चंदीगडमध्येही सलमान खानची प्रॉपर्टी आहे. (Salman Khan Lifestyle)

सलमान खानकडे आहेत लक्झरी कार

इंडस्ट्रीचा सुलतान खऱ्या आयुष्यातही सुलतानसारखाच राहतो. त्याच्याकडे लक्झरी आणि जगातील सर्वात महागड्या ब्रँडच्या कार आहेत. सलमानच्या कार कलेक्शनमध्ये ऑडी, बेंटले, रोल्स रॉयल आणि मर्सिडीज सारखी अनेक वाहने आहेत, ज्यांची किंमत १४ कोटींहून अधिक आहे. (Salman Khan Lifestyle)

एका चित्रपटासाठी सलमानची फी 

अभिनेता सलमान खानने अभिनयाच्या जोरावर चांगला बँक बॅलन्स जमवला आहे. सलमान चित्रपट, बिग बॉस, ब्रँड एंडोर्समेंटमधून मोठी कमाई करतो. तो एका चित्रपटासाठी सुमारे ६० कोटी रुपये घेतो, ज्यामुळे तो बॉलिवूडमधील सर्वात महागड्या कलाकारांच्या यादीत सामील झाला आहे. याशिवाय सलमान रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’मध्ये होस्ट करताना दिसतो. ‘बिग बॉस १५’साठी सलमानने तब्बल ३५० कोटी रुपये घेतले होते. सलमान ब्रँड प्रमोशन, गुंतवणूक आणि सोशल मीडियातूनही मोठी कमाई करतो. त्याचा स्वतःचा बीइंग ह्युमन नावाचा ब्रँड आहे. तसेच तो इतर अनेक ब्रँडचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे, ज्यासाठी तो ८-१० कोटी रुपये घेतो. (Salman Khan Lifestyle)

============

हे देखील वाचा – नक्की कोण आहे ड्रग्ज केसमध्ये अडकलेला अभिनेता सिद्धांत कपूर? ज्याला आहे मागील ९ वर्षांपासून बॉलिवूडमध्ये मोठ्या यशाची प्रतीक्षा

============

सलमान खानची एकूण संपत्ती

बजरंगी भाईजान म्हणा किंवा सुलतान, राधे म्हणा किंवा प्रेम, प्रत्येक पात्रासह मनात उतरणारा सलमान खान, हा इंडस्ट्रीतील सर्वाधिक चार्ज करणारा अभिनेता आहे. रिपोर्टनुसार, सलमान खानची एकूण संपत्ती सुमारे ३६० दशलक्ष डॉलर आहे. भारतीय चलनानुसार सलमान खान एकूण २३०४ कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. (Salman Khan Lifestyle)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.