इजिप्शियन ममी बद्दल आपल्या सर्वांनाच माहिती आहे. परंतु प्राचीन काळात लोकांचे मृतदेह हे एका खास कॅमिकेलमध्ये गुंडाळून एका बॉक्समध्ये सुरक्षितरित्या ठेवून गाडले जायचे. असे यासाठी केले जायचे की, शरीर हे पूर्णपणे नष्ट होऊ नये आणि फक्त सुखावे. मृतदेहाला लावण्यात येणारे हे केमिकल शररिरातील सर्व ओलावा खेचून घेत असे. त्यामुळे वर्षानुवर्ष सुद्धा मृतदेह आपले रुप कधीच बदलत नव्हते. अशातच ममीसंदर्भात विचित्र गोष्ट समोर आली. त्यानुसार युरोपीय लोक हे इजिप्शियन ममींसंदर्भात (Egyptian Mummies) ऐवढे प्रभावी होते की, त्यांनी त्याला खायला सुरु केली होते.
लाइव्ह सायन्सयाच्या मते, लोकांना विश्वास होता की जमिनीतून निघालेली आणि केमिकलमध्ये गुंडाळलेले अवशेष हे प्लेग ते डोकेदुखी सारख्या कोणत्याही समस्येवर रामबाण उपाय आहेत. मध्य युगापासून १० व्या शतकापर्यंत प्राचीन इजिप्शियन लोकांचे बांधललेले शव, लोकांसाठी आकर्षणाचा विषय होते. याच मान्यतेनुसार, ममी हे लोकांच्या आजारांवर उपचारासाठी उपयोगी पडू शकतात आणि म्हणूनच लोकांनी ममी खाण्यास सुरुवात केली होती. ममी पासून ममिया (Mumia) नावाचे प्रोडक्ट ही तयार करण्यात आले. जे प्रोडक्ट औषध तयार करणाऱ्यांकडून विक्री केले जात होते. अमीर असो किंवा गरीब या सर्व समाजातील लोकांकडून ते औषधाच्या रुपात ते खाल्ले जायचे. हेच औषध इजिप्शियन ममींच्या कबरीपासून युरोपात आणल्या गेलेल्या अवशेषांपासून तयार करण्यात आले होते.

हे देखील वाचा- मस्जिदीत मुस्लिम नव्हे हिंदू अदा करतात ५ वेळा नमाज
१२ व्या शतकापर्यंत औधष तयार करणारे जगातील औषधीय गुणांसाठी ममींचा वापर करत होते. पुढील ५०० वर्षांपर्यंत ममी हेच आपले निर्धारित औषध असेल असे मानले गेले. जेव्हा अँन्टीबायोटिक औषध नव्हती तेव्हाचा हा काळ होता. अशातच डोके दुखी, सूज कमी करणे किंवा प्लेग सारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांकडून ममींची हाड, मासं आणि खोपडीवर विश्वास ठेवला जात होता.
परंतु या गोष्टीवर प्रत्येकजण विश्वास ठेवत नव्हते. एक शाही डॉक्टर गाइ डे ला फोंटेन यांनी या गोष्टीवर विश्वास ठेवला होता. त्यांना १५६४ मध्ये अलेक्जेंड्रियामध्ये मृत लोकांचे बनावट ममी दिसून आले. तेव्हा त्यांना असे वाटले की, यामुळे लोक बरे होऊ शकतात. मात्र प्रत्येकवेळी लोकांना प्राचीन ममीच मिळेल असे शक्य नव्हते. या फसवणूकीसंदर्भात आणखी एक बाब उघडकीस आली होती. ती अशी की, या वैद्यकिय पद्धतीत नेहमीच मृत शरिराची आवश्यकता असते आणि इजिप्शियन ममी (Egyptian Mummies) त्याची गरज पूर्ण करु शकत नाहीत.

त्यानंतर औषधालय आणि वैद्यांनी १८ व्या शतकात ममींपासून औषध तयार करणे सुरु ठेवले होते. काही डॉक्टर असे मानायचे की, सुकलेल्या ममींपासून उत्तम औषधं तयार होत होती. याउलट काहींचे असे म्हणणे होते की, ताज मांस आणि रक्तात जीनव शक्ती असते. या दाव्यांमुळे बडे बडे लोक सुद्धा प्रभावीत झाले. इंग्लंडचा King Charls II याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याच्या उपचारासाठी मानवी खोपडी पासून औषध तयार करण्यात आले होते. १९०९ पर्यंत डॉक्टरांकडून न्यूरो संबंधित उपचारासाठी मानवी खोपडीचा वापर केला जात होता.
हे देखील वाचा- केरळातील ‘या’ काही Haunted ठिकाणांवर दिवसरात्र मंतरलेला खेळ चाले
१९व्या शतकात आजारापासून बरे होण्यासाठी लोकांनी ममीपासून तयार करण्यात आलेली औषध खाणं बंद केले होते. परंतु विक्टोरियन अनरॅपिंग पार्टी केली जात होती. या खासगी पार्ट्यांमध्ये इजिप्शियन ममींना मनोरंजनासाठी उघडले जात होते. त्याचसोबत १८३४ मध्ये सर्जन थॉमस पेटीग्रेव यांनी रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्समध्ये एक ममी उघडला होता. त्यावेळी ऑटॉप्सी आणि ऑपरेशन हे सार्वजनिक रुपात होत होते. मात्र पार्ट्यांमध्ये ममीचे असणे हे सुरुच राहिले. २० व्या शतकाच्या सुरुवातीला पार्ट्यांमध्ये ममी ठेवण्याची प्रथा बंद झाली. आज सुद्धा ममीसह प्राचीन युगातील कलाकृतींची तस्करी करण्याचे प्रकार सुरु आहेतच. मात्र पुरातन काळातील कोणतेही ममी उघडून पाहण्यासाठी किंवा खाण्याची परवानगी दिली जात नाही.
दरम्यान, नुकत्याच २००० वर्षांपूर्वीच्या ममीच्या पोटातील अत्यंत सुरक्षित भ्रुण मिळाले आहे. जसे की, ते खुप वर्षांपर्यंत सुरक्षित राहते. असे हे अद्भूत उत्खनन त्या ममीचे आहे जे इजिप्शियन मधील पहिल्या गर्भवती ममीचे असल्याचे सांगितले जात आहे. या ममीला रहस्यमयी महिला असे नाव दिले गेले आहे. या भ्रुणाची चाचणी करण्यासाठी ममीचे सीटी स्कॅन ही करण्यात आले. हे पाहून वैज्ञानिक आणि पुरातत्व विभागातील लोक हैराण झाले. ममीचे भ्रुण मिळाल्याचे स्टडी नुकत्याच एका जर्नल ऑफ आर्कियोलॉजिकल सायन्समध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. त्यात असे सांगण्यात आले आहे की, कशा पद्धतीने हे भ्रुण ऐवढी वर्ष ममीच्या पोटात अत्यंत सुरक्षितरित्या राहिले.