आपल्याला जेव्हा लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असतो तेव्हा आपली रेल्वेची तिकिट कंन्फर्म असेल तर आरामदायी प्रवास होतो. मात्र काही वेळेस असे होते की, आपली तिकिट ही कंन्फर्म ऐवजी वेटिंग लिस्टवर असल्याचेच दाखवले जाते. परंतु कंन्फर्म तिकिट मिळणे हे सुद्धा किती सीट्स रिकाम्या आहेत त्यावर ही अवलंबून असते. याच कारणास्तव तत्काळ तिकिट (Tatkal Ticket) सुविधा प्रवाशांसाठी सुरु करण्यात आली होती. जर तुम्ही ३ एसी आणि त्यावरील क्लाससाठी बुकिंग करु इच्छिता तर त्यासाठी सकाळी १० वाजता आणि स्लीपर तत्काळ बुकिंग सकाळी ११ वाजता सुरु होते. तिकिट घराजवळ जाण्याऐवजी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तत्काळ तिकिट बुक करु शकता. अशातच जर तुम्ही तत्काळ प्रवास करण्यासाठी कंन्फर्म तिकिट मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यासाठी सुद्धा सोप्पी ट्रिक आहे.
सर्वात प्रथम तुम्हाला आयआरसीटीसीची अधिकृत वेबसाइट https://www.irctc.co.in/ येथे भेट द्यावी लागणार आहे. आता तुम्हाला येथे तुमचे अकाउंट तयार करावे लागेल. अकाउंट सुरु झाल्यानंतर तुम्हाला एक मास्टर लिस्ट तयार करावी लागणार आहे. येथे तुम्हाला तुमची माहिती द्यावी लागणार आहे. हे ऑप्शन My profile सेक्शनमध्ये ड्रॉप डाउनमध्ये दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रवाशाचे नाव, वय, लिंग, जन्म, जेष्ठ नागरिक आणि अन्य काही कागदपत्र द्यावे लागतील. ही सर्व माहिती भरुन झाल्यानंकर आता Add passenger वर क्लिक केल्यानंतर मास्टर लिस्टमध्ये तुम्हाला एक ते २० लोकांची नावे दाखल करता येतात.
मास्टर लिस्ट तयार केल्यानंतरच तम्हाला यात्रेची लिस्ट तयार करता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला यात्रा लिस्ट पेजला भेट द्यावी लागणार आहे. येथे व्यक्तीचे नाव आणि कागदपत्रांबद्दल विचारले जाईल. मास्टर लिस्टमधील प्रवाशाचे नाव निवडण्याचा पर्याय तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये तुमच्यासोबत ज्यांना प्रवास करायचा आहे त्यांची नावे तुम्हाला देता येणार आहेत.
हे देखील वाचा- मलेशियन एअरलाइन्स फ्लाईट 370 – एक न उलगडलेलं कोडं!
तत्काळ तिकिटाचे बुकिंग कसे कराल?
रेल्वेतील ३एसी किंवा त्यावरील तत्काळ तिकिट(Tatkal Ticket) बुकिंगसाठी व्यक्तीला सकाळी ९.५७ वाजता लॉगइन करावे लागेल. तर स्लिपर क्लाससाठी तत्काळ तिकिट सकाळी ११ वाजता सुरु होते. त्यामुळे प्रवाशाला १०.५७ वाजतेपर्यंत पोर्टलवर लॉगइन करणे आवश्यक आहे. आता Plan My Journey येथे तुम्हाला ज्या ठिकाणाहून प्रवास करायचा आहे त्याबद्दल माहिती द्यावी लागले. आता तारीख निवडल्यानंतर कोणत्या रेल्वे उपलब्ध आहेत याची एक सूची दाखवली जाईल. त्यात कोणती रेल्वे कोणत्या मार्गाने आणि कोणत्या स्थानकात थांबेल हे सुद्धा सांगितले जाईल. रेल्वे सूचीच्या वरील बाजूस तुम्हाला सामान्य, प्रीमियम तत्काळ, महिला आणि तत्काळसाठी एक रेडिओसारखे बटण दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर ज्या रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करायचा आहे त्यामधील तुम्हाला कोचची निवड करावी लागले. जेव्हा तत्काळ तिकिट बुकिंगची वेळ सुरु होईल तेव्हा आपली सीट बुकिंग करता येणार आहे.