भाजप पक्षाच्या प्रवक्ता नूपुर शर्मा सध्या जोरदार चर्चेत आहेतच. पण त्यांनी पैगंबरांच्या संदर्भाती जी काही वादग्रस्त टिप्पणी केली ती आता त्यांच्या अंगलट आली आहे. यामुळेच पक्षाने त्यांना ६ वर्षांसाठी निलंबित केले आहे. नुपूर यांच्याबद्दल अधिक सांगायचे झाल्यास, त्या नेहमीच भाजपच्या प्रमुख प्रवक्त्या म्हणून काम करत होत्या. तसेच नुपूर या पेशाने वकील सुद्धा आहेत. २००९ मध्ये त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाच्या प्रजासत्ताक दिन स्पेशल अॅडिशनसाठी गेस्ट एडिटर म्हणून भुमिका सुद्धा निभावली होती. तर नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांचे शैक्षणिक ते राजकीय प्रवासासंदर्भात आपण जाणून घेऊयात.
नुपूर शर्मा यांचा जन्म २३ एप्रिल १९८५ रोजी दिल्लीत झाला. त्या एका शिक्षित परिवारातील असून त्यांच्या वडिलांचे नाव डॉ. विनय शर्मा आहे. शैक्षणिक जीवनातच त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली होती. २००८ मध्ये त्यांची संघ परिवारातील विद्यार्थी संघटनेच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या रुपात त्यांनी निवड झाली. तसेच २०१५ मध्ये विधानसभा निवडणूकीत अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात निवडणूक लढवली खरी.. पण त्यांचा ३१ हजार मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर नुपूर शर्मा यांना भाजपच्या दिल्ली युनिटचे अधिकृत प्रवक्ता म्हणून जबाबदारी सोपविली गेली.
हे देखील वाचा- संजय राऊत म्हणाले- 15 जूनला शेकडो शिवसैनिक जाणार अयोध्येला
शर्मा यांनी अरविंद प्रधान, अरुण जेटली आणि अमित शाह यांसारख्या वरिष्ठ नेत्यांसोबत काम केले आहे. तसेच काही सामाजिक कार्य ही त्यांनी केली असून त्यात सोलर लॅम्प इंस्टॉलेशन, वॉटर प्युरिफायर, कॅम्पस सिक्युरिटीसाठी सीसीटीव्ही कॅमेरा यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त दिल्ली युनिव्हर्सिटी स्टुडेंट युनियनच्या प्रेसिडेंटच्या पदावर असताना त्यांनी काही सामाजिक कार्य ही पूर्ण केली आहेत .
३७ वर्षीय नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी आपले शालेय शिक्षण दिल्लीतील पब्लिक स्कूलमध्ये पूर्ण केले आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पदवीधर शिक्षणासाठी दिल्ली युनिव्हर्सिटीतील हिंदू कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. तेथे त्यांनी एलएलबी ही पदवी मिळवली. एलएलबी केल्यानंतर नुपूर यांनी लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स येथून एलएलएमची पदवी संपादन केली. त्या राजकरणात सक्रिय होण्यासह एक वकील ही आहेत.
दरम्यान, नुपूर शर्मा अशावेळी खुप चर्चेत आल्या जेव्हा त्यांनी ५ जून २०२२ रोजी एका टेलिव्हिजनवरील डिबेट दरम्यान पैगंबर मोहम्मद आणि मुस्लिम समुदायाच्या विरोधात वादग्रस्त विधान केले. त्यामुळेच नुपूर शर्मा यांना ६ वर्षासाठी पक्षाने निलंबित केले आहे. भाजपकडून असे सांगण्यात आले आहे की, पक्षाकडून प्रत्येक धर्माचा आदर आणि सन्मान केला जातो. त्यामुळे कोणत्याही धर्माविषयी पक्षातील सदस्याला अशा प्रकारची विधाने करण्यास परवानगी नाही.